Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

OperationSindoor: ऑपरेशन सिंदूरमध्ये उद्ध्वस्त झालेला जैशचा तळ 15 महिन्यांत पुन्हा उभा; बहावलपूरमधून सॅटेलाइट फोटोंद्वारे खुलासा

Jaish-e-Mohammed Headquarters: ऑपरेशन सिंदूरमध्ये उद्ध्वस्त झालेले बहावलपूरमधील जैश-ए-मोहम्मद मरकज सुभान अल्लाह पुन्हा बांधण्यात आल्याचे दावे समोर आले आहेत. उपग्रहाद्वारे घेतलेल्या छायाचित्रांमध्ये हे संकुल जीर्णोद्धारासाठी सज्ज असल्याचे दिसत आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Aug 23, 2026 | 04:24 PM
Jaish e Mohammed Bahawalpur headquarters rebuilt 2026

Jaish e Mohammed Bahawalpur headquarters rebuilt 2026

Follow Us
Follow Us:
  • दहशतवादी तळ पुन्हा सज्ज
  • दुरुस्ती व नूतनीकरण पूर्ण
  • ऑपरेशन सिंदूरचा इतिहास

भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी पायाभूत सुविधांवर केलेल्या सर्वात मोठ्या लष्करी कारवाईच्या म्हणजेच ‘ऑपरेशन सिंदूर’च्या (Operation Sindoor) १५ महिन्यांनंतर एक अत्यंत चिंताजनक माहिती समोर आली आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील बहावलपूर (Bahawalpur) येथे असलेला जैश-ए-मोहम्मदचा (Jaish-e-Mohammed) मुख्य मुख्यालय व प्रशिक्षण तळ ‘मरकझ सुभान अल्लाह’ (Markaz Subhan Allah) पुन्हा पूर्णपणे बांधून पूर्ववत करण्यात आल्याचे नवीन उपग्रह छायाचित्रांमधून (Satellite Imagery) स्पष्ट झाले आहे. भारताच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात भुईसपाट झालेल्या या तळाचे नूतनीकरण पूर्ण झाले असून, तो पुन्हा एकदा वापरण्यासाठी तयार झाल्याचे चित्र आहे.

बहावलपूर येथील एन-५ राष्ट्रीय महामार्गाजवळ (N-5 National Highway) असलेले हे संकुल ‘जामिया सुभान अल्लाह’ म्हणूनही ओळखले जाते. हा परिसर बऱ्याच काळापासून आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा मुख्य बालेकिल्ला आणि रणनीतिक केंद्र मानला जातो. येथूनच भारतावर होणाऱ्या अनेक मोठ्या दहशतवादी हल्ल्यांचे प्लॅनिंग आणि दहशतवाद्यांना शस्त्र प्रशिक्षण दिले जात असे.

उपग्रह छायाचित्रांमधून उघड झाले नूतनीकरणाचे सत्य

मे २०२६ मध्ये अमेरिकन स्पेस तंत्रज्ञान कंपनी व्हँटोरने (Vantor) जारी केलेल्या उच्च-रिझोल्यूशन उपग्रह प्रतिमांमध्ये या संकुलात अवजड यंत्रसामग्री, क्रेन आणि बांधकाम वाहने सक्रिय असल्याचे दिसून आले होते. या छायाचित्रांवरून मशिदीच्या छतांची आणि उद्ध्वस्त झालेल्या घुमटांची दुरुस्ती सुरू असल्याचे प्राथमिक संकेत मिळाले होते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Viral News: बालीमध्ये हिंदू सणाचा अवमान करणाऱ्या पर्यटकाला 1 वर्षाचा तुरुंगवास; सोशल मीडियावर व्हायरल ‘तो’ वादग्रस्त VIDEO

आता ऑगस्ट २०२६ मध्ये समोर आलेल्या ताज्या उपग्रह अहवालानुसार आणि आंतरराष्ट्रीय संरक्षण विश्लेषकांच्या मते, या संकुलाचे पुनर्रचना काम पूर्ण झाले आहे. इमारतीच्या मध्यवर्ती सभागृहाचे प्लास्टरिंग, रंगकाम, आणि संगमरवरी फरशी बसवण्याचे काम पूर्ण झाले असून, उद्ध्वस्त झालेले सर्व घुमट (Domes) पुन्हा पूर्ववत करण्यात आले आहेत. मे २०२५ मध्ये झालेल्या हल्ल्यानंतर पूर्णपणे बंद पडलेला हा भाग १५ महिन्यांच्या कालावधीत पाकिस्तान प्रशासनाच्या आणि आयएसआयच्या (ISI) मदतीने पुन्हा उभा करण्यात आला आहे.

