Nepal Political Crisis: नेपाळची सत्ता लष्कराच्या हाती जाणार? आर्मी चीफच्या सांगण्यावरुन पंतप्रधानांनी पद सोडल्याच्या रंगल्या चर्चा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Kathmandu Protest : सध्या नेपाळमध्ये मोठी अराजकता निर्माण झाली आहे. नेपाळचे पंतप्रधान केपी ओली शर्मा यांनी मंगळवारी (०९ सप्टेंबर) आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी देखील त्यांचा राजीनामा स्वाकारला आहे. परंतु अजूनही नेपाळमधील राजकीय संकट वाढत आहे. सध्या लष्कराच्या हातात सत्ता जाणार असल्याचे म्हटले जात आहे. यामागचे कारण म्हणजे नेपाळचे पंतप्रधान ओली शर्मा यांनी राजीनामा देताना लष्कराने पद सोडण्यास सांगितले असल्याचे म्हटले आहे. तर परिस्थितीत हाताळता येईल असा सल्ला ओली यांनी देण्यात आला.
नेपाळमध्ये ४ सप्टेंबर रोजी सोशल मीडियावर बंदी लागू करण्यात आली होती. दरम्यान यानंतर देशातील तरुणांनी सरकारच्या या निर्णयाविरोधात आंदोलन छेडले. या आंदोलनाने हिंसक वळण घेतले होते. यामध्ये २१ जणांचा मृत्यू, तर ३०० हून अधिक तरुण जखमी झाले होते. परस्थितीत अत्यंत बिघडत चालली होती. यावेळी पंतप्रधान ओलींच्या राजीनाम्याची आणि इतर मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणीही केली जात आहे. दरम्यान बिघडत असलेल्या परिस्थिती पाहता ओली शर्मा यांनी लष्कराकडे मदत मागितली होती.
लष्कराच्या हाती जाणार सत्ता?
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील परिस्थिती अत्यंत बिघडत चालली होती. यावेळी नेपाळचे आर्मी चीफ जनरल अशोक राज सिग्देल यांच्याकडे परिस्थितीतवर तोडगा काढण्यासाठी मदत मागितली. यावेळी आर्मी चीफ सीग्देल यांनी ओली यांना पद सोडण्याचा सल्ला दिला. त्यांनी पंतप्रधान ओलींना म्हटले, राजीनामा दिल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात येईल. शिवाय त्यांनी पंतप्रधान ओलींना निवास स्थानातून बाहेर पडण्यासाठीही मदत केली. यामुळे पंतप्रधानांनी राजीनामा दिला असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. यामुळे सध्या नेपाळची सत्ता लष्कराच्या हाती जाणार का? अशा चर्चा रंगल्या आहेत.सध्या नेपाळमधील परिस्थिती देखील बिकट आहे. यामुळे नेपाळचे लष्कर सत्ता हाती घेउ शकते असे म्हटले जात आहे.
Nepal Prime Minister KP Sharma Oli resigns: officials
(Source: Third Party)#NepalGenZProtest #KathmanduProtest pic.twitter.com/emqq1CMQVk
— Press Trust of India (@PTI_News) September 9, 2025
या मंत्र्यांनी दिला राजीनामा
दरम्यान या हिंसाचारात नेपाळच्या इतर काही मंत्र्यांनीही राजीनामा दिला आहे. नेपाळच्या कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि उपपंतप्रधान प्रकाश मान सिंह, आरजू राणा देऊबा (परराष्ट्र मंत्री), तेजू लाल चौधरी (क्रीडा मंत्री), अजय चौरसिया (कायदा मंत्री), दीपक खडका (ऊर्जा मंत्री), ऐन बहादूर शाही (वनमंत्री), प्रदीप पौडेल (आरोग्य आणि लोकसंख्या मंत्री), रामनाथ अधिकारी (कृषी मंत्री) आणि बद्री पांडे (पर्यटन मंत्री) यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला आहे.
FAQs( संबंधित प्रश्न)
नेपाळमध्ये का सुरु होते आंदोलन?
नेपाळमध्ये सरकारच्या भष्ट्राचारांविरोधात, नेपोटिझ, देशातील बेरोजगारी आणि सोशल मीडियावरील बंदी या सर्व वादांमुळे आंदोलन सुरु होते.
नेपाळच्या पंतप्रधानांनी का दिला राजीनामा?
नेपाळच्या पंतप्रधानांनी देशातील बिघडत चाललेली परिस्थिती पाहून लष्कराकडे मदत मागितली होती. यावेळी त्यांना पद सोडण्याचा सल्ला देण्यात आला. यानंतर परिस्थितीत नियंत्रणात येईल असे सांगण्यात आले. यामुळे ओली शर्मा यांनी राजीनामा दिला असे म्हटले जात आहे.
Nepal Protest : कोण आहे सुदान गुरुंग? ज्याच्या एका आवाजाने ओली सरकारविरोधी तरुणांनी छेडले आंदोलन