Nepal Politics: नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्कींसमोर असेल मोठ्या आव्हानांचा डोंगर
Kathmandu : भारताच्या शेजारील देश नेपाळमध्ये झालेल्या आंदोलनानंतर देशात सत्तापालट झाला आणि नेपाळच्या माजी सरन्यायाधीश सुशीला कार्की यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. पण त्यापूर्वी नेपाळला मोठ्या हिंसचाराचाही सामना करावा लागला. माजी पंतप्रधान के.पी. ओली यांच्या मनमानी कारभार आणि भ्रष्टाचारामुळे नेपाळमध्ये हिंसाचाराची ठिणगी पडली. सोशल मीडियावरील बंदीविरोधात तरुणांनी रस्त्यावर उतरून निषेध केला. या निषेधाला हिंसक वळण लागले आणि अनेकांना आपले प्राण गमवावे लागले, अनेक जण जखमी झाले. निदर्शकांनी संसद भवन, पंतप्रधान निवासस्थानासह अनेक प्रमुख ठिकाणी आग लावली आणि बराच गोंधळ उडाला.
शरद पवार आज नाशिकमध्ये; सुप्रिया सुळेंसह रोहित पवारही येणार, आगामी निवडणुकांबाबत…
या निदर्शनांमुळे के.पी. शर्मा ओली यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि सुशीला कार्की यांना देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून नियुक्त करण्यात आले. राष्ट्रपती पौडेल यांनी शुक्रवारी सुशीला कार्की यांना पंतप्रधानपदाची शपथ दिली. नवनियुक्त पंतप्रधानांच्या शिफारशीवरून राष्ट्रपतींनी प्रतिनिधी सभागृह बरखास्त केले आणि देशातील पुढील संसदीय निवडणुका ५ मार्च रोजी होतील असे सांगितले.
सोशल मीडियावरील बंदीविरोधात निदर्शने करणाऱ्या झेन जी गटाच्या मागण्य मान्य करत राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी १२ सप्टेंबर रोजी नेपाळची विद्यमान संसद बरखास्त केली त्यानंतर सुशीला कार्की यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. या सर्व घटनाक्रमानंतर के.पी. शर्मा ओली यांच्या राजीनाम्यानंतर नेपाळमधील राजकीय अनिश्चितता संपली आहे. पण त्याचवेळी सुशीला कार्की यांच्यासाठी हा काट्यांचा मुकुट ठरणार आहे. सुशीला कार्की यांना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागणार आहे.
दरम्यान, जनरल झेड प्रतिनिधींची लष्करप्रमुख अशोक राज सिग्देल आणि अध्यक्ष पौडेल यांच्याशी दोन दिवस चाललेल्या चर्चेनंतर सुशीला कार्की यांची अंतरिम पंतप्रधानपदासाठी निवड करण्यात आली. नेपाळच्या नवनिर्वाचित पंतप्रधान सुशीला कार्की एक लहान मंत्रिमंडळ स्थापन करणार आहे. सुशीला कार्की स्वत: गृहखाते, परराष्ट्रखाते आणि संरक्षणखात्यासह जवळपास दोन डझन मंत्रालयांचा कारभार सांभाळणार आहे. तर हिंसाचारादरम्यान, सिंह दरबार सचिवालयातील पंतप्रधान कार्यालयाला निषेधादरम्यान आग लागली होती, त्यामुळे सिंह दरबार संकुलातील गृह मंत्रालयासाठी नव्याने बांधलेली इमारत पंतप्रधान कार्यालयासाठी तयार केली जात आहे. पंतप्रधान कार्यालय तेथे हलविण्यासाठी इमारतीभोवती साचलेली राख काढून टाकण्याचे आणि साफसफाई करण्याचे काम सुरू आहे.
भारतीय महिला संघासमोर विश्वचषकाआधी ऑस्ट्रेलियाचे आव्हान! वाचा कधी आणि कुठे पाहता येणार सामन्याची Liv
सुशीला कार्की यांनी सत्ता हाती घेताच, नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान सुशीला कार्की यांना अनेक मोठ्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल, त्यापैकी सर्वात मोठे म्हणजे भ्रष्टाचार आणि बेरोजगारीशी सामना करणे. भ्रष्टाचार, घराणेशाही आणि सोशल मीडियावरील बंदीमुळे ओली सरकारविरुद्ध नेपाळी तरुणांमध्ये प्रचंड संताप होता. पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी पंतप्रधान कार्की यांना कठोर पावले उचलावी लागतील.
सरकारी कंत्राटे आणि नियुक्त्यांमध्ये पसरलेल्या भ्रष्टाचाराला कडक आळा घालावा लागेल आणि बेरोजगारी कमी करण्यासाठी शिक्षण-प्रशिक्षण कार्यक्रम, स्टार्टअप्सना प्रोत्साहन आणि खाजगी गुंतवणुकीसाठी चांगले वातावरण निर्माण करावे लागेल आणि तरुणांना विश्वासात घ्यावे लागेल.
सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या नेपाळच्या तरुण पिढीला, ज्यांनी सोशल मीडियावरील बंदीबाबत चळवळ सुरू केली, त्यांचे म्हणणे ऐकावे लागेल. त्यांच्या समस्या सोडवण्यासोबतच त्यांच्याशी संवाद साधणे देखील खूप महत्त्वाचे असेल.
सहा महिन्यांचा कार्यकाळ पंतप्रधान कार्की यांच्यासाठी खूप महत्त्वाचा असेल. जर त्या निवडणुकीपर्यंत जनतेचा विश्वास राखण्यात यशस्वी झाल्या, तर त्यांच्यासाठी पुढचा मार्ग काहीसा सोपा होईल.
नेपाळमध्ये पहिल्यांदाच युवा चळवळीने सत्ता परिवर्तन घडवून आणले आहे. सुशीला कार्की यांना तरुणांच्या आकांक्षांना साजेसे करावे लागेल. अंतरिम मंत्रिमंडळात समाविष्ट असलेले नेते त्यांच्या महत्त्वाकांक्षेने प्रेरित होऊन सहकार्य करू शकतात आणि आव्हानही देऊ शकतात.