Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाकिस्तानच्या विनाशाचा सर्वात मोठा पुरावा सापडला; नष्ट झालेल्या नूर खान आणि मुरीदके हवाई तळांच्या नवीन Satellite Image Viral

Pakistan airbase satellite images : भारताच्या 'Operation Sindoor'ने पाकिस्तानवर दिलेल्या प्रत्युत्तरात्मक कारवाईचे दृश्य आता जगासमोर आले आहे. या viral होत असलेल्या Satellite Images एकदा पहाच.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: May 28, 2025 | 12:02 PM
Operation Sindoor Pakistan's Muridke Nurkhan bases destroyed satellite proof out

Operation Sindoor Pakistan's Muridke Nurkhan bases destroyed satellite proof out

Follow Us
Close
Follow Us:

Pakistan airbase satellite images : भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ने पाकिस्तानवर दिलेल्या प्रत्युत्तरात्मक कारवाईचे दृश्य आता जगासमोर आले आहे. आंतरराष्ट्रीय उपग्रह तंत्रज्ञान कंपनी मॅक्सार टेक्नॉलॉजीजने पाकिस्तानातील मुरीदके आणि नूरखान या दोन अत्यंत संवेदनशील लष्करी एअरबेसचे उपग्रह प्रतिमा प्रसिद्ध केल्या असून, त्या पाहून या दोन्ही ठिकाणी झालेल्या मोठ्या विनाशाचे चित्र स्पष्ट होते.

हे उपग्रह चित्र म्हणजे भारताच्या सामर्थ्याचा जणू एक ठोस पुरावा आहे. ऑपरेशन सिंदूरमुळे केवळ दहशतवादी तळेच नाही, तर पाकिस्तानच्या लष्करी पायाभूत सुविधाही धुळीस मिळाल्या आहेत. भारताच्या या निर्णायक कारवाईने पाकिस्तानला प्रचंड फटका बसला असून, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही याचे मोठे पडसाद उमटत आहेत.

नूरखान आणि मुरीदके, पाकिस्तानच्या संरक्षण व्यवस्थेचा कणा

नूरखान हवाई तळ, जो रावळपिंडीच्या चकला परिसरात आहे, हा पाकिस्तानी हवाई दलाचा एक महत्त्वाचा आधारबिंदू मानला जातो. हे केंद्र पाक लष्कराच्या मुख्यालयाच्या अगदी जवळ असून येथे C-130 हरक्यूलिस, IL-78 टँकर, तसेच इतर महत्त्वाची विमाने तैनात असतात. उपग्रह प्रतिमांमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की या तळावर मोठ्या प्रमाणावर स्फोटकांनी केलेला हल्ला झाला असून, इमारतींचे पूर्णपणे विनाश झाले आहे.

दुसरीकडे, मुरीदके हे एक अग्रेषित ऑपरेशनल बेस असून, येथे ड्रोन आणि हलकी लढाऊ विमाने तैनात असतात. विशेषतः बायरक्तर टीबी-२, विंग लूंग २, आणि इतर टॅक्टिकल ड्रोन इथून उड्डाण करतात. ऑपरेशन सिंदूरनंतर आलेल्या प्रतिमांमध्ये येथे असलेल्या कमांड सेंटरचे पूर्णतः उद्ध्वस्त झालेले चित्र दिसून येते.

𝐌𝐞𝐝𝐢𝐚 𝐁𝐫𝐢𝐞𝐟𝐢𝐧𝐠 𝐨𝐧 #𝐎𝐩𝐞𝐫𝐚𝐭𝐢𝐨𝐧𝐒𝐢𝐧𝐝𝐨𝐨𝐫 || A detailed missile impact video of the Muridke terror camp was played during the briefing on Operation Sindoor. It was explained how the Indian Armed Forces carried out a precise and targeted strike on the… pic.twitter.com/7andiPj54K — All India Radio News (@airnewsalerts) May 11, 2025

credit : social media

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘COVID-19’ च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ‘Wuhan Lab Leak Theory’ पुन्हा चर्चेत; नवीन संशोधन आले समोर

दहशतवादी हल्ल्याचे उत्तर ठरले निर्णायक

या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात झाली पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यापासून, ज्यात भारताचे २६ जवान शहीद झाले. या घटनेनंतर भारत सरकारने ऑपरेशन सिंदूर नावाची गुप्त आणि तितकीच घातक कारवाई सुरू केली. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील नऊ दहशतवादी तळांचे उच्च क्षमतेच्या क्षेपणास्त्रांद्वारे निर्दालन करण्यात आले.

