महात्मा गांधी आणि त्यांच्या पणतू आशिष लता रमागोबिन (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. महात्मा गांधीजींची पणतू आशिष लता रमागोबिन यांना सात वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या न्यायालयाने फसवणुकीच्या आरोपाखाली ही शिक्षा सुनावली आहे. आशिष ही लता गांधी यांची नात इला गांधी यांची मुलगी आहे. दक्षिण आफ्रिकेच्या डरबन न्यायालयात सुनावणी सुरु होती. त्यांच्यावर एका व्यावसायिकाला फसवल्याचा आरोप होता.
आशिष लता रमागोबिन यांच्यावर व्यावसायिक ए. आर. महाराज यांनी सुमारे ६.२ मिलियन रॅंड म्हणजेच सुमारे ३.२२ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला होता. हा आरोप सिद्ध झाला असून त्यांना या आरोपाखाली सात वर्षाचा तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
रामगोबिन यांनी दावा केला होता की, भारतातून रुग्णालय समूहासाठी आयात केल्या जाणाऱ्या तीन कंटेनरमध्ये लिनेनसाठी माल आणला जात आहे. यासाठी कस्टम ड्युटी आणि आयात शुल्क भरण्यासाठी त्यांना पैशाची गरज होती. यासाठी त्यांनी बनावट कागदपत्रे, खोटे चलन, खरेदी आदेश आणि बॅंकेचे बनावट कागदपत्रे सादर केली होती.
एसआर महाराज यांनी त्यांच्या गांधी कुटुंबातील पार्श्वभूमीमुळे त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि आशिष लता यांना ३.२२ कोटींची मदत देऊ केली. परंतु त्यांना जेव्हा लक्षात आले की असा कोणताही माल किंवा शिपमेंट अस्तित्वात नाही. तसेच सर्व कागदपत्रे बनवटा आहेत त्यावेळी त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.
दरम्यान दक्षिण आफ्रिकेच्या रामगोबिन यांना दोषी ठरवले आहे. या सहा वर्षे जुन्या प्रकरणा त्यांना सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा देण्यात आली आहे. याशिवाय त्यांना दोषनिर्याविरुद्ध अपील करण्याची परवानगी देखील नाकारण्यात आली आहे.
आशिष लता रामगोबिन या प्रसिद्ध मानवाधिकार कार्यकर्त्या इला गांधी आणि दिवंगत मेवा रामगोबिन यांच्या कन्या आहेत. तसेच आशिष लता या पार्टिसिपेटिव्ह डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह नावाच्या एनजीओच्या संस्थापक आणि कार्यकारी संचालक होत्या. त्या स्वत:ला पर्यावरणीय, सामाजिक आणि राजकीय सुधारणा करणाऱ्या कार्यकर्त्या म्हणून संबोधतात. त्यांच्याव्यतिरिक्त महात्मा गांधींच्या कुटुंबातील अनेक लोक मानवाधिकार कार्यकर्ते म्हणून देखील कार्य करतात. त्यांची आई लता इला यांना देखील जगभरात त्यांच्या समाजिक कार्यासाठी ओळखले जाते. भारत आणि दक्षिण आफ्रिकेत त्यांना मोठा सन्मान दिला जातो.
या घटनेनंतर महात्मा गांधींच्या पणतू आशिष लता रामगोबिन यांच्यावर लोकांनी तीव्र संताप व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर त्यांना ट्रोल केले जात आहे. अनेकांनी गांधींजींचे कुटुंब पहिल्यापासूनच भष्ट्राचारी होते असे म्हटले आहे. तसेच गांधींची हत्या करणाऱ्या गोडसेला आम्ही सलाम करतो, त्याने अत्यंत चांगले काम केले आहे असे लोकांनी म्हटले आहे. तर अनेकांनी दक्षिण आफ्रिकेतील लोक गांधींजींना देव मानतात आणि त्यांच्याच वंशजाने त्यांचे नाव खराब केले असल्याचे म्हटले आहे.