Nuclear Threat Pakistan actively developing a ballistic missile (ICBM)
Pakistan News Marathi: इस्लामाबाद : सध्या इराण आणि इस्रायलधील १२ दिवसांपासून सुरु असलेले युद्ध थांबले आहे मात्र तणाव अद्यापही कायम आहे. अजूनही इराणच्या अणुप्रकल्पाचा धोका टळलेला नाही. अशातच आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे भारतासह अमेरिकेच्या चिंतेत वाढ झाली आहे. अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेने पाकिस्तानबाबत एक मोठा खुलासा केला आहे. पाकिस्तान एक धोकादायक शस्त्र विकसित करण्याच्या मार्गावर आहे. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
पाकिस्तानमने इंटरकॉन्टिनेंटल बॅलेस्टिक मिसाईल (ICBM) प्रकल्प सुरु केला आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंतेचे वातावरण आहे. अमेरिका आणि भारतासाठी पाकिस्तानचा हा प्रकल्प अत्यंत धोकादायक मानला जात आहे. अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान लांब पल्ल्यांची बॅलेस्टिक मिसाईल्स विकसित करत आहे. ही मिसाईल अमेरिकेपर्यंत मारा करु शकतात. चीनच्या मदतीने हा प्रकल्प सुरु करण्याच आल्याचे संकेत अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेला मिळाले आहेत.
पाकिस्तान यामध्ये यशस्वी झाला तर स्वत:ला अण्वस्त्रधारी देश म्हणून घोषित करेल, असा दावा अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेच्या अधिकाऱ्याने केला आहे. यामुळे मोठा गोंधळ उडाला आहे.
ICBM म्हणजे इंटरकॉन्टिनेंटल बॅलेस्टिक मिसाईल आहे. ही क्षेपणास्त्रे किमान ५,५०० किमी अंतरापर्यंत लक्ष्यावर अचूक मारा करु शकतात. ही क्षेपणास्त्रे अण्वस्त्र वाहून नेण्यासाठी देखील सक्षण आहेत. सध्या आधुनिक ICBM मध्ये मल्टीपल इन्डिपेंडटली टार्गेटेबल रेन्ट्री व्हेइकल (MIRV) ही प्रणाली आहे. या प्रणालीमुळे क्षेपणास्त्रामधून एकाच वेळी अनेक वेगवेळ्या लक्ष्यांवर अण्वस्त्रे टाकता येतात.
सध्या भारत, अमेरिका, चीन, ब्रिटन, फ्रान्स, रशिया, उत्तर कोरिया आणि इस्रायल या देशांकडे हे ICBM तंत्रज्ञान आहे. परंतु पाकिस्तानने देखील आता यामध्ये उडी मारली आहे. यामुळे संपूर्ण जगाची चिंता वाढली आहे. विशेष करुन भारतासाठी हा गंभीर धोका मानला जात आहे. कारण यामध्ये चीन पाकिस्तानला समर्थन देत आहे. पाकिस्तान आणि चीन दोन्ही देश भारताचे शत्रू देश आहेत.
पाकिस्तानने अनेक वेळा आपला अणु कार्यक्रम रोखला असल्याचा दावा यापूर्वी केली आहे. परंतु गुप्तचर संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने कधीच अणु प्रकल्प बंद केलेला नव्हता. यापूर्वी पाकिस्तानने २०२२ मध्ये शाहीन-३ या मीडियम रेंजच्या बॅलेस्टित मिसाईलची यशस्वी चाचणी केली होती. हे मिसाईल २,७०० किमी पर्यंतच्या अंतरावरील लक्ष्याला नष्ट करु शकते. भारताची अनेक प्रमुख शहरे या क्षेपणास्त्राच्या रेंजमध्ये येतात. जर पाकिस्तानने पुन्हा एकदा आणखी एक क्षेपणास्त्र विकसित केले तर आशिया खंडात अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता आहे.
अमेरिकन गुतप्तचर संस्थेने म्हटले आहे की, पाकिस्तान ICBM विकसित करम्यात यशस्वी झाला तर अमेरिका पाकिस्तानला अणु विरोधी राष्ट्र म्हणून घोषित करु शकतो. यामुळे जागतिक स्तरावर देखील पाकिस्तानवर निर्बंध लादले जातील. पाकिस्तानचा हा प्रकल्प केवळ भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जागतिक शांततेसाठी धोकादायक ठरु शकतो.