Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 30 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Helicopter Crash: अमेरिकेत थरारक अपघात! हवेतच दोन हेलिकॉप्टर एकमेकांवर आदळली; तीन जणांचा मृत्यू झाल्याने उडाली खळबळ

Oregon Helicopter Crash : अमेरिकेतील ओरेगॉनमध्ये दोन हेलिकॉप्टरची भीषण दुर्घटना होऊन त्यात तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मॅकमिनविल विमानतळाजवळ झालेल्या या अपघातात एक प्रशिक्षणार्थी आणि दोन अनुभवी वैमानिक ठार झाले.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Oct 30, 2026 | 01:42 PM
Oregon Helicopter Crash 2026 McMinnville Municipal Airport Accident

Oregon Helicopter Crash 2026 McMinnville Municipal Airport Accident

Follow Us
Follow Us:
  • हवेतच भीषण टक्कर
  • तीन जणांचा मृत्यू
  • उच्चस्तरीय तपास सुरू

अमेरिकेतील ओरेगॉन प्रांतातून एक अत्यंत हादरवून टाकणारी दुर्घटना समोर आली आहे. (Helicopter Crash) येथील मॅकमिनविल विमानतळाजवळ दोन हेलिकॉप्टर हवेतच एकमेकांवर आदळली आणि प्रचंड वेगाने जमिनीवर कोसळली. या अत्यंत भीषण अपघातात एक प्रशिक्षणार्थी पायलट आणि दोन अनुभवी वैमानिकांचा जागीच मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात आणि विमान वाहतूक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. अपघाताची तीव्रता इतकी जास्त होती की दोन्ही हेलिकॉप्टरचे सुटे भाग हवेतच लांबवर फेकले गेले आणि जमिनीवर आल्यावर त्यांचा अक्षरशः चुराडा झाला.

स्थानिक वेळेनुसार दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. पोर्टलँडच्या नैऋत्येला सुमारे ४० मै अंतरावर असलेल्या मॅकमिनव्हिल म्युनिसिपल विमानतळाजवळ ही घटना घडली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, अचानक झालेल्या या भीषण वादानंतर एक मोठा आवाज झाला आणि दोन्ही हेलिकॉप्टर पानांसारखी खाली कोसळली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाचे अधिकारी, पोलीस आणि आपत्कालीन पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. सुरक्षेचा उपाय म्हणून अपघात परिसराजवळील महामार्ग २३३ आणि त्याजवळील रस्ते वाहतुकीसाठी तात्काळ बंद करण्यात आले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Armenia Parliament : ‘त्या’ एका वक्तव्याने अर्मेनियाची संसद पेटली; खासदारांमध्ये तुंबळ हाणामारी, VIDEO जोरदार VIRAL

मृतांची ओळख आणि अपघाताची सविस्तर पार्श्वभूमी

योह्मिल काउंटीचे शेरीफ सॅम इलियट यांनी वृत्त माध्यमांशी बोलताना या दुर्घटनेतील मृतांची माहिती दिली आहे. या भीषण अपघातात ओरेगॉनमधील आस्बो येथील टेक्सासस्थित फ्लाइट इंजिनिअर व पायलट टायलर स्टर्डिव्हेंट (Tyler Sturdivant) आणि ब्रिटनमधून प्रशिक्षणासाठी आलेला एक तरुण प्रशिक्षणार्थी पायलट यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ब्रिटनची ही महिला प्रशिक्षणार्थी पायलट मॅडी आसबो या एका ब्रिटिश प्रशिक्षण वैमानिकासोबत हेलिकॉप्टरमधून उड्डाण करत होती, तर दुसऱ्या हेलिकॉप्टरमध्ये टायलर स्टर्डिव्हेंट उपस्थित होते.

Three people are dead after two helicopters collided in midair near an Oregon airport on Thursday, according to local authorities. Read more: https://t.co/YdZJ1Js86S https://t.co/6xZj58ircm — ABC News (@ABC) October 30, 2026

credit – social media and Twitter

घटनास्थळावर पाहणी केली असता, लाल रंगाचे हेलिकॉप्टर पूर्णपणे उद्ध्वस्त होऊन तुटले होते, तर हिरव्या रंगाचे हेलिकॉप्टर उलटे पडले होते. जेरी ट्रिम्बल हेलिकॉप्टर्स कंपनीचे एक हेलिकॉप्टर या अपघातात असल्याचे समोर आले आहे. संबंधित कंपनीने या दुर्घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले असून, मृतांच्या कुटुंबीयांप्रति संवेदना व्यक्त केल्या आहेत. तसेच NTSB आणि FAA च्या तपासात संपूर्ण सहकार्य करण्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Bhutan Flood: भूतानमध्ये हिमनदी फुटल्याने भारतात पुराचा हाहाकार! आसाम अन् बंगालमध्ये ‘रेड अलर्ट’; 10 हजार नागरिकांचे स्थलांतर

