
niger niamey air base terrorist attack 20 killed video viral 2026
Niamey airport terrorist attack video : पश्चिम आफ्रिकेतील नायजर देश (Niger air base) सध्या जिहादी दहशतवादाच्या आगीत होरपळत आहे. राजधानी नियामी येथील अत्यंत सुरक्षित मानल्या जाणाऱ्या ‘डिओरी हमानी’ (Diori Hamani) आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील हवाई दलाच्या तळावर बुधवारी मध्यरात्री सशस्त्र दहशतवाद्यांनी भीषण हल्ला चढवला. या हल्ल्याने संपूर्ण परिसर हादरून गेला असून, गोळीबार आणि स्फोटांचे भयानक व्हिडिओ आता समोर आले आहेत.
नायजरच्या राज्य प्रसारकाने दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला बुधवारी रात्री उशिरा झाला. हल्लेखोर मोठ्या संख्येने मोटारसायकलवरून आले होते. त्यांनी विमानतळाच्या धावपट्टीला लागून असलेल्या हवाई दलाच्या तळाला वेढा घातला. एकापाठोपाठ एक झालेल्या स्फोटांमुळे परिसरात घबराट पसरली. स्थानिक रहिवासी सांगतात की, सुमारे दोन तास अखंड गोळीबाराचा आवाज येत होता. सुरक्षा दलांनी तात्काळ मोर्चा सांभाळत हल्लेखोरांना घेराव घातला. या चकमकीत २० दहशतवादी जागीच ठार झाले, तर ११ जणांना जिवंत पकडण्यात यश आले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India-EU FTA: भारताच्या एका सहीने होणार पाकिस्तान कंगाल? 1 कोटी लोकांच्या नोकऱ्या धोक्यात; ‘या’ महाकरारामुळे इस्लामाबादमध्ये खळबळ
तज्ज्ञांच्या मते, हा हल्ला अत्यंत विचारपूर्वक आखला गेला होता. नायजरने अलीकडेच अल-कायदा आणि इसिस (ISIS) सारख्या गटांशी लढण्यासाठी अत्याधुनिक ड्रोन खरेदी केले आहेत. हे ड्रोन या तळावर तैनात होते. दहशतवाद्यांना हे ड्रोन नष्ट करायचे होते कारण यामुळे त्यांच्या कारवायांना लगाम बसत होता. साहेल कार्यक्रमाचे प्रमुख उल्फ लेसिंग यांच्या मते, हे ड्रोन दोन्ही बाजूंच्या युद्धासाठी ‘गेम चेंजर’ ठरत असल्यानेच दहशतवाद्यांनी हे धाडस केले.
Very heavy gunfire these moments at the international airport in Niamey, capital of Niger. pic.twitter.com/dWUIbaI5sc — Brant (@BrantPhilip_) January 29, 2026
credit – social media and Twitter
या भीषण चकमकीत केवळ लष्करी मालमत्ताच नाही, तर नागरी विमानांचेही नुकसान झाले आहे. ‘एअर कोट डी’आयव्होअर’ (Air Côte d’Ivoire) या पश्चिम आफ्रिकन एअरलाइन्सने फेसबुकवर काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये त्यांच्या एका पॅसेंजर विमानाला गोळी लागल्याचे स्पष्ट दिसत आहे. विमानाचा उजवा पंख आणि फ्यूजलेज (Fuselag) गोळ्यांच्या वर्षावामुळे छिन्नविच्छिन्न झाले आहे. या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय उड्डाणांचे वेळापत्रक कोलमडले असून नियामी शहरात हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US-Iran War: ‘शरणागती नाही, युद्धच!’ अमेरिकेचा इराणला 3 बाजूंनी वेढा, 6 विनाशक नौका; ट्रम्प यांच्या अटींनी आखात पेटले
नायजरमध्ये २०२३ मध्ये झालेल्या सत्तापालटानंतर सुरक्षेची स्थिती बिघडली आहे. बुर्किना फासो आणि माली या शेजारील देशांप्रमाणेच नायजरमध्येही आता लष्करी राजवट आहे. गेल्या काही महिन्यांत अल-कायदा आणि इस्लामिक स्टेटशी संबंधित गटांनी साहेल प्रदेशात आपले पाय पसरले आहेत. पश्चिमेकडील देशांची मदत बंद झाल्यामुळे नायजरला आता स्वतःच्या हिमतीवर या कट्टरपंथीयांशी दोन हात करावे लागत आहेत.
Ans: हा हल्ला नायजरची राजधानी नियामी येथील 'डिओरी हमानी' आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील हवाई दलाच्या तळावर झाला.
Ans: दहशतवाद्यांनी नायजरच्या हवाई दलाकडे असलेल्या प्रगत 'ड्रोन' यंत्रणेला आणि लष्करी विमानांना लक्ष्य केले होते.
Ans: सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत २० दहशतवादी मारले गेले आहेत, तर ४ सैनिक जखमी झाले आहेत.