Nobel पुरस्कारासाठी पुन्हा ट्रम्पची धडपड; भारत-पाकिस्तान अणु युद्ध थांबवल्याचा दावा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मे २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये तीव्र संघर्ष झाला होता. दोन्ही देशांमधील तणाव शिगेला पोहोचला होता. यावेळी ट्रम्प यांनी या संघर्षाच्या चार दिवसानंतर भारत-पाक युद्ध थांबवल्याची घोषणा केली होती. ट्रम्प यांनी त्याच्या हस्तक्षेपामुळे युद्ध थांबल्याचा दावा केला होता. आता परत एकदा ट्रम्प यांनी हाच दावा केला असून त्यांच्यामुळे भारत आणि पाकिस्तानमधील अणु युद्धाचा धोका टळला असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांच्या हस्तक्षेपामुळे लाखो लोकांचे प्राण वाचले असल्याचे ट्रम्प यांच्या मत आहे.
याच पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी नोबेल शांतता पुरस्कारासाठी तेच पात्र उमेदवार असल्याचे आणि त्यांच्यासारखे आतापर्यंत कोणीही युद्धे थांबवले नसल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांनी भारत पाकिस्तानसह आणखी सात युद्ध थांबवल्याचा गावा केला आहे. आतापर्यंत ट्रम्प यांनी २० हून अधिक वेळा भारत पाकिस्तान युद्धाचा दावा केला आहे. तसेच अनेक वेळा नोबेल पुरस्काराचीही मागणी केली आहे.
दरम्यान ट्रम्प यांचा दावा भारत सरकारने पूर्णपणे नाकारला आहे. भारताने भारत-पाकिस्तान युद्ध हे दोन्ही देशांतील द्विपक्षीय लष्करी चर्चेनंतर थांबले असल्याचे म्हटले आहे. भारताने जेव्हा जेव्हा ट्रम्प यांनी पाकिस्तानसोबतचे युद्ध थांबवल्याचा दावा केला आहे, त्यावेळी युद्धबंदीत तिसऱ्या कोणत्याही पक्षाचा समावेश नसल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. भारत सरकेने ट्रम्प यांच्या दाव्यांना फेटाळले आहे.
भारताच्या जम्मू-काश्मीर येथील पहलगाम येथे २२ एप्रिला २०२५ रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीर येथील दहशतवादी हल्ले ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) च्या कारवाईत उद्ध्वस्त केली होती. यावेळी भारताचे लष्करी सामर्थ पाहून पाकिस्तानने युद्धबंदीची विनंती केली होती. या विनंतीवरुनच भारताने आणि पाकिस्तानच्या DGMO ने चर्चा करुन युद्धबंवर सहमती दर्शवली. या युद्धात पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले होते.
ट्रम्प यांनी आतापर्यंत अनेक देशांमध्ये शांतता प्रस्थापित केल्याचा दावा केला आहे. त्यांनी स्वत:ला जगातील सर्वात शक्तिशाली मध्यस्थ म्हणून सादर केले आहे. ट्रम्प यांनी सतत जग त्यांच्या राजवटी खाली सुरक्षित असल्याचे आणि त्यांच्या जगातील कोणताही वाद सोडवण्याची क्षमता असल्याचा दावा केला आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक वेळा वाद निर्माण झाला आहे.
‘हा खूप मोठा अपमान असेल…’, नोबेल पुरस्कारासाठी ट्रम्पची तडफड; सात युद्ध थांबवल्याचा पुन्हा एकदा दावा
Ans: ट्रम्प यांनी नोबेल पुरस्कारासाठी तेच सर्वोत्तम पात्र उमेदवार असल्याचे म्हटले आहेत, कारण त्यांनी आठ युद्धे थांबवली आहेत.
Ans: ट्रम्प यांच्या मते, त्यांच्या हस्तक्षेपामुळेच भारत-पाकिस्तानमधील संभाव्य अणुयुद्ध थांबले असून लाखो लोकांचे प्राणा वाचले असल्याचा दावा केला आहे.
Ans: भारताने भारत-पाकिस्तान युद्धबंदीही दोन्ही देशांच्या द्विपक्षीय लष्करी चर्चेमुळे झाल्याचा दावा केला आहे. ट्रम्प यांच्या दाव्यांना भारतावने फेटाळले आहे.






