'शांतता करार स्वीकारा नाहीतर...' ; डोनाल्ड ट्रम्प यांचा गाझा योजनेवर हमासला कडक इशारा (फोटो सौजन्य: नवराष्ट्री टीम)
डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी (२९ सप्टेंबर) व्हाइट हाइउसमध्ये इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netnyahu) यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी गाझा युद्धबंदीचा प्रस्ताव मांडला, ज्याला नेतन्याहूंनी सहमती दर्शवली. तसेच ट्रम्प यांनी मुस्लिम आणि अरब देशांसमोरही स्वतंत्रपण हा प्रस्ताव मांडला होता. दरम्यान यानंतर त्यांनी कतारच्या मध्यस्थीने हा प्रस्ताव हमाससमोर मांडला. यावर हमासने गांभीर्याने विचार करावा लागेल असे म्हटले.
‘हा खूप मोठा अपमान असेल…’, नोबेल पुरस्कारासाठी ट्रम्पची तडफड; सात युद्ध थांबवल्याचा पुन्हा एकदा दावा
सध्या ट्रम्प यांनी सांगितले की, इस्रायल, अरब देश, मुस्लिम देश अशा सर्व पक्षांनी त्यांच्या प्रस्तावावर स्वाक्षरी केली आहे. आता केवळ हमासच्या सहमतीची ते वाट पाहत आहे. ट्रम्प यांनी हमासला कडक इशारा दिला की, सर्व अरब आणि मुस्लिम देशांनी गाझा योजनेवर स्वाक्षरी केली आहे. आता फक्त हमासच्या सहमतीची गरज आहे. एकतर ते गाझा करारा मान्य करतील नाहीतर याचे त्यांना खूप गंभीर आणि वेदनादायी परिणाम भोगावे लागतील असे ट्रम्प यांनी म्हटले.
एका पॅलेस्टिनी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसरा, हमासने पॅलेस्टिनींच्या राजकीय आणि लष्करी अधिकाऱ्यांशी चर्चा सुरु केली आहे. सध्या हे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे असल्याने याला जास्त दिवल लागण्याची शक्यता आहे. शिवाय ट्रम्प यांनी मांडलेला प्रस्ताव हा हमासच्या अस्तित्वावर घाला घालणार आहे.
यामध्ये हमासला शस्त्रे आणि त्यांचे अड्डे सोडावे लागणार आहेत. तसेच गाझातील सरकारची स्थापना करताना देखील हमासच्या नेतृत्त्वाला वगळले जाणार आहे. यामुळे तज्ज्ञांच्या मते, हमास ट्रम्प यांचा प्रस्ताव मान्य करेल यामध्ये आशांका आहे.
भारत, चीन आणि रशियासह आठ अरब आणि मुस्लिम देशांनी गाझात शांततेच्या ट्रम्प यांच्या योजनेचे स्वागत केले आहे. जॉर्डन, कतार, संयुक्त अरब अमिराती, इंडोनेशिया, पाकिस्तान, तुर्की, सौदी अरेबिया आणि इजिप्तने या योजनेला समर्थन दिले आहे. सर्व देशांनी अमेरिकेसोबत प्रादेशिक शांतता भागीदारीसाठी पाठिंबा दिला आहे.
FAQs (संबंधित प्रश्न)
प्रश्न १. डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल हमास युद्धबंदीसाठी किती कलमी योजना आखली आहे?
ट्रम्प यांनी गाझामतील इस्रायल-हमास युद्ध रोखण्यासाठी २० कलमी योजना आखली आहे.
प्रश्न २. ट्रम्प यांनी हमासला काय इशारा दिला आहे?
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला त्यांच्या गाझात शांतता योजनेच्या प्रस्तावार प्रतिसाद देण्यासाठी ३-४ दिवसांची मुदत दिली आहे.
प्रश्न ३. ट्रम्प यांच्या योजनेला कोणाकडून पाठिंबा मिळाला आहे?
ट्रम्प यांच्या गाझा योजनेला भारतासह, चीन, रशिया आठ अरब आणि मुस्लिम देशांकडून पाठिंबा मिळाला आहे. तसेच इस्रायलनेही याला सहमती दर्शवली आहे.
ट्रम्प यांनी तयार केला गाझाचा नवीन नकाशा? सीमेवर इस्रायल बफर-झोनसह होणार ‘हे’ बदल, समजून घ्या






