
Trump on Nobel Prize
Nobel पुरस्कारासाठी पुन्हा ट्रम्पची धडपड; भारत-पाकिस्तान अणु युद्ध थांबवल्याचा दावा
ट्रम्प यांनी पुन्हा एकदा त्यांनी आठ युद्धे थांबवल्याचा दावा केला आहे. तसेच त्यांनी या आठ युद्धे थांबवल्याच्या बदल्यात प्रत्येक एक नोबेल पुरस्कार म्हणजे आठ वेळा पुरस्कार त्यांना मिळाला पाहिजे असे म्हटले आहे. ट्रम्प यांनी आठ युद्धे थांबवली असून त्यांना ८ नोबेल पुरस्कार हवे असल्याचे ठामपणे म्हटले आहे.
दरम्यान ट्रम्प यांनी नॉर्वेच्या सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी नॉर्वेवर नोबेल पुरस्कार न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली आहे. नोबेल पुरस्कार हा नॉर्वेतील नार्वेजियन नोबेल समितीद्वारे प्रदान केला जातो. याच पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी म्हटले की, मी लाखो लोकांचे प्राण वाचवले आहेत, मला पुरस्कार मिळालाच पाहिजे. नॉर्वे सरकारचा यात सहभाग नसतो असे म्हणू शकत नाही असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. ट्रम्पच्या मते नोबेल पुरस्कार नॉर्वेत दिला जातो यामुळे तेथील सरकारचे यावर सर्व निंयत्रण असते.
परंतु ट्रम्प यांच्या विधानावरुन नॉर्वेने नोबेल पुरस्कारात सरकारचा कोणत्याही प्रकारचा सहभाग नसतो हे स्पष्ट केले आहे. नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गाहर स्टोअर यांनी ट्रम्पच्या दाव्याला फेटाळत नोबेल शांतता पुरस्कार देण्याचा निर्णय सरकार घेत नाही असे स्पष्ट केले आहे. त्यात सरकारचा कोणताही हस्तक्षेप नसतो असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान याच वेळी २०२५ च्या नोबेल पुरस्कार विजेत्या मारिया कोरिना माचाडो यांनी या वादात आणखी भर घातली आहे. त्यांनी नोबेल पुरस्कार हा त्यांना नाही तर डोनाल्ड ट्रम्पला मिळाला पाहिजे असे म्हटले आहे. माचाडो यांनी पुरस्कार डोनाल्ड ट्रम्पला प्रदान केला आहे. यावर ट्रम्प यांनी त्यांचे आभार मानत कौतुकही केले आहे. माचाडो यांनी खऱ्या अर्थाने त्यांच्या कार्याची दखल घेतली असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
परंतु यावर नोबोल फाउंडेशन समितीने विजेता पुरस्कार कोणालाही प्रदान करु शकत नाही, हा पुरस्कार कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीला हस्तांतरित करता येत नाही हे स्पष्ट केले आहे.
‘हा खूप मोठा अपमान असेल…’, नोबेल पुरस्कारासाठी ट्रम्पची तडफड; सात युद्ध थांबवल्याचा पुन्हा एकदा दावा
Ans: डोनाल्ड ट्रम्प यांनी ८ युद्धे थांबवली असून प्रत्येक युद्धबंदीसाठी त्यांना एक नोबेल पुरस्कार मिळाला पाहिजे असे म्हटले आहे.
Ans: नोबेल फाउंडेशनच्या नियमांनुसार, नोबेल पुरस्कार विजेता पुरस्कार कोणालाही हस्तांतरित करु शकत नाही.
Ans: नॉर्वेतील नार्वेजियन नोबेल समितीद्वारे प्रदान केला जातो, पण यामध्ये नॉर्वे सरकारचा कोणत्याही प्रकारे सहभाग नसतो.