
Nigerian soldiers firing on women protesters killed 9, 10 injured
Thailand Cambodia संघर्षामुळे दशलक्ष लोक घरे सोडून पळाली ; सीमेवर दोन दिवसांपासून गोळीबार सुरुच
मिळालेल्या माहितीनुसार, नायजेरियाच्या नायजेरियाच्या अदमावा परिसरात बाचामा आणि चोबो समुदायांमध्ये दीर्घकाळापासून जमिवनीवरुन वाद सुरु आहे. प्रशासनाने या भागात कफ्यू लागू केला आहे. मात्र सुरक्षा दलांकडून याची कोणतीही अमंलबजावणी झालेली नाही. यामुळे संघर्ष वाढत आहे. दरम्यान परिसरात सुरु असलेल्या सांप्रदायिक आणि स्थानिक संघर्षाला हातळण्याचे सैन्याचे धोरण चुकीचे असल्याचा आरोप महिलांना केला असून या विरोधात त्यांचे शांततापूर्ण आंदोलन सुरु होते. परंतु या महिला आंदोलकांवर सैन्याने गोळीबार केला. ज्यामध्ये 9 महिलांचा मृत्यू झाला तर 10 जण जखमी झाल्या आहेत.
प्रत्यक्षदर्शनी आणि मृतांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार महिलांचे मुख्य रस्त्यावर शांततापूर्ण आंदोलन सुरु होते. यावेळी महिलांना सैनिकांच्या वाहनांना रोखून धरले. याचदरम्यान एका सैनिकाने महिलांना हटवण्यासाठी आधी हवेत गोळी झाडली. यानंतर आंदोलकांवर गोळीबार सुरु केला. यामुळे महिलांनी भीतीने जीव वाचवण्यासाठी पळण्याचा प्रयत्न केला. मात्र सैनिकांनी जोरदार गोळीबार सुरुच ठेवला होता.
दरम्यान नायरेजियन सैन्याने हे संपूर्ण आरोप नाकारले असून त्यांनी कोणलाही मारले नसल्याचे म्हटले आहे. नायजेरियन सैनिकांनी यासाठी स्थानिक मिलिशिया गटाला जबाबदार धरले आहबे. मात्र एममनेस्टी इंटरनॅशनलने प्रत्यक्षदर्शनींच्या साक्षीवर आणि पीडीतांच्या कुटुंबाच्या साक्षींच्या आधारावर नायजेरियन सैनिकांनी गोळीबार केला असल्याचे म्हटले आहे.
नायजेरियात संघर्षाची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील नायजेरियन आंदोलकांना बलपूर्वक हटवण्यासाठी त्यांच्यावर गोळीबाराच्या, अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. यापूर्वी २०२० मध्ये लागोसमध्ये पोलिसांच्या अत्याचाराविरोधात आंदोलन सुरु झाले होते. यावेळी देखील सैनिकांनी आंदोलकांवर गोळीबार केला होता. सध्या पुन्हा अशीच घटना घडल्याने नायजेरियातील लोकांचा सुरक्षा आणि पोलिसा दलांवर विश्वास कीम होत चालला आहे.
Ans: नायजेरियाच्या अदमावा परिसरात बाचामा आणि चोबो समुदायांमध्ये संघर्ष सुरु आहे. हा संघर्ष थांबवण्यासाठी सरकारने कर्फ्यू लागू केला आहे. मात्र याची सैनिकांकडून अंमलबाजवणी करण्यात आलेली नाही. यामुळे सैनिकांच्या विरोधात महिलांनी आंदोलन सुरु केले आहे.
Ans: नायजेरियात महिला आंदोलकांवरील सैनिकांच्या गोळीबारात ९ महिलांचा मृत्यू झाला आहे, तर १० जखमी झाल्या आहेत.