Nepal Welcomes Its New Kumari The Living Goddess
Kumari Goddess Nepal 2025 : काठमांडू : प्रत्येक देशात देवीची पूजा करण्याची पद्धत ही देशानुसार वेगळी असते. कोणी मूर्तीच्या रुपात देवीला पूजतात, तर कोणी चित्राच्या रुपात पूजा करतात. जगाच्या कानाकोपऱ्यात तुम्हाला वेगवेगळ्या परंपरा पाहायला मिळतील. भारताचा शेजारी देश नेपाळमध्येही देवीची एक वेगळी आणि प्रसिद्ध परंपरा आहे. यावेळी नेपाळच्या काठमांडू येथे एका दोन वर्षे आठ महिन्यांच्या चिमुकलीची आर्य तारा शाक्यची कुमारी देवी म्हणून निवड करण्यात आली आहे. ही एक नेपाळची विशेष धार्मिक परंपरा आहे. आज आपण या परंपरेबद्दल जाणून घेणार आहोत.
‘शांतता करार स्वीकारा नाहीतर…’ ; डोनाल्ड ट्रम्प यांचा गाझा योजनेवर हमासला कडक इशारा
मंगळवारी (३० सप्टेंबर) रोजी आर्य तारा शाक्य या चिमुकलीचे धार्मिक विधी आणि परंपरेनुसार नेपळची नवी कुमारी देवी म्हणून घरात प्रवेश केला. आर्य तारा शाक्य नेपाळच्या कुमारीच्या गादीवर विराजमान झाली. नेपाळमध्ये एका तरुणीची मुलीची जिंवत देवी म्हणून पूजा केली जाते, ज्याला कुमारी देवी म्हणतात. नेपाळच्या मान्यतांनुसार, कुमारी देवीला जमिनीवर पाऊल ठेवण्याची परवानगी नसते.
लोकांचा विश्वास आहे की, कुमारी देवी किंवा तलेजू भवानीचा ही तरुणी अवतार असते. नेपाळमधील नेवारी समुदायत ही प्राचीन परंपरा निभावली जाते. कुमारी देवी हिंदू आणि बौद्ध धर्माचा संगम मानली जाते.
नेपाळच्या कुमारी देवीची निवड अत्यंत कठोर पद्धतीने केली जाते. बौद्ध शाक्य समुदायातील तरुण मुलींमधून एका कुमारीची निवड केली जाते. कुमारी देवीच्या शरीरावज कोणतीही जखम किंवा ओरखडा नसावा. तसेच यासाठी तिला कठोर परिक्षाही द्यावी लागते. ज्यामध्ये परंपरेनुसार मुलीला एका अंधाऱ्या खोलीत नेले जाते. जिथे म्हशीचे मुंडके आणि भेसूर मुखवटे ठेवले जातात. जर चिमुकली न घाबरता अंधाऱ्या खोलीतून बाहेर आली तर तिची कुमारी देवी म्हणून निवड केली जाते.
कुमारी प्रथा ही सुमारे ५०० ते ६०० वर्षांपूर्वी मल्ल राजाच्या काळात सुरु झाली होती. जया प्रकाश मल्ल यांच्या काळात कपमारीची भव्य रथयात्रा सुरु झाली आणि कुमारी देवीसाठी घर बांधण्यात आले. ही परंपरा दरवर्षी इंद्रजत्रा सणाच्या वेळी थाटामाटात साजरी केली जाते. यावेळी कुमारी देवीची पूजा करुन लोक तिचा आशीर्वाद घेतात. तसेच इंद्रजत्रा उत्सवादरम्यान भगवान विष्णूच्या दहा आवतारांना आठ दिवस मुलीसमोर दाखवले जाते.
कुमारी देवी म्हणून निवड झाल्यानंतर तिला जमिनीला स्पर्श करण्याची परवागी नसते. तिला नेहमी पालखीतून नेले जाते. शिवाय देवीला दुसऱ्या देवतेला स्पर्श करण्यासही मनाई असते. घरातून वर्षात केवळ १३ वेळा बाहेर पडण्याची कुमारी देवीला परवानगी असते. तसेच पहिली मासिक पाळी आल्यानंतर कुमारी देवी म्हणून निवडण्यात आलेल्या मुलीची सेवा संपते. आज नेपाळमध्ये कुमारी देवी ही केवळ धार्मिक श्रद्धेचे प्रतीक नाही तर एक सांस्कृतिक ओळख बनली आहे.
‘हा खूप मोठा अपमान असेल…’, नोबेल पुरस्कारासाठी ट्रम्पची तडफड; सात युद्ध थांबवल्याचा पुन्हा एकदा दावा