
Putin Talks with Iran's Presedent Masood Pezeshkian and US President Donald Trump Amid Middle East Conflict
विशेष म्हणजे रशियाने दोन्ही बाजूंना शांततेने वाद सोडवण्याचे आवाहन केले आहे. पुतिन यांनी इराण(Iran) चे राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान यांच्याशी चर्चा करताना म्हटले की, लष्करी संघर्षापेक्षा राजकीय आणि राजनैतिक संवादाने वाद सोडवावा. रशिया देखील याला नेहमी समर्थन करत आला आहे. त्यांनी इराणला संयम बाळगण्याचा सल्ला दिला आहे.
पुतिन यांनी म्हटले की, हे युद्ध थांबले नाही तर मध्यपूर्वेतील छोटे आखाती देशही या युद्धात अडकतील. यामुळे रशिया शांतता आणि राजनैतिक मार्गाने संवाद सोडवण्याचा सल्ला दिला आहे. रशियाने हे पाऊल अशा वेळी उचलले आहे, जेव्हा मध्यपूर्वेत तणाव अधिक वाढला आहे. यामुळे रशियाचे हे पाऊल अत्यंत म्हत्वाचे मानले जात आहे. यामुळे जगाला एका मोठ्या विनाशापासून वाचवण्याचा प्रयत्न रशिया करत असल्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान इराणचे राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान यांनी कठीण काळात रशियाच्या पाठिंबा आणि मैत्रीबद्दल आभार मानले. तसेच रशियाने पाठवलेल्या मानवतावादी मदतीसाठीही आभार मानले. पेझेश्किया यांनी इराणच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली. इराण केवळ आपली सुरक्षा मजबूत करण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच रशियाच्या मध्यस्थीचजा प्रस्तावही पूर्णपणे नाकारला नाही.
पुतिन यांनी केवळ इराणशीच नव्हे, तर अमेरिकेशी संपर्क साधला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) सोबत त्यांनी तासभर फोनवरुन चर्चा केली. या चर्चेत त्यांनी इराण-इस्रायल तणावासोबत रशिया युक्रेन युद्धावर कायस्वरुपी तोडगा काढण्यावर चर्चा झाली. पुतिन यांनी ट्रम्प समोर गुप्त प्रस्ताव ठेवला असल्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. ज्यामुळे जगात शांतता निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Ans: रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी मध्यस्थीची भूमिका घेत इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला आहे. रशिया संघर्ष शांतता आणि मार्गाने सोडवाण्यास सांगत आहे.
Ans: मध्यपूर्वेतील वाढता तणाव कमी करण्यासाठी, पुतिन यांनी इराणच्या राष्ट्राध्यक्षांना द्ध थांबवून राजनैतिक मार्गाने समाधान शोधण्याचा सल्ला दिला.