Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nepal News : नेपाळच्या Gen Z आंदोलकांची माजी पंतप्रधान ओलींच्या अटकेची मागणी; निदर्शनात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या हत्येचा आरोप

Nepal Gen Z Protest : नेपाळमध्ये जनरेशन झेडच्या तरुणांनी माजी पंतप्रधानांच्या अटकेची मागणी केली आहे. तसेच त्यांनी त्यांच्यावर गंभीर आरोपही केले आहेत, जे ओली यांनी फेटाळून लावले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 21, 2025 | 01:02 PM
Nepal's Gen Z protesters demand arrest of former PM Oli

Nepal's Gen Z protesters demand arrest of former PM Oli

Follow Us
Close
Follow Us:
  • नेपाळमध्ये माजी पंतप्रधान ओली आणि तत्कालीन गृहमंत्र्यांच्या अटकेची मागणी
  • ओलींवर नेपाळच्या हिंसाराचारत मरण पावलेल्यांच्या हत्येचा आरोप
  • ओली शर्मा यांना फेटाळून लावले आरोप आणि चौकशीची केली मागणी

Nepal Gen Z Protest : काठमांडू : नेपाळमध्ये ८ सप्टेंबर रोजी सरकारच्या सोशल मीडियावरील बंदीविरोधात तीव्र आंदोलन (Nepal Protest) सुरु झाला होते. चार दिवस या आंदोलनांनी प्रचंड हिंसाचार घडवून आणला. यावेळी नेपाळचे माजी पंतप्रधान ओली शर्मा यांच्या सरकारला पाडण्यात आल. जनरेशन-झेडच्या तरुणांनी हे आंदोलन छेडले होते. दरम्यान आता या आंदोलन कर्त्यांनी माजी पंतप्रधान ओली शर्मा यांना अटक करण्याची मागणी केली आहे. तसेच तत्काली गृमंत्री रमेश लेखक यांच्याही अटकेची मागणी केली जात आहे.

या दोन्ही नेत्यांवर ८ सप्टेंबर रोजी सरकारविरोधी आंदोलनात झालेल्या गोळीबारत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या हत्येचा आरोप करण्यात आळा आहे. या हिंसक गोळीबारात २० कार्यकर्त्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

‘पहिले राजीनामा द्या, मग हेलिकॉप्टर’ ; लष्करप्रमुखाच्या धमकीमुळे नेपाळच्या माजी पंतप्रधानांनी सोडली खुर्ची? नेपाळी माध्यमांचा दावा

अधिकाऱ्यांच्या आणि नेत्यांच्या संपत्तीच्या चौकशीचीही मागणी

जनरेशन झेड गटाचे सल्लागार ड. निकोल बुशल यांनी सांगितेल की, माडी पंतप्रधान ओली, तत्कालीन गृहमंत्री रमेश लेखल आणि काठमांडूचे जिल्हाधिकारी छवी रिजाल यांच्या अटकेची मागणी तरुणांकडून केली जात आहे. तसेच १९९० नंतरच्या सर्व उच्चस्तरीय नेत्यांची आणि अधिकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी देखील होत आहे. यासाठी एक स्वतंत्र आयोग स्थापन करावा असे सांगितले जात आहे.

ओली यांनी फेटाळले आरोप

दरम्यान पंतप्रधान ओली यांच्यावर हिंसाचारत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या हत्येचा आरोप करण्यात आला असून हा आरोप त्यांनी फेटाळून लावला आहे. ओली यांनी स्पष्ट केले की, गोळबाराचे आदेश त्यांनी दिलेले नव्हते. तसेच पोलिसांकडे शस्त्रास्त्रांचा साठा देखील नव्हता, यामुळे प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी ओली यांनी केली आहे. त्यांनी सांगितले की, निदर्शनांमध्ये झालेल्या हिंसेसाठी बाहेरुन घुसखोरी केलेल्यांचा हात आहे. त्यांना ओली सरकारवरील सगळ्या आरोपांना एक राजकीय कट म्हणून वर्णन केले आहे.

