इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Israel Iran War News Marathi : जेरुसेलम : इराण आणि इस्रायलमधील तणावात वाढ होत आहे. इस्रायलने इराणच्या केलेल्या लष्करी तळांवरील हल्ल्यांना आणि अधिकाऱ्यांच्या हत्यांना प्रत्युत्तरात इराणने देखील हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. इराणने इस्रायलच्या तेल अवीव शहरांवर हल्ला चढवला आहे. यामध्ये 100 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.यामुळे युद्ध आणखी भडकण्याची शक्यता आहे.याच वेळी इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी इराणला गंभीर इशारा दिला आहे.
संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी इराणने हल्ले सुरु ठेवले तर तेहरान जळून खाक होईल अशी धमकी दिली आहे. इराणला हल्ल्यापासून रोखण्यासाठी इस्रायलचा प्रयत्न सुरु आहे. मीडिया रिपोर्टनुसार, इराणच्या प्रत्युत्तराच्या कारवाईत इस्रायलच्या तीन नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर शेकडो लोक गंभीर जखमी झाले आहे. दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. हे हल्ले थांबण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नाही. यावेळी इस्रायल काट्झ यांनी इराणी नागरिकांना ओलीस ठेवत असल्याचा आरोप इराणी हुकूमशाह यांच्यावर केला आहे.
शुक्रवारी (13 जून) पहाटे इस्रायलने इराणच्या अणु तळांवर हल्ला केला. तसेच इस्रायलच्या अनेक उच्चाधिकारी आणि लष्करी अधिकाऱ्यांना देखील लक्ष्य केले. इस्रायलच्या प्रीएम्प्टिवर स्ट्राईकमध्ये इराणच्या सशस्त्र दलाचे प्रमुख मेजर जनरल मोहम्मद बघेरी ठार झाले आहेत. तसेच रिव्होल्यूशनरी गार्डचे प्रमुख कमांडर हुसैन सलामी यांचा देखील इराणच्या हल्ल्याच मृत्यू झाला आहे. इस्रायलने इराणविरोधीत सुरु केलेल्या ऑपरेशन रायझिंग मोहीमेंतर्गत 78 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेकजण जखमी देखील झाले आहेत. याचा उद्देश इराणला अण्वस्त्रे बनवण्यापासून रोखणे असल्याचे इस्रायलने म्हटले आहे.
याच वेळी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंनी इराणी नागरिकांना संबोधित केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, आमचा लढा हा इराणच्या नागरिकांविरोधात नाही तर, त्यांच्यावर अन्याय करणाऱ्या इस्लामिक राजवटीविरोधात आहे. नेतन्याहूंनी इस्रायलच्या नागरिकांना स्वातंत्र्याच्या लढाईत सहभागी होण्याचे आणि स्वत:साठी उभे राहण्याचे आवाहन केले आहे.
Prime Minister Benjamin Netanyahu:
To the proud people of Iran,
We are in the midst of one of the greatest military operations in history, Operation Rising Lion.
The Islamic regime, which has oppressed you for almost 50 years threatens to destroy our country, the State of Israel. pic.twitter.com/F67bxcDitL— Prime Minister of Israel (@IsraeliPM) June 13, 2025