
kim jong un
उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी अमेरिकेच्या नेतृत्त्वाखाली स्थापन झालेल्या नवीन निर्बंध संघटना MSMT वर टीका केली आहे. या संघटनेला उत्तर कोरियाने बेकायदेशीर म्हटले आहे. तसेच संयुक्त राष्ट्रांच्या आड डोनाल्ड ट्रम्प जगावर आपली हुकूमशाही गाजवत असल्याचे म्हटले आहे. उत्तर कोरियाने MSMT संघटनेला तीव्र विरोध केला असून ही संघटना उत्तर कोरियावर १५ वर्षांसाठी निर्बंध लादण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले आहे.
मल्टीलॅटरल सॅन्शन्स मॉनिटरिंग टीम (MSMT) ही एक ११ सदस्य देशांची संघटना आहे. यामध्ये अमेरिका, दक्षिण कोरिया, जपानसह काही पाश्चिमात्य देशांचा समावेश आहे. याची स्थापना २०२४ मध्ये करण्यात आली होती. उ्त्तर कोरियाच्या अण्वस्त्र प्रकल्पावर लक्ष ठेवण्यासाठी, तसेच अमेरिकेने स्वतंत्र यंत्रणा उभी केली होती. उत्तर कोरियाच्या मते अमेरिकेची ही संघटना राजकीय हेतून प्रेरित असून आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन करत आहे. जगाचा कारभार यांच्या मनाप्रमाणे चालवण्याचा प्रयत्न करत आहे.
उत्तर कोरियाने केवळ निर्बंधावरच नाही, तर सायबर हल्ल्यांवरुन अमेरिकेला धारेवर धरले आहे. अमेरिकेच्या मते उत्तर कोरिया सायबर हल्ल्यांच्या माध्यमातून अण्वस्त्रच्या निर्मितीसाठी जगभरातून निधी गोळा करत आहे. परंतु उत्तर कोरियाने अमेरिकेच्या या आरोपांना खोटे ठरवले आहे. उत्तर कोरियाला एकटे पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले आहे.
उत्तर कोरियाचा हा हल्ला मित्र राष्ट्रांच्या पाठिंब्यासाठी अप्रत्यक्ष हल्ला मानला जात आहे. कारण नुकतेच व्हेनेझुएलामध्ये कारवाईनंतर अमेरिकेने इराणला टार्गेट केले आहे. अमेरिका आता इराणवर कारवाईची तयारी करत आहे. यामुळेच उत्तर कोरियाने अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रांना गंभीर इशारा दिला आहे. उत्तर कोरियाने म्हटले आहे की, संयुक्त राष्ट्रांना पारदर्शकतेने कार्य करायचे असल्याचे त्यांनी अमेरिकेच्या तालावर नाचू नये. यासाठी स्वतंत्र संघटना उभारावी.
ट्रम्पचा धमाका! व्हेनेझुएलाचे स्वघोषित राष्ट्राध्यक्ष; सोशल मीडियावरील पोस्टमुळे जगभरात खळबळ