
Osman Hadi Murder Case
सध्या हे प्रकरण चर्चेचा विषय ठरत आहे. दरम्यान बांगदलादेशच्या गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार,हादीचा मारेकरी परदेशात पळाला आहे. मात्र त्याचे ठिकाण सध्या अस्पष्ट आहे. गुप्तहेर शाखेचे प्रमुख मोहम्मद शफीकुल यांनी माध्यमांशी संवादा साधला. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. त्यांनी हेही स्पष्ट केले की, तपास यंत्रणा सध्या मारेकऱ्याचा शोध घेत आहे. हत्येतील मुख्य आरोरी फैसल करीम मसूद परदेशात पळाला असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच त्याचा सहकारी आलमगीर देखील परदेशात पळाला आहे. नुकतेच दोन्ही आरोपींच्या भारतात पळून जाण्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र गुप्तहेर प्रमुखांनी याची कोणतीही स्पष्ट माहिती मिळाली नसून अफवा पसरवण्यास मनाई केली आहे.
तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या पोलिसांना केवळ गुन्ह्यात वापरलेली पिस्तुल आणि मोटारबाईक सापडली आहे. याशिवाय काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहेत.त्यांची चौकशी सुरु आहे. सध्या या प्रकरणाला राजकीय हिंसाचाराशी जोडले जात आहे. तसेच आरोपीचा जमात-ए-इस्लामीशी संबंध असल्याचे म्हटले जात आहे.
सध्या हादीच्या हत्याकांडाअंतर्गत पोलिसांनी आतापर्यंत १३ संशयितांना अटक केली आहे. यामध्ये मुख्य आरोपी फैसल च्या जवळच्या नातेवाईक आणि कुटुंबातील सदस्यांचा समावेश आहे. यांचे कॉल रेकॉडर्सचा तपास केला जात आहे. रिमांडरवर सगळ्यांची चौकशी सुरु आहे. मुख्य आरोपींचे पासपोर्ट आधीच ब्लॉक करण्यात आले आहेत. ज्यामुळे त्यांना कायदेशीररित्या देश सोडता येणार नाही. मात्र अद्याप मारेकऱ्यांचा ठावठिकाणा न लागल्याने हादीच्या इंकलाब पक्ष्याने संताप व्यक्त केला आहे. तसेच मारेकऱ्यांना अटक न केल्यास मोठ्या राजकीय कारवाईचा इशारा दिला आहे. सध्या या सर्व घडामोडींंमुळे बांगलादेशात फेब्रुवारी २०२६ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांबाबत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
Ans: शरीफ उस्मान हादी हा बांगलादेशातील विद्यार्थी राजकारणी नेता आणि इंकलाब मंचाचा प्रमुख होता.
Ans: १२ डिसेंबर रोजी ढाक्यात वर्दळीच्या रस्त्यावर गोळीबार करण्यात आला होता. त्यानंतर सिंगापूरमध्ये उपचारादरम्यान १८ डिसेंबर रोजी त्याचा मृत्यू झाला
Ans: फैसल करीम मसुद आणि त्याचा जवळचा सहकारी आलमगीर शेख हादीच्या हत्येत मुख्य आरोपी आहेत.
Ans: बांगलादेश तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, हादीचा मारेकरी परदेशात पळाला असून त्याच्या ठिकाणाबाबत कोणतीही माहिती अद्याप स्पष्ट नाही.
Ans: हादी हत्याप्रकरणात आतापर्यंत १३ जणांना अटक करण्यात आली आहे.