चीनमध्ये PM मोदी आणि पुतिन यांची दीर्घ बैठक; जाणून घ्या ४० मिनिटांत कोणत्या मुद्यांवर झाली चर्चा? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Modi Putin SCO Meet : बीजिंग : पंतप्रधान मोदी चीनला शांघाय सहकार्य संघटना शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी गेले होते. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या आमंत्रणावरुन ही भेट निश्चित झाली होती. दरम्यान यावेळी पंतप्रधान मोदींनी शी जिनपिंग यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये भारत आणि चीनमधील संबंधांना अधिक बळकट करण्यावर चर्चा झाली.
तसेच टॅरिफसारख्या अनेक जागतिक मुद्द्यांवरही दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. अमेरिकेच्या टॅरिफ धोरणादरम्यान पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्याला अत्यंत महत्व प्राप्त झाले होते. दरम्यान यावेळी मोदींनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचीही भेट घेतली दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधावर चर्चा केली आहे. दोन्ही नेते चर्चेपूर्वी बैठकीच्या ठिकाणी एका गाडीतूनच गेले.
‘भारतीय ब्राह्मणांना नफा, सामान्य लोक मात्र…’ ; रशियन तेल खरेदीवरुन पीटर नवारो पुन्हा बरळले
Had an excellent meeting with President Putin on the sidelines of the SCO Summit in Tianjin. Discussed ways to deepen bilateral cooperation in all sectors, including trade, fertilisers, space, security and culture. We exchanged views on regional and global developments, including… pic.twitter.com/DhTyqOysbf
— Narendra Modi (@narendramodi) September 1, 2025
एकूणच पंतप्रधान मोदींचा हा दौरा अत्यंत यशस्वी झाला आहे. या दौऱ्यादरम्यान SCO परिषदेतही भारताची ताकद पंतप्रधान मोदींनी दाखवून दिली आहे. दहशतवादापासून ते डोनाल्ड ट्रम्पच्या टॅरिफपर्यंतच्या मुद्यांवर पंतप्रधान मोदींना उत्तर दिले आहे.