भारत-ईयू करारामुळे पाकिस्तानमध्ये १ कोटी लोक बेरोजगार होऊ शकतात, अर्थव्यवस्था ठप्प होऊ शकते, पाकिस्तानी नेत्याचा इशारा ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Pakistan economy collapse India EU deal : जागतिक व्यापाराच्या नकाशावर भारताने एक अशी खेळी खेळली आहे, ज्याचे पडसाद शेजारील देश पाकिस्तानात उमटू लागले आहेत. २७ जानेवारी रोजी नवी दिल्लीत भारत आणि युरोपियन युनियन (EU) यांच्यात झालेल्या ‘मुक्त व्यापार करारावर’ (FTA) स्वाक्षरी झाल्यानंतर पाकिस्तानच्या गोटात दहशतीचे वातावरण आहे. पाकिस्तानचे माजी वाणिज्य मंत्री आणि दिग्गज उद्योगपती गौहर एजाज यांनी आपल्या सरकारला अत्यंत गंभीर इशारा दिला आहे. त्यांच्या मते, या करारामुळे पाकिस्तानची अर्थव्यवस्था पूर्णपणे ठप्प होऊ शकते.
गौहर एजाज यांनी ‘एआरवाय न्यूज’शी बोलताना धक्कादायक दावा केला आहे. ते म्हणाले, “भारत आणि युरोपमधील हा करार ‘सर्व करारांची जननी’ (Mother of all deals) आहे. यामुळे पाकिस्तानच्या कापड (Textile) उद्योगाला ९ अब्ज डॉलर्सचा फटका बसेल. परिणामी, कापड उद्योगाशी संबंधित १ कोटीहून अधिक लोकांचा रोजगार एका झटक्यात जाऊ शकतो.” पाकिस्तानसाठी युरोप ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे, पण आता तिथे भारताचे वर्चस्व निर्माण होणार असल्याने पाकिस्तानी मालाला कुणीही विचारणार नाही, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World Politics: जगाला दोन तुकड्यांत विभागू नका! UN Chief यांनी ‘या’ दोन महासत्तांना धारेवर धरले; भारताचे मात्र तोंडभरून कौतुक
आतापर्यंत पाकिस्तानला युरोपात व्यापार करण्यासाठी काही विशेष सवलती (GSP+) मिळत होत्या. मात्र, भारत-ईयू करारामुळे भारताला आता युरोपीय बाजारपेठेत ‘शून्य-कर’ (Zero-Tax) सुविधेसह प्रवेश मिळणार आहे. भारतीय मालाचा दर्जा आणि स्पर्धात्मक किंमत यामुळे पाकिस्तानी उद्योगांना बाजारपेठेत टिकणे अशक्य होईल. एजाज यांनी शाहबाज शरीफ सरकारला खडसावले आहे की, जर देशांतर्गत उद्योगांना स्वस्त वीज आणि गॅस दिला नाही, तर पाकिस्तानचा उद्योग शेजारील देशांच्या (भारत) बरोबरीने कधीच टिकू शकणार नाही.
Pakistan’s former commerce minister Gohar Ejaz says India, EU FTA has put “employment of over 10 million people in Pakistan at risk”, even as the Pakistani foreign ministry said they are ‘aware’ of the FTA: pic.twitter.com/cbbSKhKzUx — Sidhant Sibal (@sidhant) January 30, 2026
credit – social media and Twitter
भारत आणि युरोपियन युनियनमधील या वाटाघाटी गेल्या २० वर्षांपासून रखडल्या होत्या. अखेर जानेवारी २०२६ मध्ये हा अडथळा दूर झाला. या करारामुळे केवळ व्यापारातच वाढ होणार नाही, तर तंत्रज्ञान हस्तांतरण आणि गुंतवणुकीचे नवीन मार्ग मोकळे होतील. यामुळे भारताच्या निर्यातीला मोठी गती मिळणार असून, युरोपीय देशांनाही भारतीय बाजारपेठेत स्वस्त दरात उत्पादने उपलब्ध होतील.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : China Coup : चीनमध्ये सत्तापालटाचा थरार! दोन बड्या जनरल्सना बेड्या; लष्कराने थेट शी जिनपिंग यांनाच दिले आव्हान
या करारामुळे केवळ पाकिस्तानच नाही, तर जगातील इतर महासत्तांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. भारताचे युरोपशी वाढते आर्थिक संबंध पाहून अमेरिकेने आपली नाराजी व्यक्त केली आहे, तर तुर्कीच्या तज्ज्ञांनीही त्यांच्या व्यापारावर होणाऱ्या परिणामांबाबत चिंता व्यक्त केली आहे. मात्र, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील भारत हा करार आपल्या ‘विकसित भारत २०४७’ या मोहिमेचा महत्त्वाचा भाग मानत आहे.
Ans: हा भारत आणि २७ युरोपीय देशांमधील असा करार आहे ज्याद्वारे दोन्ही बाजूंनी आयात-निर्यात होणाऱ्या वस्तूंवर कोणताही कर (Tax) लागणार नाही, ज्यामुळे व्यापार वाढेल.
Ans: पाकिस्तानचा कापड उद्योग युरोपवर अवलंबून आहे. आता भारताला शून्य कर सवलत मिळाल्याने भारताचा माल स्वस्त होईल आणि पाकिस्तानचा ९ अब्ज डॉलर्सचा उद्योग स्पर्धा करू शकणार नाही.
Ans: पाकिस्तानच्या कापड उद्योगात सर्वाधिक रोजगार आहे. निर्यात कमी झाल्यामुळे कारखाने बंद पडतील आणि १ कोटीहून अधिक लोकांच्या नोकऱ्या जातील, असा इशारा गौहर एजाज यांनी दिला आहे.






