Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

North Cyprus Ferry Accident : उत्तर सायप्रसच्या किनाऱ्याजवळ 267 जणांना घेऊन जाणारी फेरी उलटली; बचावकार्य सुरू

North Cyprus Ferry Accident : उत्तर सायप्रसच्या कायरेनिया बंदरातून तुर्कीतील तासुजू बंदराकडे निघालेली प्रवासी फेरी किनाऱ्यापासून काही अंतरावर पाणी शिरल्याने उलटली. फेरीमध्ये 259 प्रवासी आणि 8 कर्मचारी मिळून 267 जण होते.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Aug 30, 2026 | 06:22 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • काही वेळातच फेरीने घेतले पाणी
  • फेरीत २६७ जण , बचावासाठी धावाधाव
  • कोस्ट गार्ड , खाजगी बोटी बचावकार्यात
North Cyprus Ferry Accident : उत्तर सायप्रसच्या किनाऱ्याजवळ प्रवासी फेरी उलटल्याने मोठी खळबळ उडाली आहे . सुमारे ३०० प्रवाशांना घेऊन जाणारी ही फेरी समुद्रात उलटल्याची घटना घडली असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे . घटनेची माहिती मिळताच कोस्ट गार्ड , हेलिकॉप्टर आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली . फेरीमध्ये असलेल्या प्रवाशांच्या सुरक्षितेसाठी प्रशासनाकडून वेगाने प्रयत्न सुरु आहेत .

काही वेळातच फेरीने घेतले पाणी

उत्तर सायप्रसच्या कायरेनिया बंदरातून तुर्कीतील तासुजू बंदराकडे निघालेल्या प्रवासी फेरीला रविवारी अचानक अपघात झाला . बंदरातून सुटल्यानंतर काही वेळातच फेरीमध्ये पाणी शिरू लागले . त्यानंतर परिस्थिती गंभीर बनली आणि फेरी उलटल्याची माहिती समोर आली .

Nepal Flood : नेपाळ-तिबेटमध्ये महापुराचा हाहाकार; मृतांचा आकडा 750 वर, 3 हजारांहून अधिक बेपत्ता

फेरीत २६७ जण , बचावासाठी धावाधाव

उत्तर सायप्रसच्या सार्वजनिक बांधकाम आणि वाहतूक मंत्र्यांच्या माहितीनुसार फेरीमध्ये २५९ प्रवासी आणि ८ कर्मचारी , असे एकूण २६७ जण होते . फेरीने पाणी घेण्यास सुरवात केल्यानंतर कॅप्टनने तातडीने मदतीचा संदेश पाठवला . काही प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी समुद्रात उड्या घेतल्याने प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे . या घटनेनंतर परिसरात मोठी घबराट निर्माण झाली असून प्रवाशांना लाईफ जॅकेटच्या मदतीने बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत .

Japan Yen Crisis : येन वाचवण्यासाठी जपानने उधळले $96.5 अब्ज; तरीही चलन पुन्हा कमजोर, आता व्याजदर वाढणार?

कोस्ट गार्ड , खाजगी बोटी बचावकार्यात

घटनेची माहिती मिळताच कोस्ट गार्डच्या बोटी , बचाव पथके आणि हेलिकॉप्टर घटनास्थळी रवाना करण्यात आले . परिसरातील मच्छीमार आणि खाजगी बोटीही बचावकार्यात सहभागी झाल्या आहेत . जखमी प्रवाशांना रुग्णालयात हलवण्यासाठी कायरेनिया बंदरावर रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत . फेरी नेमकी कोणत्या कारणाने पाण्यात उलटली , याचा तपास सुरु आहे . समुद्रातील परिस्थिती आणि फेरीमध्ये अचानक पाणी शिरण्याचे कारण शोधण्याचे काम प्रशासनाकडून केले जात आहे . दरम्यान बचावकार्य अद्याप सुरु असून प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे .

Web Title: North cyprus ferry accident ferry carrying 267 people capsizes off the coast of north cyprus rescue operations underway

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2026 | 06:22 PM

Topics:  

  • Boat Accident
  • Boat Sinks
  • Rescue team

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.