Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 25 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US H1-B Visa : ट्रम्पच्या एच-१बी व्हिसा शुल्काबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी; या अर्जदारांना मिळणार सूट, जाणून घ्या नवे अपडेट

US H-1B Update : अमेरिकेने एच-१बी व्हिसा शुल्कात १ लाख अमेरिकन डॉलर पर्यंत वाढ केली आहे. हा नियन २१ सप्टेंबर पासून लागू झाला असून या व्हिसाचे काही नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहे. जाणून घ्या अपडेट्स...

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 21, 2025 | 01:24 PM
New guidelines issued regarding US H1-B Visa

New guidelines issued regarding US H1-B Visa

Follow Us
Follow Us:
  • एच-१बी व्हिसाचे नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी
  • काही अर्जदारांना मिळणार सवलत
  • जाणून घ्या नवीन अपडेट
US H1B Visa Rules : वॉशिंग्टन : अमेरिकेच्या एच-१बी व्हिसाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी १९ सप्टेंबर रोजी या व्हिसाच्या शुल्कात १ लाख अमेरिकन डॉलरपर्यंत वाढ केली होती. हा नियम २१ सप्टेंबर पासून लागू झाला आहे. नुकतेच या व्हिसाबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहे. यानुसार काही अर्जदारांना मोठी सूट मिळणार आहे.

H-1B Visa : ट्रम्प यांचा $100,000 व्हिसा शुल्क नियम आजपासून होणार लागू; भारतीयांना बसणार फटका

एच-१बी व्हिसा शुल्काबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे

अमेरिकेच्या गृहसुरक्षा विभागाने (DHS) एच-१बी व्हिसा शुल्काबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या नव्या मार्गदर्शक तत्त्वानुसार,

  • अमेरिकेत आधीपासून राहणाऱ्या परदेशी कर्मचाऱ्यांना इतर व्हिसा श्रेणीतून एच-१बी व्हिसासाठी स्विच करताना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.
  • तसेच अमेरिकेत आधीच राहणाऱ्या एच-१बी व्हिसा धारकांना त्यांचा व्हिसा कालावधी वाढवता येणार आहे, यासाठीही कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
  • हा नियम केवळ नव्या अर्जदारांसाठी असून, हा व्हिसा आधीपासून असलेल्या वैध-व्हिसाधारकांना कोणतेही निर्बंध पाळावे लागणार नाहीत.
  • तसेच यासाठी ऑनलाइन पेमेंट सिस्टम देखील सुरु करण्यात आली आहे.

ट्रम्प यांच्या आदेशाविरोधात न्यायालयात खटला दाखल

याच वेळी अमेरिकेची व्यावसायिक संघटना यूएस चेंबर ऑफ कॉमर्सने देखील यावर स्पष्टीकर दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, नव्या शुल्काविरोधात ट्रम्प प्रशासनावर खटला दाखल करण्यात आला आहे. या संघटनेच्या मते, एवढे मोठे शुल्क अमेरिकन कंपन्यांसाठी अन्यायकारक आहे. यामुळे कंपन्यांचा खर्च वाढेल, तसेच परदेशी कुशल कामगारांची भरती कमी होईल. यामुळे ट्रम्प यांचा आदेश हा कायदेशीररित्या चुकीचा असल्याचे संघटनेने म्हटले आहे. संघटनेच्या मते, ट्रम्प यांच्या निर्णयाचा फायदा अमेरिकेच्या आर्थिक प्रतिस्पर्धींना होत आहे.

व्हाइट हाउसची प्रतिक्रिया

दरम्यान ट्रम्प यांच्या निर्णयानंतर व्हाइट हाउसने एक निवदेन जारी केले होते. यामध्ये स्पष्ट करण्यात आले होते की, हे शुल्क केवळ नव्या एच-१बी व्हिसा अर्जदारांसाठी लागू होणार आहे. हा निर्णय अमेरिकेतील नागरिकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी घेण्यात आला होता. ट्रम्प प्रशासनाच्या मते, अनेक मोठ्या आयटी कंपन्या परदेशी लोकांना अमेरिकन अधिकाऱ्यांना मिळणाऱ्या पगाराच्या तुलनेत कमी पगारावर कामावर ठेवत आहेत. यामुळे अमेरिकन नागरिकांना नोकरीच्या संधी उपलब्ध नाही. पण H-1B व्हिसा शुल्क वाढीमुळे कंपन्या परदेशी लोकांना घेणे टाळतील आणि देशातील तरुणांना संधी देतील असे युक्तीवाद आहे.

FAQs(संबंधित प्रश्न)

प्रश्न १. ट्रम्प प्रशासनाचा एच-१बी व्हिसा शुल्क वाढीचा आदेश कधीपासून लागू झाला आहे?

ट्रम्प प्रशासनाचा एच-१बी व्हिसा शुल्क वाढीचा आदेश १९ सप्टेंबर २०२५ रोजी जारी करण्यात आला होता. हा २१ सप्टेंबर २०२५ पासून लागू झाला असून आजही आमंलात आहे.

प्रश्न २. एच-१बी व्हिसा नियमांत कोणते नवे बदल करण्यात आले आहेत?

एच-१बी व्हिसा शुल्कात काही अर्जदारांना सूट देण्यात आली आहे.

प्रश्न ३. ट्रम्प यांनी एच-१बी व्हिसा शुल्कात का वाढ केली?

ट्रम्प यांच्या एच-१बी व्हिसा शुल्कात वाढ करण्यामागे देशात नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे आणि या व्हिसाचा गैरवापर रोखणे असा हेतू आहे.

‘ते फक्त स्वप्नच बघू शकतात’ ; इराण अणु प्रकल्पाला नष्ट करण्याच्या ट्रम्पच्या दाव्याची खामेनेईंनी उडवली खिल्ली

Web Title: New guidelines issued regarding us h1 b visa know the latest update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2025 | 01:21 PM

Topics:  

  • America
  • H-1B Visa
  • World news

संबंधित बातम्या

Breaking News: ये दोस्ती हम नही तोडेंगे ;रशियाचा पहिला डिझेलचा टँकर अमेरिकेच्या दिशेने रवाना
1

Breaking News: ये दोस्ती हम नही तोडेंगे ;रशियाचा पहिला डिझेलचा टँकर अमेरिकेच्या दिशेने रवाना

UNGA2026: संयुक्त राष्ट्र महासभेत भारताची मोठी घोषणा; भारताच्या अणुतंत्रज्ञानाचा जगाला होईल फायदा, अनेक देशांनी मानले आभार
2

UNGA2026: संयुक्त राष्ट्र महासभेत भारताची मोठी घोषणा; भारताच्या अणुतंत्रज्ञानाचा जगाला होईल फायदा, अनेक देशांनी मानले आभार

Defense News: सौदीनंतर आफ्रिकेतही भारतीय लष्कराचा डंका; 600 नायजेरियन सैनिकांना भारतात मिळणार जंगल अन् पर्वतीय युद्धाचे धडे
3

Defense News: सौदीनंतर आफ्रिकेतही भारतीय लष्कराचा डंका; 600 नायजेरियन सैनिकांना भारतात मिळणार जंगल अन् पर्वतीय युद्धाचे धडे

Be Ready UK : ब्रिटनमध्ये 2026 साठी महासंकटाची चाहूल? तीन दिवस पुरेल इतका साठा घरी ठेवण्याचा सरकारी सल्ला
4

Be Ready UK : ब्रिटनमध्ये 2026 साठी महासंकटाची चाहूल? तीन दिवस पुरेल इतका साठा घरी ठेवण्याचा सरकारी सल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.