Nigeria Benue Massacre Brutal attack by gunmen 100 people killed
Nigeria News Marathi: नायजेरियातून एक मोठी घटना समोर येत आहे. शनिवारी (१४ जून) पहाटे नायजेरियातील बेन्यू राज्यातील येलेवाचात येधे बंदूकधारकांकडून हल्ला करण्यात आला. या अंदाधुंद गोळीबारात १०० जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती ॲम्नेस्टी इंटरनॅशनलने दिली. या घटनेमुळे नायजेरियात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ॲम्नेस्टी इंटरनॅशनलने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर या घटनेसंबंधी एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात सांगण्यात आले आहे की, नायजेरियाच्या बेन्यू राज्यात येलेवाटाच बंदूकधारकांकडून अंदाधूंद गोळीबार करण्यात आला. शनिवारी पहाटे ही घटना घडली. यामध्ये १०० जणांचा मृत्यू झाला आहे.
तसेच अनेक लोक अद्याप बेपत्ता आहे, डझनभर लोक जखमी झाले आहे. लोकांपर्यंक वैद्यकीय सेवा पोहचणे कठीण झाले आहे. निवदेनात दिलेल्या माहितीनुसार, अनेक कुटुंबांना त्यांच्या घरात बंद करुन जिंवत जाळण्यात आले आहे. या घटनेने संपूर्ण नायजेरियात दहशतीचे वातावरण पसरलेले आहे.
गेल्या काही काळात नायजेरियाच्या बेन्यू राज्यात हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ॲम्नेस्टी इंनटरनॅशनलने दिलेल्या माहितीनुसार, कोणत्याही भीतीशिवाय लोकांची हत्या केली जात आहे. या बंदूकधारी दहशतवाद्यांविरोधात कडक कारवाईची मागणी केली जात आहे, परंतु अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांचे विस्थापन होत आहे. या परिसरात अन्न सुरक्षा देखील धोक्यात आली आहे.
The Nigerian authorities must immediately end the almost daily bloodshed in Benue state and bring the actual perpetrators to justice.
The horrifying killing of over 100 people by gunmen that invaded Yelewata; from late Friday into the early hours of Saturday 14 June 2025, shows…
— Amnesty International Nigeria (@AmnestyNigeria) June 14, 2025
जमिनीचे वाद, धार्मिक आणि वाशिंक तणावांमुळे बेन्यूत हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. बेन्यू राज्य हे नायजेरियाच्या मध्यवर्थी पट्टीत स्थित आहे. बेन्यू राज्यात मुस्लिम समुदाय आणि ख्रिश्चन लोकांचा समावेश आहे. या भागात जमिनीच्या वापरावरुन मोठे वाद होते आहे. यामुळे सामान्य शेतकरी, गुराखी यांच्यावर अन्याय होत आहे. तसेच वाशिंक आणि धार्मिक वादही या भागात मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
गेल्या कीह महिन्यांत नायजेरियात या वादांमुळे ५०० हून अधिक लोकांचा बळी गेला आहे. बेन्यूच्या ग्वेर वेस्ट जिह्ल्यात मेंढपाळांच्या ४२ लोकांचा मृत्यू झाला आहे. एक महिन्यापूर्वीच्या या घटनेनंतर पुन्हा एकदा नायजेरियात हिंसाचाराची घटना घडली आहे. २०१९ पासून हिंसक संघर्षात वाढ झाली आहे. आतापर्यंत सुमारे २२ लाखो लोकांनी नायजेरियातून स्थलांतर केले आहे.