Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • New Year |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘पहिले राजीनामा द्या, मग हेलिकॉप्टर’ ; लष्करप्रमुखाच्या धमकीमुळे नेपाळच्या माजी पंतप्रधानांनी सोडली खुर्ची? नेपाळी माध्यमांचा दावा

Nepal Protest : नेपाळच्या मांध्यमांच्या मते, जनरेशन झेडचे आंदोलन अधिक तीव्र झाले होते. यामध्ये अनेक नेत्यांना मारहाण करण्यात आली. यामुळे मारहाण होण्याची भीतीने ओली यांनी राजीनामा दिला.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 18, 2025 | 11:23 PM
Nepal Gen Z protest Former pm oli sharma resign helicopter and army

Nepal Gen Z protest Former pm oli sharma resign helicopter and army

Follow Us
Close
Follow Us:
  • मारहाणीच्या भीतीने नेपाळच्या माजी पंतप्रधान ओली यांनी सोडली खुर्ची?
  • लष्करप्रमुखाच्या धमकीमुळे नेपाळच्या माजी पंतप्रधान ओली दिला राजीनामा?
  • नेपाळचे तीन माजी पंतप्रधान झाले बेघर
Nepal Gen Z Protest : काठमांडू : नेपाळमध्ये (Nepal) सध्या सर्वकाही सुरळित होताना दिसत आहे. अंतरिम सरकारची स्थापना सुरु असून ५ मार्च २०२६ पर्यंत सार्वत्रिक निवडणूका घेण्यात येणार आहेत. ४ सप्टेंबर रोजी सोशल मीडियावर लागू झालेल्या बंदीमुळे देशातल जनरेशन झेडच्या तरुणांनी तीव्र आंदोलन छेडले होते. यामुळे माजी पंतप्रधान ओली यांना राजीनामा द्यावा लागला होता. सध्या त्यांच्या राजीनाम्याबाबत एक मोठा खुलासा समोर आला आहे. सांगितले जात आहे की, माजी पंतप्रधान ओलींनी नेपाळच्या लष्करप्रमुखांच्या सांगण्यावरुन पद सोडले होते.

Nepal Crisis: अंतरिम सरकारने माजी पंतप्रधानांवर दाखल केला हत्येचा गुन्हा, केपी शर्मा ओलींच्या अडचणी वाढल्या!

आंदोलन कर्त्यांकडून मारहाणीच्या भीतीने लष्करप्रमुखाला कॉल अन्…

नेपाळच्या मांध्यमानी दिलेल्या माहितीनुसार, जनरेशन झेडचे आंदोलन (Nepal Protest) अधिक तीव्र झाले होते. यामध्ये अनेक नेत्यांना मारहाण करण्यात आली. नेपाळचे माजी पंतप्रधान देऊबा यांना, अर्थमंत्री पौडाल यांना मारहाण करण्यात आली होती. यामुळे ओली शर्मा यांना भीती वाटू लागली होती.

लोक त्यांनाही मारतील या भीतीने त्यांना लष्करप्रमुखांना कॉल केला. त्यांना लष्करप्रमुखांकडे देश सोडण्यासाठी हेलिकॉप्टरची मागणी केली होती. पण यासाठी ओली यांच्यासमोर लष्करप्रमुख अशोक राज सिग्देल यांनी अट ठेवली होती.

राजीनामा द्या तरच…

अहवालानुसार, नेपाळचे लष्करप्रमुख अशोक सिग्देल यांनी ओली शर्मा यांच्याकडे राजीनामा देण्याची मागणी केली. त्यांना सांगितले की, उड्डाण केल्यानंतर लगेचच पंतप्रधानांना राजीनामा द्यावा. तरच ओली यांना लष्कराकडून हेलिकॉप्टरची मदत पुरवली जाईल. यावर ओली यांनी होकार दिल्यानंतरच त्यांना देश सोडून जाण्यासाठी हेलिकॉप्टर मिळाले असे अहवालात सांगितले जात आहे.

यापूर्वी देखील देशातील परिस्थिती सुधारयची असेल, आंदोलन शांत करायचे असेल तर राजीनामा द्या असे लष्करप्रमुखांनी ओली शर्मा यांनी सांगतल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. देशातील परिस्थिती अत्यंत बिघडली होती. यावेळी सीग्देल यांनी ओली यांना पद सोडण्याचा सल्ला दिला होता असे म्हटले.