 प्रत्यक्षदर्शींचा थरारक अनुभव आणि तांत्रिक तपास

हा भयानक अपघात डोळ्यांनी पाहणाऱ्या स्थानिकांनी सांगितले की, आम्ही आमच्या कुटुंबीयांसोबत शेतात आणि द्राक्षांच्या बागेत कामात व्यस्त होतो. अचानक हवेत एकापाठोपाठ एक मोठा आवाज झाला आणि वर पाहिले असता दोन हेलिकॉप्टर आपापसात धडकल्याचे दिसले. काही सेकंदांतच दोन्ही हेलिकॉप्टर नियंत्रण सुटल्यामुळे जमिनीवर कोसळली. या घटनेनंतर काही वेळ परिसरात प्रचंड धूर आणि भीतीचे वातावरण होते.

दरम्यान, या अपघाताचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, यूएस नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड (NTSB) आणि फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन (FAA) या दोन्ही प्रमुख संस्थांनी या घटनेची सखोल चौकशी सुरू केली आहे. प्राथमिक अंदाजानुसार, अपघातग्रस्त हेलिकॉप्टरपैकी एक रॉबिन्सन आर-२२ (Robinson R-22) असू शकते, ज्याचा वापर प्रामुख्याने उड्डाण प्रशिक्षणासाठी केला जातो. तर दुसरे हेलिकॉप्टर एअरबस एएस३५० (Airbus AS350) असण्याची शक्यता आहे. हवेत नेमकी नेमकी चूक कुठे झाली, रडार यंत्रणेत बिघाड होता का किंवा मानवी चुकांमुळे ही टक्कर झाली, याचा शोध तपास अधिकारी घेत आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: अमेरिकेतील हेलिकॉप्टर अपघात कुठे आणि कसा घडला?

    Ans: हा अपघात अमेरिकेतील ओरेगॉन प्रांतातील मॅकमिनविल विमानतळाजवळ झाला, जिथे दोन हेलिकॉप्टर हवेतच एकमेकांवर आदळली.

  • Que: या भीषण अपघातात किती जणांचा मृत्यू झाला आहे?

    Ans: या दुर्घटनेत एक प्रशिक्षणार्थी पायलट आणि दोन अनुभवी वैमानिकांसह एकूण तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

  • Que: या अपघाताची चौकशी कोणती यंत्रणा करत आहे?

    Ans: नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड (NTSB) आणि फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन (FAA) या दोन्ही यंत्रणा या अपघाताची सखोल चौकशी करत आहेत.

Web Title: Oregon helicopter crash two helicopters collide mid air three dead hp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2026 | 01:42 PM

Topics:  

  • America
  • helicopter crash
  • World news

संबंधित बातम्या

Bhutan Flood: भूतानमध्ये हिमनदी फुटल्याने भारतात पुराचा हाहाःकार! आसाम अन् बंगालमध्ये ‘रेड अलर्ट’; 10 हजार नागरिकांचे स्थलांतर
1

Bhutan Flood: भूतानमध्ये हिमनदी फुटल्याने भारतात पुराचा हाहाःकार! आसाम अन् बंगालमध्ये ‘रेड अलर्ट’; 10 हजार नागरिकांचे स्थलांतर

Israel Election : इस्रायलमध्ये बहुमत मिळाले नाही तर काय? सरकार स्थापन करण्यासाठी ‘हे’ पाच पर्याय आहेत
2

Israel Election : इस्रायलमध्ये बहुमत मिळाले नाही तर काय? सरकार स्थापन करण्यासाठी ‘हे’ पाच पर्याय आहेत

Armenia Parliament : ‘त्या’ एका वक्तव्याने अर्मेनियाची संसद पेटली; खासदारांमध्ये तुंबळ हाणामारी, VIDEO जोरदार VIRAL
3

Armenia Parliament : ‘त्या’ एका वक्तव्याने अर्मेनियाची संसद पेटली; खासदारांमध्ये तुंबळ हाणामारी, VIDEO जोरदार VIRAL

Israel Election: इस्रायलमध्ये राजकीय भूकंपाची शक्यता; नेतान्याहूंना सत्तेवरून हटवण्यात अरब पक्ष ठरतील का किंगमेकर?
4

Israel Election: इस्रायलमध्ये राजकीय भूकंपाची शक्यता; नेतान्याहूंना सत्तेवरून हटवण्यात अरब पक्ष ठरतील का किंगमेकर?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.