धक्कादायक! ऑस्ट्रियात शाळेत विद्यार्थ्याकडून अंदाधुंद गोळीबार; 9 जणांचा मृत्यू (फोटो सौजन्य: सोशल मीजडिया)
व्हिएन्ना: एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ऑस्ट्रियाच्या ग्राझमध्ये एका शाळेत गोळीबाराची घटना घडली आहे. ऑस्ट्रिया प्रेस एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, या गोळीबारात ७ विद्यार्थ्यांसह ९ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच गोळीबारात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एका विद्यार्थ्यांने हा गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण ऑस्ट्रियात खळबळ उडाली आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शाळेतील एक विद्यार्थी शाळेत बंदूक घेऊन आला होता. या विद्यार्थ्याने अचानक अंदाधुंद गोळी झाडण्यास सुरुवात केली. यानंतर त्याने सॉशरुममध्ये जाऊन स्वत:वर गोळी झाडून जीव घेतला.
स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक वेळेननुसार, सकाळी १० वाजता ही घटना घडली. शाळेच्या इमारतीतून लोकांना गोळीबाराचे आवाज ऐकू येऊ लागले. यानंतर लोकांनी लगेच पोलिसांनी या घटनेची माहिती दिली. स्थानिक पोलिसांनी लोकांना त्या भागापासून दूर राहण्याचे आणि अधिकाऱ्यांच्या सुचनांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इतर विद्यार्थी आणि शिक्षकांना शाळेतूीन सुरक्षित बाहेर काढण्यात आले असल्याचे सांगतिले. तसेच परिस्थिती नियंत्रणात आली आहे.
🚨🇦🇹 Multiple fatalities in Graz, Austria as gunman goes on shooting rampage in school – reports of 30-40 shots fired.
This is unbearably horrific – Europe is not ok ‼️ pic.twitter.com/Tn7akHUF6a
— Concerned Citizen (@BGatesIsaPyscho) June 10, 2025
ग्राझ शहराचे महापौर एल्के यांनी या घटनेवर खेद व्यक्त केला. तसेच त्यांनी सांगतिले की, मृतांमध्ये ७ विद्यार्थ्यांचा आणि एक कर्मचारी आणि एका गुन्हेगाराचा समावेश आहे. गोळ्या झाडणारा विद्यार्थी गुन्हेगार होता. सध्या या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी स्पेशल टास्क फोर्स तैनात करण्यात आले आहे.
ऑस्ट्रियाचे गृहमंत्री देखील ग्राझला रवाना झाले आहे. तसेच स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी पालकांना शांत राहण्याचे आणि फवांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. या गोळीबारात काही लोक जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णलायता दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या या घटनेची चौैकशी सुरु करण्यात आली आहे. गुन्हेगाराने गोळीबारानंतर स्वत:चा जीव घेतल्याने या हल्ल्यामागचे कारण सध्या अस्पष्ट आहे.
+++Aktuell läuft in der Dreierschützengasse in #Graz ein Polizeieinsatz. Bitte an die Anweisungen der Polizeikräfte halten. +++ #graz1006
— Polizei Steiermark (@PolizeiStmk) June 10, 2025