One dead after Cyclone Alfred Lashes Australia
कॅनबेरा: एक मोठी बातमी समोर आली आहे. सध्या ऑस्ट्रेलियात अल्फ्रेड चक्रिवादळाचा धोका निर्माण झाला असून यामुळे देशाच्या पूर्व किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडत आहे. पूर परिस्थिती निर्माण झाली असून या मुसळधार पावसामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तसेच 2 लाखाहूंन अधिक घरांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला आहे. परिस्थिती सुरधारण्यासाठी प्रशासन आणि बचाव कामगारांचे कार्य सुरु आहे. सध्या देशात भितीचे वातावरण पसरलेले आहेत.
मुसळधार पाऊस सुरुच
या चक्रीवादळामुळे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी क्वीन्सलॅंडमध्ये आणि न्य साउथ वेल्समधील 400 किलोमीटर किनापट्टीपर्यंत पूर आणि तीव्र हवामानाचा इशारा जारी केला आहे. हवामान शास्त्र विभागाने, क्वीन्सलॅंडची राजधानी ब्रिस्बेनमध्ये 24 तासांत 30 सेंटीमीटर पाऊस पडला असल्याचे सांगितले. या मुसळधार पावसामुळे एकाचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
पावसामुळे पूल कोसळला
तसेच अत्तर न्यू साउथ वेल्समध्ये पूरामुळे एक पूल वाहून गेल्याची माहिती देखील समोर आली आहे. या पुल कोसळल्यामुळे एका 61 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे त्याला वाचवण्यात यश आले नाही. त्याने नदीती एका झाडाला पकडण्याचा प्रयत्न केला होता, मात्र प्रवाह इतका जोरदार होता की, तो पाण्यासोबत वाहून गेला. दुसऱ्या दिवशी या व्यक्तीचा मृतदेह सापडला.
रस्त्यांवर पाणी साचले
सध्या देशांतील परिस्थिती बिघडली असून रस्त्यावर पुराचे पाणी साचले आहे. यामुळे लोकांची घरे आर्दी पाण्यात बुडालेली आहेत. नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने सध्या बचाव कार्य सुरु असल्याचे म्हटले आहे.
पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांची नागरिकांना दिलासादायक ग्वाही
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी कॅनबेरा येथे पत्रकारांशी संवाद साधताना प्रभावित नागरिकांना दिलासा दिला. त्यांनी सांगितले, “आम्ही तुमच्यासोबत आहोत आणि शक्य त्या सर्व प्रकारे मदत करण्यास तयार आहोत.” सरकार आणि स्थानिक प्रशासन नागरिकांच्या सुरक्षेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.
नागरिकांना प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पूर आणि चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क आहे. ‘अल्फ्रेड’ चक्रीवादळामुळे ऑस्ट्रेलियावर मोठे संकट कोसळले आहे. प्रशासन, हवामानशास्त्रज्ञ आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क असली तरी, नागरिकांनीही सावधानता बाळगणे गरजेचे आहे. तुर्तास, संपूर्ण ऑस्ट्रेलियाचे लक्ष या चक्रीवादळाच्या पुढील हालचालींकडे लागले आहे.