Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nuclear Program: इराणचे शास्त्रज्ञ संपवले, आता Mojtaba Khameneiची पाळी? युद्धादरम्यान नेतान्याहू यांची पहिलीच प्रतिक्रिया

Israel-Iran War:इस्रायली पंतप्रधान नेतन्याहू यांनी इराण आणि हिजबुल्लाहविरुद्ध कारवाई सुरू ठेवण्याचा इशारा दिला, तसेच वरिष्ठ अणुशास्त्रज्ञांना मारण्याचा आणि युद्धात अमेरिकेशी समन्वय साधण्याचा इशारा दिला.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 13, 2026 | 10:17 AM
netanyahu claims iran nuclear scientists killed warns mojtaba khamenei marathi news

netanyahu claims iran nuclear scientists killed warns mojtaba khamenei marathi news

Follow Us
Follow Us:
  • अणुकार्यक्रमाला मोठा तडा
  • खामेनींना थेट धमकी
  • ट्रम्प-नेतान्याहू समन्वय

Iran Nuclear Scientists Killed Netanyahu Iran War Statement : मध्यपूर्वेतील युद्धाला (US-Israel Iran War) आता भयानक वळण मिळाले आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या भीषण संघर्षानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू (Benjamin Netanyahu) पहिल्यांदाच जगासमोर आले आणि त्यांनी इराणच्या नाड्या आवळल्याचा खळबळजनक दावा केला. एका सविस्तर पत्रकार परिषदेत बोलताना नेतान्याहू यांनी स्पष्ट केले की, इराण आता “पूर्वीसारखा राहिलेला नाही”. अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त कारवाईने इराणची कणा असलेली ‘आयआरजीसी’ (IRGC) आणि बासीज दलाचे कंबरडे मोडले आहे.

अणुशास्त्रज्ञांचा खात्मा: इराणचे स्वप्न धुळीला?

नेतान्याहू यांनी सर्वात मोठा दावा इराणच्या अणुकार्यक्रमाबद्दल केला आहे. त्यांच्या मते, इस्रायली गुप्तचर यंत्रणा आणि हवाई दलाने अशा अचूक ठिकाणी हल्ले केले आहेत, ज्यात इराणचे अनेक दिग्गज अणुशास्त्रज्ञ मारले गेले आहेत. हे तेच शास्त्रज्ञ होते जे इराणला अण्वस्त्र सज्ज करण्यासाठी अहोरात्र काम करत होते. इराण आपला अण्वस्त्र आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रम जगापासून लपवत होता, परंतु इस्रायलने तो कार्यक्रम आता कित्येक वर्षे मागे ढकलला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : KC-135 Tanker Crash: अमेरिकेचं महाकाय विमान कोसळलं! इराण युद्धादरम्यान मोठी दुर्घटना; 6 सैनिकांचा थरारक बचाव

मोज्तबा खामेनी केवळ ‘कठपुतळी’ – नेतान्याहूंचा घणाघात

इराणचे नवे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनी यांच्याबद्दल विचारले असता, नेतान्याहू यांनी अत्यंत खोचक टिप्पणी केली. त्यांनी मोज्तबा यांना “क्रांतिकारी रक्षकांचे (IRGC) कठपुतळी” असे संबोधले. इतकेच नाही तर, मोज्तबा खामेनी आता भीतीपोटी आपला चेहराही जगाला दाखवू शकत नाहीत, असा दावा त्यांनी केला. “आम्ही कोणत्याही दहशतवादी संघटनेच्या नेत्याला ‘जीवन विमा’ देत नाही,” असे म्हणत त्यांनी मोज्तबा खामेनी आणि हिजबुल्लाह प्रमुख नैम कासेम यांना थेट मृत्यूचा इशारा दिला आहे.

