New York Moves to Allow Terminally Ill People to Die on Their Own Terms 'Right To Die' Bill Passed by New York Assembly
न्यूयॉर्कच्या राज्य विधानसभेने सोमवारी (०९ जून) एक महत्त्वपूर्ण विधेयकाला मंजूरी दिली आहे. ‘Right TO Die’ हे विधेयक न्यूयॉर्कच्या राज्य विधानसभेत मंजूर करण्यात आले आहे. याअंतर्गत आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांना, रुग्णांना औषधाद्वारे त्यांचे जीवन संपवण्याचा कायदेशीर अधिक देण्यात आला आहे. यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. अनेक लोकांनी या विधेयकाला तीव्र निषेध केला आहे.
हा प्रस्ताव राज्यपाल कॅथी होचुल यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. या विधेयकानुसार, आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला त्याच्या इच्छा असेल तर आयुष्य संपवण्याचा अधिकार आहे. डॉक्टरांच्या संमतीनंतर जीवन संपवणारी औषधे घेण्याची परवानगी या कायद्यांतर्गत देण्यात आली आहे. गव्हर्नर होचुल यांच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, होचुल विधेयकाचा आढावा घेतील आणि सर्व पैलूंचा विचार करुन निर्णय घेतील.
सोमवारी (९ जून) रात्री न्यूयॉर्क सिनेटमध्ये राइट टू डाय विधेयकावर दीर्घ चर्चा झाली. या दीर्घ चर्चेनंतर सिनेटने हे विधेयक मंजूर केले. या विधेयकाच्या समर्थकांनी हा कायदा अशा लोकांना पर्याय आहे ज्यांना स्वत:हून आणि सन्मानाचे अंतिम निर्णय घेण्याची इच्छा असलेल्या लोकांसाठी असल्याचे म्हटले आहे. डेमोक्रॅटिक सिनेटर आणि विधेयकाचे समर्थ ब्रॅंड होयलमन-सीगेल यांनी दु:ख संपवण्याचा एक मार्ग असल्याचे म्हटले आहे.
राइट टू डायच्या या विधेयकाला तीव्र निषेधही करण्यात येत आहे. विधेयकाला विरोधक करणाऱ्या काही नेत्यांनी आणि संघटनांनी, राज्याने उचचले हे पाऊल योग्य नसल्याचे म्हटले आहे. तसेच रिपब्लिकन सिनेटर जॉर्ज बोरेलो यांनी राज्याने जीवन जीवन संपवण्याची मान्यता देणारे कायदे करु नयेत असेल म्हटले आहे.
एप्रिलच्या अखेरीस राज्य विधानसभेने हा ठराव मंजूर केला. या Right To Die विधेयकानुसार, गंभीर आजारी लोकांना डॉक्टरांच्या सहमतीने सहा महिन्यांच्या आता निर्णय घेऊ शकतात. त्यांना जीवन संपवण्यासाठी औषधांसाठी डॉक्टरांची लेखी विनंती घ्यावी लागले.
रुग्णावर कोणताही दबाव आणला गेला नाही याची खात्र करण्यासाठी विनंतीपत्रावर दोन साक्षीदारांच्या स्वाक्षऱ्या देखील आवश्यक असतील. यानंतर रुग्णाच्या मुख्य डॉक्टर आणि सल्लागार डॉक्टरांच्या मंजूरीनंतर त्यांना जीवन संपवण्याचा अधिकार मिळेल.
मिळालेल्या माहितीनुसार, न्यूयॉर्कमध्ये हा कायदा पिहल्यांदा २०१६ मध्ये सादर करण्यात आला होता. परंतु दरवर्षी या काय्दायवर निधानसभेत रोख लावण्यात आली. परंतु सोमवारी (९ जून) या विधेयकाला मंजुरी मिळाली आहे. अशी माहिती विधेयकाचे प्रस्तावक ब्रॅड हॉइलमन-सीगेल यंनी दिली.