Operation Sindoor Trump's reaction after India's air strike on Pakistan
वॉशिंग्टन: भारताने अखेर जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला. या हल्ल्यात 28 जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर भारताने आक्रमक भूमिका घेतली होती. यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कडक कारवाई सुरु केली आणि पाकिस्तान वॉटर स्ट्राईक केली. यामुळे पाकिस्तानची घाबरगुंडी उडाली होती. यानंतर बुधवारी (07 मे) मध्यरात्रीच्या सुमारास भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या तळांवर एअर स्ट्राईक केली.
दरम्यान या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे. माध्यमांशी बोलताना ट्रम्प यांनी म्हटले की, “ही संपूर्ण परिस्थिती लाजिरवाणे आहे, मी आत्ताच ऑफिसमध्ये येताना याबद्दल ऐकलं. दोन्ही देश बऱ्याच दशकांपासून भांडत आहेत. दोन्ही देशांचा भूतकाळाकडे पाहिले तर असे काहीतरी घडणार याची कल्पना होतीच. परंतु आता दोन्ही देशांनी संयम बाळगावा. मला आशा आहे की, हे लवकर संपेल.”
VIDEO | United States President Donald Trump (@realDonaldTrump) on India’s Operation Sindoor: “I just hope it ends very quickly.”
(Source: Third Party) pic.twitter.com/QLiikx53X6
— Press Trust of India (@PTI_News) May 6, 2025
पहलगाम हल्ल्यानंतर देशातील नागरिकांनी कडक कारवाईची मागणी केली होती. सरकराने देखील याचे चोख प्रत्युत्तर देत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या 9 ठिकणांवर हल्ला केला. यामध्ये मुजजफराबाद, चकमारू, कोटली, सियालकोट, जैश ए मोहम्मद, हाफिज सईदच्या आणि लष्करच्या ठिकाणांवर हल्ला करण्यात आला आहे.
या हल्ल्यानंतर पाकिस्तान तिथरबितर झाला आहे. दरम्यान या हल्ल्यानंतर पाकिस्तान तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानने दावा केला आहे की, भारताने पाकिस्तानच्या नागरी वस्तींवर हल्ला केला आहे. परंतु भारत सरकारने स्पष्ट केले आहे की, हे केवळ दहशतवादी ठिकाणांवर करण्यात आले आहेत.
भारताच्या एअर स्ट्राईक नंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी म्हटले की, विश्वासघातकी शत्रूने पाकिस्तानमधील पाच ठिकाणी भ्याड हल्ला केला आहे. आक्रमकतेचे हे घृणास्पद कृत्य शिक्षा भोगल्याशिवाय राहणार नाही. आमचे सशस्त्र दल पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर देत आहेत.” शरीफ यांनी पुढे म्हटले की, “संपूर्ण राष्ट्र आपल्या सैन्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. आमचा दृढनिश्चय आणि मनोबल अढळ आहे. शत्रूच्या कोणत्याही कुरापतींना यश येऊ दिले जाणार नाही.”