पण भारताच्या या कारवाईनंतर पाकिस्तानच्या सैन्याने सीमारेषा ओलांडून भारताच्या विविध शहरांवर हल्ल्याचा प्रयत्न केला. ही पाकिस्तानची चूक त्यांच्या विनाशाचा कारणीभूत ठरली. भारताने याला जोरदार प्रत्युत्तर देत लष्करी तळ उद्ध्वस्त केले आणि पाकिस्तानला विनाशाच्या उंबरठ्यावर आणून उभे केले.

भारताची सामरिक परिपक्वता आणि जागतिक संदेश

या संपूर्ण घडामोडींमधून भारताने जागतिक स्तरावर स्पष्ट संदेश दिला आहे. देशाच्या सुरक्षेविषयी कोणतीही तडजोड होणार नाही. भारताने केवळ दहशतवादाविरुद्ध कडक भूमिका घेतली नाही, तर पाकिस्तानसारख्या आण्विक सशस्त्र देशालाही ताकद दाखवत लष्करी प्रतिकार केला. ही कारवाई म्हणजे भारताची सर्जिकल स्ट्राइक आणि बालाकोट हल्ल्यानंतरची आणखी एक ऐतिहासिक मोहीम ठरली आहे. भारताने फक्त हल्ला परतवला नाही, तर त्यातून पाकिस्तानला युद्धविरामासाठी भाग पाडले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : पृथ्वीच्या गाभ्यातून वर येत आहे सोने! हवाईतील ज्वालामुखीच्या अभ्यासातून संशोधकांना थक्क करणारे पुरावे

भारताच्या संरक्षण धोरणाचा विजय

मुरीदके आणि नूरखान या पाकिस्तानच्या दोन अत्यंत महत्त्वाच्या लष्करी ठिकाणांचा नाश हे ‘ऑपरेशन सिंदूर’चे सर्वात मोठे यश मानले जात आहे. यामुळे पाकिस्तानला फक्त लष्करीच नव्हे तर सामरिक आणि मानसिकदृष्ट्याही मोठा धक्का बसला आहे. या उपग्रह प्रतिमांच्या माध्यमातून आता संपूर्ण जगाला हे दिसून आले आहे की, भारत केवळ शांततेचा पाठीराखा नाही, तर शत्रूच्या घरात घुसून प्रत्युत्तर देण्याची क्षमता असलेला शक्तिशाली राष्ट्र आहे.

Web Title: Operation sindoor pakistans muridke nurkhan bases destroyed satellite proof out

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2025 | 12:02 PM

Topics:  

  • Operation Sindoor
  • viral photo
  • viral video

संबंधित बातम्या

Sheikh Hasina Verdict : ‘हातात मशाली, रस्त्यावर आग…’ बांगलादेशची पुन्हा एकदा गृहयुद्धाकडे वाटचाल; न्यायालयाच्या निर्णयाने गदारोळ
1

Sheikh Hasina Verdict : ‘हातात मशाली, रस्त्यावर आग…’ बांगलादेशची पुन्हा एकदा गृहयुद्धाकडे वाटचाल; न्यायालयाच्या निर्णयाने गदारोळ

अंगावर काटा आणणारा व्हिडिओ! ट्रेन येताच रेल्वे ट्रॅकवर झोपला पठ्ठ्या; अंगवारुन गाडी गेली अन्…, Video Viral
2

अंगावर काटा आणणारा व्हिडिओ! ट्रेन येताच रेल्वे ट्रॅकवर झोपला पठ्ठ्या; अंगवारुन गाडी गेली अन्…, Video Viral

स्टंटबाजी पडली महागात! एस्कलेटवरुन सायकल चालवायला गेला अन्…; असं काही घडलं की पुन्हा करणार नाही धाडस, Video Viral
3

स्टंटबाजी पडली महागात! एस्कलेटवरुन सायकल चालवायला गेला अन्…; असं काही घडलं की पुन्हा करणार नाही धाडस, Video Viral

स्वच्छता कर्मचारीसमोर तरुणाचं ‘ते’ अश्लील कृत्य; संतापून महिलेनं झाडूनं धु, धु, धुतलं, Video Viral
4

स्वच्छता कर्मचारीसमोर तरुणाचं ‘ते’ अश्लील कृत्य; संतापून महिलेनं झाडूनं धु, धु, धुतलं, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.