Netanyahu's secret plan on Israel-Iran war revealed war may reignite
Israel Iran War : जगातील दोन बलाढ्य देश इस्रायल आणि इराण यांच्यातील तणाव पुन्हा एकदा धगधगू लागला आहे. जून महिन्यात तब्बल १२ दिवस चाललेल्या युद्धानंतर काही काळ शांतता अनुभवायला मिळाली होती. मात्र, आता समोर आलेल्या खळबळजनक माहितीने जागतिक राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे.
इस्रायलने इराणच्या राजधानीतील एका गुप्त बैठकीवर थेट क्षेपणास्त्र हल्ला केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही बैठक इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची होती, ज्यात राष्ट्रपती मसूद पेझेश्कियान, संसदेचे अध्यक्ष आणि देशाचे मुख्य न्यायाधीश उपस्थित होते. या हल्ल्यात राष्ट्रपतींना किरकोळ दुखापत झाली असल्याचे सांगितले जात आहे, तर इतर वरिष्ठ नेते आपत्कालीन मार्गाने सुखरूप बाहेर पडण्यात यशस्वी ठरले.
हल्ल्याचे हे उद्दिष्ट ऐकून जगभरात चिंता आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका अति गुप्त बैठकीवर थेट हल्ला म्हणजे युद्धजन्य कृतीचा थेट इशारा मानला जात आहे. अनेक तज्ञांनी याला “राजकीय हेरगिरी आणि सैन्यदलांचा टोकाचा वापर“ असे म्हटले आहे. या हल्ल्यामागे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचा थेट हात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांच्या आदेशावरूनच हे गुप्त ऑपरेशन राबवले गेले, असा आरोप काही आंतरराष्ट्रीय विश्लेषकांनी केला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘काझमी बनले सीता, अश्मन झाले राम…’ पाकिस्तानच्या सभागृहात दुमदुमला नामघोष जय श्री राम
जून महिन्यात इस्रायल-इराण यांच्यात झालेल्या १२ दिवसांच्या युद्धाच्या दरम्यान अनेक रहस्ये उलगडली नाहीत. त्यातीलच हे एक मोठे प्रकरण असल्याचे मानले जात आहे. युद्ध थांबले तरी संघर्ष थांबलेला नाही. या दोन्ही देशांमध्ये गुप्त ऑपरेशन्स, सायबर हल्ले, आणि दहशतवाद्यांच्या माध्यमातून अप्रत्यक्ष युद्ध सुरूच आहे.
या हल्ल्यानंतर इराणकडून कडक प्रतिक्रिया येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रपतींवर हल्ला झाल्यानंतर इराणने आपल्या सैन्य दलांना सतर्कतेचा इशारा दिला असून, संभाव्य युद्धाच्या तयारीला सुरुवात केली आहे. इराणच्या रेवोल्युशनरी गार्ड्सने जाहीरपणे सांगितले आहे की, “आमच्यावर हल्ला करणाऱ्यांना शांत बसू देणार नाही. याचे परिणाम इस्रायललाही भोगावे लागतील.”
या घटनेनंतर अमेरिकेपासून युरोपियन युनियनपर्यंत अनेक राष्ट्रांनी चिंता व्यक्त केली आहे. या दोन्ही देशांमध्ये थेट युद्ध झाल्यास संपूर्ण मध्य-पूर्वेकडे महायुद्धाचे सावट येऊ शकते, जे संपूर्ण जगासाठी धोकादायक ठरेल. संयुक्त राष्ट्रसंघाने दोन्ही देशांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. मात्र, दोन्ही बाजूंनी घेतलेली आक्रमक भूमिका पाहता परिस्थिती पुन्हा एका मोठ्या संघर्षाकडे वाटचाल करत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ड्रोनसोबत फिरणार अमेरिकन सैनिक! पेंटागॉनच्या क्रांतिकारी निर्णयाने लष्करात नवा युगारंभ
हा हल्ला म्हणजे एक थेट युद्ध पुकारण्यासारखा प्रकार आहे. नेतान्याहूच्या नेतृत्त्वाखाली इस्रायलने ज्या प्रकारे इराणच्या गुप्त बैठकीला लक्ष्य केले, त्यामुळे ‘शांतता’ ही संज्ञा आता इतिहासजमा होऊ पाहत आहे. पुढील काही दिवस हे ठरवतील की ही ठिणगी पुन्हा एक महायुद्ध भडकवते की शांततेचा एक नवा प्रयत्न होतो.