
US visa cancellation: ट्रम्प सरकारचा मोठा झटका! 1 लाखांहून अधिक व्हिसा केले रद्द
US visa cancellation 2025: अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने एका वर्षांपेक्षाही कमी कालावधीत एक लाखांहून अधिक परदेशी नागरिकांचे व्हिसा रद्द केले आहेत. ही कारवाई २०२५ मध्ये करण्यात आली असून यामध्ये सुमारे ८,००० विद्यार्थी व्हिसांचा समावेश आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागानुसार, सीमा सुरक्षा आणि जनतेच्या सुरक्षेला बळकटी देण्यासाठी उचललेले हे आतापर्यंतचे सर्वांत मोठे पाऊल आहे. अमेरिकी परराष्ट्र विभागाचे मुख्य उपप्रवक्ते टॉमी पिगॉट यांनी सांगितले की, हा निर्णय अमेरिकन नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि देशाची सार्वभौमता कायम राखण्यासाठी घेण्यात आला आहे.
गेल्या वर्षांच्या तुलनेत ही कारवाई अधिक कठोर असून, एका वर्षापेक्षा कमी कालावधीत १ लाखांपेक्षा जास्त व्हिसा रद्द होणे हा नवा विक्रम आहे. २०२४ नंतर व्हिसा रद्द करण्याच्या प्रकरणांत १५० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. नीती राष्ट्रीय सुरक्षेबाबत ट्रम्प प्रशासनाच्या व्यापक दृष्टिकोनाचे द्योतक आहे. मात्र, सर्वाधिक व्हिसा कोणत्या देशांतील नागरिकांचे रद्द झाले, तसेच त्यात किती पर्यटक, विद्यार्थी किवा दीर्घकाळ राहणारे नागरिक होते. याची माहिती देण्यात आलेली नाही.
अमेरिकन कायद्यानुसार, एखादा परदेशी नागरिक अयोग्य ठरल्यास किंवा राष्ट्रीय सुरक्षेस धोका आहे. अमेरिकन सरकारच्या नवीन व्हिसा नियमांमुळे भारत सर्वाधिक प्रभावित इाला आहे. डिसेंबर २०२५ पासून, यूएस परराष्ट्र विभागाने H-1B आणि H-4 व्हिसा अर्जदारांची तपासणी सुरू केली आहे, ज्यामध्ये सोशल मीडियावरील घडामोडींची तपासणी समाविष्ट आहे. मात्र, भारतीयांसाठी व्हिसा मुलाखती पुढे ढकलण्यात आल्या आहेत, ज्यामुळे अनेक अर्जदारांना व्हिसा स्टॅम्पिंगसाठी वाट पहावी लागत आहे.
परराष्ट्र विभागाने स्पष्ट केले की, ज्या परदेशी नागरिकांचे व्हिसा रह करण्यात आले, त्याच्यावर विविध प्रकारचे गुन्हे दाखल होते. यामध्ये मारहाण, चोरी तसेच मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवण्यासारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे.
तपास आणि निगराणीची नवी व्यवस्था लागू केल्यामुळे व्हिसा रद्द होण्याच्या प्रकरणांत वाढ झाली आहे. ट्रम्प प्रशासनाने नुकतेच ‘कंटिन्युअस केटिंग सेंटर सुरू असून अमेरिकन नागरिकांसाठी धोका असणाऱ्या व्यक्तीचे व्हिसा तत्काळ रद्द करण्याची तरतूद यात करण्यात आली आहे. यापूर्वी तपासणी केवळ व्हिसा अर्ज करताना किंवा अमेरिकेत प्रवेशाच्या वेळीच होत होती. अमेरिकेत आल्यानंतरही सातत्याने निगराणी ठेवली जात असून, गुन्हेगारी प्रकरणात नाव आल्यास तत्काळ कारवाई केली जाते.