Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 14 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Peace Talks Fail : शांतता चर्चेमागे मोठा कट! JD Vance ना नेतान्याहूंचा फोन अन् चर्चा फिसकटली; इस्लामाबादमध्ये नक्की काय घडले?

US-Iran War: इस्लामाबादमधील अमेरिका-इराण शांतता चर्चा फिसकटली आहे. इराणचा दावा आहे की, नेतान्याहू यांच्या एका फोन कॉलमुळे जे.डी. व्हान्स यांची भूमिका बदलली आणि २१ तासांची अथक मेहनत निष्फळ ठरली.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 13, 2026 | 12:41 PM
netanyahu phone call to jd vance us iran peace talks failure inside story 2026

netanyahu phone call to jd vance us iran peace talks failure inside story 2026

Follow Us
Follow Us:
  • चर्चेत इस्रायलची एन्ट्री
  • इराणचा खळबळजनक आरोप
  • विश्वासार्हतेचा अभाव

Benjamin Netanyahu call to JD Vance: जगाचे लक्ष लागून राहिलेली इस्लामाबादमधील अमेरिका-इराण शांतता चर्चा (US-Israel Iran War) अखेर कोणत्याही निर्णयाशिवाय विसर्जित झाली आहे. पण २१ तासांच्या या मॅरेथॉन चर्चेत नक्की काय घडलं, ज्यामुळे दोन्ही देश टोकाच्या भूमिकेवर आले? इराणने आता यामागची एक अत्यंत खळबळजनक ‘आतली कहाणी’ उघड केली आहे. इराणचा दावा आहे की, या चर्चेचे अपयश हे नैसर्गिक नसून तो इस्रायलने रचलेला एक जाणीवपूर्वक कट होता.

नेतान्याहूंचा तो ‘एक’ फोन आणि बदललेले वातावरण

इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी दिलेल्या माहितीनुसार, चर्चेच्या मध्यंतरात अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचा फोन आला. अराघची यांच्या मते, या फोन कॉलपूर्वी चर्चा सकारात्मक दिशेने जात होती, मात्र नेतान्याहू यांच्याशी बोलल्यानंतर जे.डी. व्हान्स यांचे वागणे आणि मागण्या अचानक बदलल्या. चर्चेचा मुख्य ओघ अमेरिका-इराण तणाव कमी करण्याऐवजी पूर्णपणे इस्रायलच्या हिताच्या मुद्द्यांकडे वळवण्यात आला. इराणने याला “चर्चा हायजॅक करणे” असे संबोधले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Atomic Threat : ‘अमेरिकाच जिंकेल!’ वाटाघाटी निष्फळ होताच ट्रम्पना राग अनावर; अणुबॉम्बवरून जगाला दिला युद्धाचा इशारा

अमेरिकेच्या “अवाजवी” मागण्या आणि इराणचा नकार

इराणने आरोप केला आहे की, अमेरिकेने या वाटाघाटींचा वापर इराणला नमवण्यासाठी केला. ज्या गोष्टी अमेरिकेला लष्करी कारवाईने किंवा निर्बंधांनी साध्य करता आल्या नव्हत्या, त्या गोष्टी आता ते टेबलावर बसून मागू लागले. यात प्रामुख्याने होर्मुझच्या सामुद्रधुनीवर नियंत्रण आणि इराणच्या शांततापूर्ण अणुकार्यक्रमावर कायमची बंदी घालण्याच्या जाचक अटींचा समावेश होता. इराणच्या निम-सरकारी ‘तस्निम’ वृत्तसंस्थेने म्हटले आहे की, इराणने आपल्या सार्वभौमत्वाशी तडजोड करण्यास नकार दिला, कारण अमेरिकेचा उद्देश शांतता नसून इराणला आत्मसमर्पण करायला लावणे हा होता.

🇮🇱🇺🇸 | We can only speculate about the scale of Israel’s influence over Donald Trump, when during negotiations in Islamabad, J.D. Vance receives a direct phone call from Benjamin Netanyahu – followed immediately by the collapse of the talks and a full team withdrawal. pic.twitter.com/W6b0OlouLs — Mr. Whale (@CryptoWhale) April 12, 2026