NEW – Netanyahu declares that the Iran War is not only turning Israel into a “regional superpower,” but into a “global superpower.” pic.twitter.com/WjxrJ12waI — Disclose.tv (@disclosetv) March 12, 2026

credit – social media and Twitter

ट्रम्प यांच्याशी ‘ओपन’ संवाद: युद्धाची नवी रणनीती

या युद्धात अमेरिकेची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. नेतान्याहू यांनी पुष्टी केली की, त्यांचे आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संबंध आता अधिक दृढ झाले आहेत. दोन्ही नेते युद्धाच्या प्रत्येक हालचालीवर नियमितपणे चर्चा करत आहेत. ट्रम्प प्रशासनाच्या पाठिंब्यामुळे इस्रायल आता अधिक आक्रमक झाला असून, इराणच्या आण्विक सुविधा पूर्णपणे नष्ट केल्याशिवाय इस्रायल थांबणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US Politics : ‘हे आधीही घडलं होतं…’ इराण युद्धावरून अमेरिकेच्या दोन बड्या नेत्यांमध्ये जुंपली; बोल्टन यांचा ‘घरचा आहेर’

हिजबुल्लाहला ‘मोठी किंमत’ मोजावी लागणार

केवळ इराणच नाही, तर लेबनॉनमधील हिजबुल्लाहवरही इस्रायलचे हल्ले सुरूच राहणार आहेत. २ मार्चपासून हिजबुल्लाहने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यांचा बदला म्हणून नेतान्याहू यांनी “जास्त किंमत” वसूल करण्याचे आश्वासन दिले आहे. लेबनीज सरकारला इशारा देताना ते म्हणाले की, जर त्यांना आपला देश वाचवायचा असेल, तर त्यांनी हिजबुल्लाहला रोखण्यासाठी पहिले पाऊल उचलावे, अन्यथा इस्रायल कोणाचीही गय करणार नाही.

💡

Frequently Asked Questions

  • Que: नेतान्याहू यांनी इराणच्या अणुकार्यक्रमाबद्दल काय दावा केला?

    Ans: नेतान्याहू यांनी सांगितले की इस्रायली हल्ल्यात इराणचे अनेक शीर्ष अणुशास्त्रज्ञ मारले गेले असून त्यांचा बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रम मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाला आहे.

  • Que: मोज्तबा खामेनी यांच्याबद्दल इस्रायलची भूमिका काय आहे?

    Ans: नेतान्याहू यांनी मोज्तबा खामेनींना 'कठपुतळी' म्हटले असून त्यांना आणि हिजबुल्लाह प्रमुखांना जीवे मारण्याची अप्रत्यक्ष धमकी दिली आहे.

  • Que: अमेरिका आणि इस्रायलमध्ये युद्धाबाबत समन्वय आहे का?

    Ans: होय, पंतप्रधान नेतान्याहू आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प युद्धाच्या रणनीतीवर नियमितपणे आणि मोकळेपणाने संवाद साधत आहेत.

Web Title: Netanyahu claims iran nuclear scientists killed warns mojtaba khamenei marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2026 | 10:17 AM

Topics:  

  • benjamin netanyahu
  • Hezbollah
  • US-Israel Iran War

संबंधित बातम्या

War Deaths : इराण युद्धाचा भारतावर कहर! अमेरिका-इस्रायलपेक्षा अधिक भारतीय कामगारांचा मृत्यू, अहवालामुळे खळबळ
1

War Deaths : इराण युद्धाचा भारतावर कहर! अमेरिका-इस्रायलपेक्षा अधिक भारतीय कामगारांचा मृत्यू, अहवालामुळे खळबळ

US-Iran Peace Talks: शांतता चर्चेला इराणने का दिले ‘Minab 168’ नाव? ट्रम्प यांच्या एका धमकीने स्वित्झर्लंड बैठकीत वातावरण तापले
2

US-Iran Peace Talks: शांतता चर्चेला इराणने का दिले ‘Minab 168’ नाव? ट्रम्प यांच्या एका धमकीने स्वित्झर्लंड बैठकीत वातावरण तापले

US-Iran Talks : ‘ते माझं ऐकत नाहीत अन् मी…’ ट्रम्पबद्दल नेतान्याहूंच्या एका विधानाने राजकीय वर्तुळात पुन्हा खळबळ
3

US-Iran Talks : ‘ते माझं ऐकत नाहीत अन् मी…’ ट्रम्पबद्दल नेतान्याहूंच्या एका विधानाने राजकीय वर्तुळात पुन्हा खळबळ

US-Iran Talks: अमेरिका-इराण चर्चेची पहिली फेरी पूर्ण; 60 दिवसांत अंतिम निर्णय; कतार अन् पाकिस्तानने सांगितली आतली बातमी
4

US-Iran Talks: अमेरिका-इराण चर्चेची पहिली फेरी पूर्ण; 60 दिवसांत अंतिम निर्णय; कतार अन् पाकिस्तानने सांगितली आतली बातमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.