ऑपरेशन सिंदूर नक्की काय होते?

२२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता. या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सशस्त्र दलाने ६ आणि ७ मे २०२५ च्या मध्यरात्री ‘ऑपरेशन सिंदूर’ हे अत्यंत गुप्त आणि अचूक लष्करी अभियान राबवले.

या कारवाईत भारतीय वायुसेना आणि सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (PoJK) जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तय्यबाच्या ९ प्रमुख दहशतवादी तळांवर अचूक क्षेपणास्त्र हल्ले केले. यामध्ये बहावलपूरमधील ‘मरकझ सुभान अल्लाह’ तळाला थेट लक्ष्य करण्यात आले होते. हल्ल्यानंतर जारी झालेल्या फोटोंमध्ये या इमारतींच्या छतांना पडलेली मोठी छिद्रे आणि उद्ध्वस्त झालेल्या वास्तूंचे अवशेष स्पष्ट दिसत होते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Russia-Ukraine War : रशियाविरुद्ध युक्रेनला मिळणार ‘कवचकुंडल’; फ्रान्स पुरवणार अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रतिबंधक प्रणाली

मसूद अझरच्या कुटुंबाचा खात्मा आणि पाकिस्तानात खळबळ

या ऐतिहासिक हल्ल्यानंतर संयुक्त राष्ट्रांनी (UN) घोषित केलेला आंतरराष्ट्रीय दहशतवादी आणि जैशचा प्रमुख मसूद अझर (Masood Azhar) याने स्वतः एक ऑडिओ संदेश जारी केला होता. त्या निवेदनात त्याने कबूल केले होते की, बहावलपूर येथील ‘मरकझ सुभान अल्लाह’ वर झालेल्या भारतीय हल्ल्यात त्याच्या कुटुंबातील १० हून अधिक सदस्य मारले गेले, ज्यामध्ये त्याची जवळची नातेवाईक आणि लहान मुलांचाही समावेश होता.

१९९४ मध्ये भारतात अटक झालेल्या मसूद अझरला १९९९ च्या आयसी-८१४ (IC-814) कंदाहार विमान अपहरण प्रकरणादरम्यान सुटका करावी लागली होती. तेव्हापासून तो पाकिस्तानच्या भूमीवरून भारताविरुद्ध दहशतवादी नेटवर्क चालवत आहे. आता या तळाचा पुनर्जन्म झाल्याने भारतीय सुरक्षा यंत्रणा आणि गुप्तचर संस्थांनी (RAW & IB) सीमावर्ती भागात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पुन्हा एकदा उच्च सतर्कता (High Alert) जारी केली आहे.

Web Title: Operation sindoor jaish e mohammed bahawalpur headquarters rebuilt satellite images 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2026 | 04:24 PM

Topics:  

  • india pakistan war
  • Operation Sindoor
  • World news

संबंधित बातम्या

Felix Finkbeiner : एका चॉकलेटने लावली 1 कोटी झाडे; जर्मनीतील ‘या’ शाळकरी मुलाने कशी घडवून आणली जगभरात वृक्षारोपणाची महाक्रांती?
1

Felix Finkbeiner : एका चॉकलेटने लावली 1 कोटी झाडे; जर्मनीतील ‘या’ शाळकरी मुलाने कशी घडवून आणली जगभरात वृक्षारोपणाची महाक्रांती?

Snake Island : समुद्राच्या मध्यभागी मृत्यूचं बेट! समुद्री चाच्यांच्या खजिन्याचे रक्षण करता चक्क हजारो विषारी साप; वाचा थरारक कहाणी
2

Snake Island : समुद्राच्या मध्यभागी मृत्यूचं बेट! समुद्री चाच्यांच्या खजिन्याचे रक्षण करता चक्क हजारो विषारी साप; वाचा थरारक कहाणी

FlyDubai FZ1073 : युएईमधील भारतीयांनी फ्लायदुबईचा हिरो स्मित मच्छरला केला सलाम; वाचा त्यांच्या आरोग्याबद्दल लेटेस्ट अपडेट
3

FlyDubai FZ1073 : युएईमधील भारतीयांनी फ्लायदुबईचा हिरो स्मित मच्छरला केला सलाम; वाचा त्यांच्या आरोग्याबद्दल लेटेस्ट अपडेट

Plague Alert: ‘हे एक बायोवेपण…’ रशियातील ‘त्या’ घटनेवर ट्रम्प यांचे मोठे विधान; WHO कडून स्पष्टीकरणाची मागणी
4

Plague Alert: ‘हे एक बायोवेपण…’ रशियातील ‘त्या’ घटनेवर ट्रम्प यांचे मोठे विधान; WHO कडून स्पष्टीकरणाची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.