North Korea President Kim Jong Un leave for China Visit
Kim Jong UN China Visit : बीजिंग : उत्तर कोरियाचे नेते किम जोंग ऊन (Kim Jong Un) चीनच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. मंगळवारी (२ सप्टेंबर) ते राजधानी बीजिंगला पोहोचतील. यावेळी ते चीनच्या ऐतिहासिक लष्करी परेडमध्ये सहभागी होणार आहे. ही परेड दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीची आणि जपानवर चीनने मिळवलेला विजय साजरा करण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे. या विशेष सोहळ्यासाठी चीनने किम जोंग ऊन, आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) यांना आमंत्रिक केले आहे. यावेळी दोन्ही नेते चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग (Xi Jinping) यांचीही भेट घेतील. पण त्यांचा हा दौरा अमेरिकेसाठी धोकादायक मानला जात आहे.
किम जोंग ऊन सोबत उत्तर कोरियाचे अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. परराष्ट्र मंत्री चोए सॉन हुई देखील चीनच्या दौऱ्यावर आले आहेत. २०१९ नंतर हा त्यांचा पहिला चीन दौरा आहे. २०११ मध्ये किम जोंग ऊन यांनी सत्ता हाती घेतली. त्यानंतर हा त्यांचा पाचवा चीन दौऱा आहे. चीन आणि उत्तर कोरियाचे राजकीय आणि आर्थिक संबंध ऐतिहासिकदृष्ट्या घनिष्ठ मानले जातात. शिवाय चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी किम जोंग उन यांना दिलेल्या खास निमंत्रणामुळे हा सोहळा अत्यंत महत्वपूर्म मानला जात आहे.
चीनमध्ये PM मोदी आणि पुतिन यांची दीर्घ बैठक; जाणून घ्या ४० मिनिटांत कोणत्या मुद्यांवर झाली चर्चा?
पहिल्यांदाच किम जोंग ऊन, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन एकाच मंचावर दिसतील. मात्र यामुळे अमेरिकेची डोकेदुखी वाढणार आहे. कारण हे तिन्ही नेते अमेरिकेचे मोठे शत्रू आहेत. यामुळे अमेरिकेसाठी हे एक मोठे आव्हान ठरणार आहे. शिवाय नुकत्याच झालेल्या SCO परिषदेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. सध्या या परेडकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. चीन-रशिया-उत्तर कोरिया हे त्रिकुट एकतेचे प्रतीक म्हणून पाहिले जात आहेत.
मात्र किम जोंग उनच्या या दौऱ्यामुळे अमेरिका आणि पाश्चात्य देशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. उत्तर कोरिया हा अमेरिकेचा सर्वात मोठा शत्रू मानला जातो. दुसरीकडे चीन आणि रशियासोबतही अमेरिकेचे संबंध खास नाहीत. यामुळे अमेरिका आणि इतर पाश्चात्य देश अत्यंत सावध झाले आहेत. विशेष करुन चीन रशिया आणि उत्तर कोरिया अमेरिकेविरोधात एकवलेले आहे. या त्रिकुटमूळे डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांची डोकेदुखी नक्कीच वाढली आहे.