
India-Nepal have historical relations many challenges ahead for the first female PM Sushila Karki
Nepal Interim PM Sushila Karki : काठमांडू : गेले काही नेपाळमधील राजकीय आणि सामाजिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली होती. ओली सरकारविरोधातील जनरेशन झेडच्या हिंसक निदर्शनांनी संपूर्ण देश अंधरात गेला होता. परंतु आता परिस्थिती हळहळू सुधारत चालली आहे. अंतरिम सरकारचे मंत्रीमंडळाचा विस्तार सुरु आहे. तसेच माजी महिला सर न्यायाधीस सुशीला कार्की यांनी अंतरिम सरकारचा पदाभार स्वीकारला आहे.
दरम्यान त्यांनी पदाभार स्वीकारल्यानंतर हिंसाचारात जखमी झालेल्यांची भेट घेतली. त्यांच्याशी संवाद साधला. तसेच सुशीला कार्की यांनी हिंसाचारात बळी गेलेल्यांना शहीद म्हणून घोषित केले आहे. तसेच पीडितांच्या कुटुंबियांना दहा लाख नेपाळी रुपयांची नुकसान भरपाई जाहीर केली आहे.या आंदोलनात ५१ लोकांचा बळी गेला असल्याची माहिती मिळाली आहे.
याशिवाय कार्की यांनी भ्रष्टाचार निर्मुलनावरही ठोस पाऊले उचलण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी सहा महिन्यात निवडणुका घेणार असल्याचे आणि त्यानंतर सत्ता सोडून नवीन सरकारच्या हाती सोपवणार असल्याचे म्हटले आहे. १२ सप्टेंबर २०२५ रोजी त्यांनी अंतरिम सरकारचा पदाभार स्वीकारल्यानंतर ५ मार्च २०२६ पूर्वी निवडणूका घेणार असल्याचे जाहीर केले आहे.
अंतरिम मंत्रीमंडळाचा विस्तार
सध्या पंतप्रधान कार्की अंतरिम सराकराचा विस्तार करण्यात व्यस्त आहेत. यामध्ये १५ मंत्र्यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. यात माजी सैन्य अधिकारी, न्यायमूर्ती, कार्यकारी अधिकारी, तसेच ऊर्जा तज्ञ कुलमन घिसिंग यांचा समावेश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
याशिवाय काही नामवंत डॉक्टर आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींचा विचारही कार्की करत आहे. तसेच Gen Z आंदोलनांचे प्रतिनिधी यांचा देखील यामध्ये समावेश होण्याची शक्यता आहे.
नेपाळचे माजी तीन पंतप्रधान झाले बेघर
याच वेळी नेपाळचे तीन माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली, शेर बहादुर देऊबा आणि पुष्पकमल दहाल प्रचंड हे बेघर झाले आहे. आंदोलनावेळे लोकांनी त्यांची घरे पेटवून दिली होती. यामुळे सध्या त्यांना भाड्याच्या घरात रहावे लागणार आहे. यासाठी त्यांचे समर्थक नवीन घरांच्या शोधात आहेत. गेल्या काही दिवसांपासून काठमांडूपासून ते पोखरा पर्यंत अनेक शहरात त्यांचे समर्थक दिसले आहेत.
FAQs (संबंधित प्रश्न)
नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान सुशीला कार्की यांनी कशाची घोषमा केली आहे?
सुशीला कार्की यांनी Gen Z च्या आंदोलनांदरम्यान हिंसाचारात बळी गेलेल्यांना शहीदांचा दर्जा दिला आहे. तसेच त्यांनी पीडितांच्या कुटुंबियांना दहा लाख नेपाळी रुपयांची मदत जाहीर केली आहे.
नेपाळमध्ये सध्या काय परिस्थिती आहे?
सध्या नेपाळमधील हिंसाचाराची आग विझत चालली आहे, देशात अंतरिम सरकार स्थापन होत आहे. आज मंत्रिमंडाळाचा विस्तार होण्याची शक्यत आहे.
Nepal Politics: नेपाळच्या पंतप्रधान तर झाल्या पण…; सुशीला कार्कींसमोर असेल मोठ्या आव्हानांचा डोंगर