मारहाण होण्याच्या भीतीने सोडला देश…

शिवाय नेपाळच्या माध्यमांनी असाही दावा केला आहे की, नेपाळचे माजी पंतप्रधान शेर बहादूर देउबा यांना घरात घुसून मारहाण करम्यात आली होती. तसेच नेपाळचे अर्थमंत्री विष्णू पौडाल यांना मारहाण कण्यात आली होती. यामुळे त्यांना मारहाण होण्याच्या भीतीनेच माजी पंतप्रधान ओली यांनी ९ सप्टेंबर रोजी राजीनामा दिला आणि घाई घाऊत देश सोडला.

नेपाळचे तिन्ही पंतप्रधान बेघर

नेपाळचे तीन माजी पंतप्रधान केपी ओली शर्मा, शेर बहादूर देउबा, आणि पुष्प कमल दहल प्रचंड सध्या बेघर झाले आहे. सध्या त्यांचे समर्थक त्यांच्यासाठी भाड्याने घरे शोधत आहे. निदर्शकांनी त्यांची घरे जाळून टाकली आहेत. तसेच नेपाळच्या हिंसाचारात एका भारतीय महिलेसह ५१ जणांचा मृत्यू, तर १५०० हून अधित लोक जखमी झाले आहेत.

FAQs (संबंधित प्रश्न)

नेपाळमध्ये का सुरु होते जनरेशन झेडचे आंदोलन? 

नेपाळच्या माजी सरकारच्या सोशल मीडियावरील बंदी, भ्रष्टाचार, देशातील बेरोजागीर संपवण्यातील अपयश, आणि नेपोटिझ विरोधात सुरु होते आंदोलन.

नेपाळच्या पंतप्रधानांनी का दिला राजीनामा?

नेपाळच्या पंतप्रधानांनी देशातील बिघडत चाललेली परिस्थिती पाहून लष्कराकडे मदत मागितली होती. यावेळी त्यांना पद सोडण्याचा सल्ला देण्यात आला. यामुळे ओली शर्मा यांनी राजीनामा दिला असे म्हटले जात आहे.

नेपाळच्या लष्करप्रमुखांनी ओली यांच्यासमोर मदतीसाठी कोणती अट ठेवली? 

नेपाळच्या माध्यमानी दिलेल्या माहितीनुसार, लष्करप्रमुख अशोक सिग्देल यांनी ओली शर्मा यांच्याकडे राजीनामा देण्याची मागणी केली होती. तरच त्यांना देश सोडण्यासाठी मदत मिळेल असे सांगण्यात आले होते.

Nepal Political Crisis: नेपाळची सत्ता लष्कराच्या हाती जाणार? आर्मी चीफच्या सांगण्यावरुन पंतप्रधानांनी पद सोडल्याच्या रंगल्या चर्चा

Web Title: Nepal gen z protest former pm oli sharma resign helicopter and army

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2025 | 11:23 PM

Topics:  

  • Nepal News
  • Nepal Protest
  • World news

संबंधित बातम्या

इराणमध्ये खामेनी सरकारविरोधात उसळले आंदोलन; हजारो Gen Z रस्त्यावर, कारण काय?
1

इराणमध्ये खामेनी सरकारविरोधात उसळले आंदोलन; हजारो Gen Z रस्त्यावर, कारण काय?

Khaleda Zia Death : खालिदा जिया यांना पतीच्या कबरीजवळ करण्यात येणार दफन; ७ दिवसांचा शोक जाहीर
2

Khaleda Zia Death : खालिदा जिया यांना पतीच्या कबरीजवळ करण्यात येणार दफन; ७ दिवसांचा शोक जाहीर

भारत बांगलादेश संबंधात पुन्हा तणाव! ढाक्याने उच्चायुक्तांना तातडीने बोलावले, कारण काय?
3

भारत बांगलादेश संबंधात पुन्हा तणाव! ढाक्याने उच्चायुक्तांना तातडीने बोलावले, कारण काय?

Israel Hamas War : ‘… वेळ संपत चाललीय’ ; नेतन्याहूंशी बैठकीनंतर ट्रम्प यांचा हमासला कडक इशारा
4

Israel Hamas War : ‘… वेळ संपत चाललीय’ ; नेतन्याहूंशी बैठकीनंतर ट्रम्प यांचा हमासला कडक इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.