North Korea's Kim Jong Un orders for missiles production amid Iran-Israel Conflict
North Korea News Marathi : प्योंगयोंग: मध्य पुर्वेत इराण आणि इस्रायलमध्ये युद्धाचा भडका उडाला आहे. याच दरम्यान उत्तर कोरियातही मोठा गोंधळ उडाला आहे. इस्रायलने इराणच्या अणु तळांवर केलेल्या हल्ल्यानंतर उत्तर कोरियाचे हुकूमशाह ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यांनी सर्व शस्त्रास्त्र कारख्यांना भेट दिली आहे. तसेच दारुगोळ्याच्या उत्पादनासाटी मोठी ऑर्डर दिली आहे. यामुळे संपूर्ण जगात मोठा खळबळ उडाली आहे.
उत्तर कोरियाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या परिस्थितीत बॉम्ब आणि दारुगोळे बनवण्याची गती आढवण्यास किम जोंग उन यांनी निर्देश दिले आहेत. सध्या जग युद्धाकडे वाटचाल करत आहे. अनेक शक्तिशाली देशांमध्ये युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे तिसऱ्या महायुद्धाची भीती निर्माण झाली आहे.
किम जोंग उन यांनी शुक्रवापी (१३ जून) मेटल प्रेसिंग आणि असेंब्ली युनिट्सची पाहणी केली. या वेळी त्यांनी दारुगोळ्याच्या प्रगतीची तपासणी केली.यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांना कठोर शब्दांत फटकारले आणि आधुनिक युद्धांच्या गरजेनुसार शक्तिशाली, जास्तीत जास्त दारुगोळ्यांची निर्मीती करण्याचे आदेश दिले. विशेष करुन किम जोंग उन यांनी शस्त्रास्त्रा कारखान्यांमध्ये ऑटोमेशन म्हणजेच मानवरहित उत्पादनावर भर देण्याचे म्हटले. किम यांनी म्हटले की, जर नवीन आणि शक्तिशाली कवच बनवायचे असेल तर उत्पादन प्रक्रियेची गती वाढवण्याची गरज आहे.
उत्तर कोरियाच्या किम जोंग उन यांच्या या हालचालींमुळे आशियातील अनेक देशांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.एकीकडे उत्तर कोरियाने दक्षिण कोरियाविरुद्ध मौन पाळले आहेय. तर दुसरीकडे किम आपली लष्करी ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. शिवाय दक्षिण कोरियाच नुकतेच नवीन सरकार स्थापन झाले आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे जे-म्युंग सत्तेत आले आहेत. ते उत्तर कोरियाचे कट्टर विरोधक मानले जातात. त्यांच्या सत्तेत येण्याने उत्तर कोरियाला मोठा धोका निर्माण झाला आहे. यामुळे उत्तर कोरियाने आपली युद्ध धोरणे अधिक तीव्र केली आहे.
तसेच गेल्या काही काळात उत्तर कोरिया आणि रशियामधील संबंध अधिक दृढ होत चालले आहेत. युक्रेनविरुद्धच्या युद्धात उत्तर कोरियाने रशियाला २० हजार सैनिकांची मदत केली आहे. यामुळे अमेरिकेला देखील धोका निर्माण झाला आहे. या सर्व गोष्टींवरुन तिसऱ्या महायुद्धाचे संकेत मिळत आहे. एकीकडे इराण-इस्रायल, दुसरीकडे रशिया-युक्रेन युद्ध सुरु आहे. तसेच भारत आणि पाकिस्तानमधील संबंध देखील तणावपूर्ण आहेतच.