credit – social media and Twitter

विश्वासाचा अभाव: जुन्या जखमा पुन्हा ताज्या

इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिबाफ यांनी स्पष्ट केले की, इराणने चर्चेसाठी अत्यंत रचनात्मक आणि दूरदृष्टीचे प्रस्ताव दिले होते. मात्र, अमेरिकन शिष्टमंडळ इराणचा विश्वास संपादन करण्यात पूर्णपणे अपयशी ठरले. इराणला आधीच अमेरिकेच्या हेतूंबद्दल शंका होती, आणि नेतान्याहू यांच्या हस्तक्षेपामुळे या शंकेला पुष्टी मिळाली. गालिबाफ यांच्या मते, इराण दुसऱ्या पक्षाबद्दल आधीच सावध होता आणि जेव्हा अमेरिकेने आपली भूमिका बदलली, तेव्हा इराणने चर्चेतून माघार घेणेच योग्य समजले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Oil Price Hike: ‘पेट्रोलच्या किमती विसरू नका!’ ट्रम्प यांच्या नाकेबंदीला इराणचे ‘गणितीय’ उत्तर; अमेरिकेला रडवणारं समीकरण VIRAL

ट्रम्प यांची भूमिका आणि अनिश्चित भविष्य

दुसरीकडे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अद्याप नेतान्याहू यांच्या फोन कॉलवर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. ट्रम्प यांचे म्हणणे आहे की, अमेरिकेच्या दबावामुळेच इराण चर्चेला आला होता. चर्चा फिसकटली असली तरी, ट्रम्प यांनी पुन्हा एकदा करार होण्याची आशा व्यक्त केली आहे. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता दोन्ही देशांमधील दरी अधिक रुंदावली आहे. नेतान्याहू यांच्या हस्तक्षेपामुळे आता मध्य-पूर्वेतील तणाव केवळ इराण-अमेरिका पुरता मर्यादित न राहता, त्यात इस्रायलची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: इस्लामाबाद शांतता चर्चा अयशस्वी होण्याचे मुख्य कारण काय आहे?

    Ans: इराणच्या दाव्यानुसार, इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी जे.डी. व्हान्स यांना केलेल्या फोन कॉलमुळे अमेरिकेची भूमिका बदलली आणि चर्चा फिसकटली.

  • Que: इराणने अमेरिकेवर कोणते आरोप केले आहेत?

    Ans: अमेरिकेने इराणच्या सार्वभौमत्वावर घाला घालणाऱ्या आणि अवाजवी सामरिक मागण्या केल्याचा आरोप इराणने केला आहे.

  • Que: जे.डी. व्हान्स आणि नेतान्याहू यांच्या संभाषणाबाबत अमेरिकेची अधिकृत भूमिका काय?

    Ans: अमेरिकेने अद्याप या फोन कॉलच्या दाव्याला अधिकृतपणे दुजोरा दिलेला नाही किंवा तो फेटाळलेला नाही.

Web Title: Netanyahu phone call to jd vance us iran peace talks failure inside story 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2026 | 12:41 PM

Topics:  

  • benjamin netanyahu
  • US-Israel Iran War

संबंधित बातम्या

US Iran Conflict : ‘आम्ही संरक्षण करु, पण…,’ होर्मुझवर टोल वसूल करणार अमेरिका? इराणला रोखण्याचा दावा
1

US Iran Conflict : ‘आम्ही संरक्षण करु, पण…,’ होर्मुझवर टोल वसूल करणार अमेरिका? इराणला रोखण्याचा दावा

US-Iran War: इराणचा आखाती देशांमध्ये कहर! कुवेत, बहरीन आणि जॉर्डनवर ड्रोनचा पाऊस; लष्कराकडून हाय अलर्ट जारी
2

US-Iran War: इराणचा आखाती देशांमध्ये कहर! कुवेत, बहरीन आणि जॉर्डनवर ड्रोनचा पाऊस; लष्कराकडून हाय अलर्ट जारी

Bushehr Nuclear Plant: अमेरिकेने इराणचा मुख्य अणुप्रकल्प उडवला की नाही? मध्य पूर्वेतील तणावादरम्यान तेहरानचा सर्वात मोठा खुलासा
3

Bushehr Nuclear Plant: अमेरिकेने इराणचा मुख्य अणुप्रकल्प उडवला की नाही? मध्य पूर्वेतील तणावादरम्यान तेहरानचा सर्वात मोठा खुलासा

Lindsey Graham: ‘मृत्यूचा व्यापारी नरकात गेला!’ इराणी सोशल मीडियाने अमेरिकेचा केला अपमान; ट्रम्प, नेतन्याहूंना जीवे मारण्याची धमकी
4

Lindsey Graham: ‘मृत्यूचा व्यापारी नरकात गेला!’ इराणी सोशल मीडियाने अमेरिकेचा केला अपमान; ट्रम्प, नेतन्याहूंना जीवे मारण्याची धमकी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.