नेपाळमधील आंदोलन

नेपाळमध्ये ओली सरकारच्या भ्रष्टाचाराविरोधात सोशल मीडियावर घोषणाबाजी सुरु होती. यामुळे सरकारने ४ सप्टेंबर रोजी सोशल मीडियावर बंदी लागू केली. यामुळे ८ व ९ सप्टेबरला सरकारविरोधी आंदोलन सुरु झाले. सुरुवातील आंदोलन शांततापूर्ण पद्धतीने सुरु होते. पण पोलिसांच्या आंदोलकांवरील गोळीबारानंतर याचे हिंसाचारात रुपांतर झाले. या दरम्यान ५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. पंतप्रधानांसह अनेक मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली. लोकांनी मंत्र्यांना मारहाण केली, त्यांची घरे जाळली. तसेच संसद भवन आणि राष्ट्रपती भवनही पेटवून देण्यात आले. मोठ्या प्रमाणात देशात अस्थिरता निर्माण झाली होती.

दरम्यान सध्या परिस्थिती शांत झाली आहे. नव्या अंतरिम सरकारची स्थापना झाली असून सुशीला कार्की (Sushila Karki) यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. देशात ५ मार्च २०२६ पूर्वी निवडणूका घेण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. तसेच हिंसाचारात बळी गेलेल्यांना शहीदांचा दर्जा देण्यात आला आहे. त्यांच्या कुटुंबीयांना १० लाख नेपाळी रुपयांची मदतही जाहीर करण्यात आली आहे. अंतरिम मंत्रीमंडळाचा विस्तार सुरु आहे.

FAQs(संबंधित प्रश्न)

नेपाळच्या जनरेशन झेड आंदोलकांनी काय मागणी केली? 

नेपाळच्या जनरेशन झेड आंदोलकांनी माजी पंतप्रधान ओली यांच्या आणि तत्कालीन गृहमंत्री रमेश लेखक यांच्या अटकेची मागणी केली आहे.

नेपाळच्या माजी पंतप्रधान ओलींवर काय आरोप करण्यात आले? 

नेपाळचे माजी पंतप्रधान ओली शर्मा यांच्यावर गोळीबाराचे आदेश दिल्यामुळे लोकांचा मृत्यू झाल्याचे आरोप करण्यात आले आहेत, पण हे आरोप त्यांनी फेटाळले आहेत.

नेपाळमध्ये का सुरु होते आंदोलन? 

नेपाळमध्ये सरकारच्या सोशल मीडियावरील बंदी, भ्रष्टाचार, देशातील बेरोजगारी संपवण्यातील अपयश आणि नेपोटिझ विरोधत जनरेशन झेडचे आंदोलन सुरु होते.

पंतप्रधान मोदींनी नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्याशी साधला संवाद; ट्विट करून म्हटले…

Web Title: Nepal news nepals gen z protesters demand arrest of former pm oli

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2025 | 01:00 PM

Topics:  

  • Nepal News
  • Nepal Protest
  • World news

संबंधित बातम्या

US H1-B व्हिसा शुल्कावरून भारतीय राजकारणात पेटला वाद; विरोधकांची पंतप्रधान मोदींवर टीका
1

US H1-B व्हिसा शुल्कावरून भारतीय राजकारणात पेटला वाद; विरोधकांची पंतप्रधान मोदींवर टीका

‘खलिस्तानींची आता खैर नाही’,  ट्रुडोंच्या जाण्यानंतर भारत-कॅनडा संबंधात सुधार; दहशतवादाविरोधी दोन्ही देश एकत्र लढणार
2

‘खलिस्तानींची आता खैर नाही’, ट्रुडोंच्या जाण्यानंतर भारत-कॅनडा संबंधात सुधार; दहशतवादाविरोधी दोन्ही देश एकत्र लढणार

‘मी सात युद्ध थांबवली…’, डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केली स्वत:चीच बढाई; जागतिक शांततेत अमेरिकेचा मोठा वाटा असल्याचा दावा
3

‘मी सात युद्ध थांबवली…’, डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केली स्वत:चीच बढाई; जागतिक शांततेत अमेरिकेचा मोठा वाटा असल्याचा दावा

युक्रेनची जमीन पुन्हा हादरली! रशियाचा ६०० हून अधिक ड्रोन अन् क्षेपणास्त्रांचा मारा, अनेक जखमी
4

युक्रेनची जमीन पुन्हा हादरली! रशियाचा ६०० हून अधिक ड्रोन अन् क्षेपणास्त्रांचा मारा, अनेक जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.