Pahalgam Terror Attack, clash between India and Pakistan Know who has how much military power
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील थंडावलेले संबंध पुन्हा एकदा चिघळले आहेत. यामुळे पुन्हा एकदा दोन्ही देशाच्या लष्करी ताकदीची चर्चा होत आहे. मंगळवारी (22 एप्रिल) जम्मू-काश्मीर येथील पर्यटने स्थळ पहलगामच्या बैसरन खोऱ्यात 5-6 दहशतवाद्यांनी पर्टकांवर गोळीबार केला. या गोळीबारात 26 जणांचा मृत्यू झाला. अनेकजण जखमी झाले. धक्कादायक बाब म्हणजे लोकांना त्यांचा धर्म विचारुन त्यांना ठार करण्यात आले. या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा (TRF) ‘द रेझिस्टंट फ्री’ ने घेतली आहे.
दरम्यान या हल्ल्यानंतर भारतात संतापाची लाट उसळली आहे. परंतु या हल्ल्याचा कट पाकिस्तानच्या रावेलकोटमध्ये रचाला गेला असल्याचे म्हणण्यात येत आहे. दरम्यान पाकिस्तानने या हल्ल्यानंतर आपली प्रतिक्रिया दिली. यामध्ये पाकिस्तानने मृत झालेल्यांबद्दल शोक व्यक्त केला आणि कुटुंबियांबद्दल सहानुभूती व्यक्त केली. यामध्ये दहशतवादी संघटनेचा उल्लेखही नव्हता. यामुळे पाकिस्तानचे दुप्पटी धोरण उघड होते. यामागचे कारणे म्हणेज पाकिस्तानमधून दहशतवाद्यांना पाठिंबा आणि प्रशिक्षण दिले जात असल्याचा आरोप गेल्या अनेक दशकांपासून होत आहे.
याच दरम्यान भारताने पाकिस्तानविरोधात मोठी कारवाई करत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादविरोधी कारवाईसाठी ठोस पाऊल उचलत नाही तोपर्यंत सिंधू जल कराराला स्थगिती देण्यात आली आहे. तसेच देशातील पाकिस्तानींना 48 तांसात देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शिवाय पाकिस्तानीन नागरिकांना भारतीय व्हिसा देखील बंद करण्यात आला आहे.
याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने देखील काही निर्णय घेतले आहेत. पाकिस्तानने भारतासाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे. पाकिस्तानने भारतासोबतच व्यापार पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्ताने देखील त्यांच्या येथील भारतीय उच्चायुक्तलयातील अधिकाऱ्यांना भारतात जाण्याचे आदेश दिले आहेत. पाकिस्तानने भारताप्रमाणेच अटारी-वाघा बॉर्डर बंद करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानमधील भारतीयांचा व्हिसा रद्द केले आहे. तसेच त्यांना भारतात परतण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सध्या दोन्ही देशांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती असून युद्धची शक्यता वर्तवली जात आहे. सोशल मीडियावर दावे केले जात आहे की, पाकिस्तान लष्करी हल्ल्याच्या तयारीत आहे. यामुळे पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर (LoC) हाय अलर्ट जारी केला आहे. भारताकडून संभाव्य प्रत्युत्तरात्मक कारवाईच्या पार्श्वभूमीवर या हालचाली सुरु असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान एक प्रश्न उपस्थित होतो की, कोणाकडे किती लष्करी ताकद आहे?
ग्लोबल फायरपॉवर इंडेक्सच्या 2025 च्या अहवालानुसार, पाकिस्तानची लष्करी ताकद कमी आहे. 2023 मध्ये सातव्या क्रमांकावर असलेला पाकिस्तान टॉप 10 लिस्टमधून बाहेर पडला आहे. सध्या पाकिस्तान लष्करी ताकदीमध्ये 12 व्या स्थानावर आहे. याउलट भारताची लष्करी ताकद वाढली असून भारत चौथ्या क्रमांकाच शक्तिशाली देश आहे.
दोन्ही देशांच्या सैनिकांच्या संखेबद्दल बोलायचे झाल्यास भारताकजे सध्या 14.55 लाख सक्रिय सैन्यबळ आहे. बारत यामध्ये दुसऱ्या स्थानी आहे. राखीव दलामध्ये बारताकडे 11.55 लाख सैन्यबळ आहे. याउलट पाकिस्तानकडे केवळ 6.54 लाख सक्रिय सैन्य असून 5.5 लाख राखीव सैन्यबळ आहे. पाकिस्तानकडे भारतापेक्षा कमी निमलष्करी दल आहे. भारत सैन्यबळातच नव्हे तर प्रशिक्षण आणि तंत्रज्ञानातही आघाडीवर आहे.
भारताकडे 4 हजार 201 रणगाडे, ज्यामध्ये टी-90 भीष्म आणि अर्जून सारख्या रणगाड्यांचा समावेश आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानकडे सुमारे 2 हजार 627 रणगाडे आहे. यामध्ये ल-खालिद, टी-८०यूडी आणि अल-जरार समाविष्ट आहेत.भारताकडे 1 लाख 48 हजार हून अधिक चिलखती वाहने आहे, मात्र पाकिस्तानकडे याची संख्या खूपच कमी आहे. तसेत स्वयं चलित तोफखानांमध्ये भारताने पाकिस्तानला मागे टाकले आहे.
भारताची हवाई ताकद देखील पाकिस्तानपेक्षा अधिक आहे. बारताकडे 2 हजार लढाऊ विमाने आहे, तर पाकिस्तानकडे 1 हजार 399 आहेत. तसेच लढाऊ विमानांमध्ये भारताकडे 513 विमाने आहेत तर पाकिस्तानकडे 328 विमाने आहेत.पाकिस्तानकडे 4 हवाई रणगाडे असून भारताकडे 6 हवाई रणगाडे आहेत. तसेच भारताच्या हवाई दलामध्ये सुखोई, राफेल, मिराज ही अत्याधुनिक विमाने आहेत. तर पाकिस्तानकडे केवळ जेएफ-१७ थंडर, एफ-१६ आणि मिराज आहे.
भारताकडे दोन विमानवाहू जहाजे आहेत, आयएनएस विक्रमादित्य आणि आयएनएस विक्रांत. तसेच 239 जहाजांसह भारताचे नौद पाकिस्तानपेक्षा अधिक प्रगत आहे. याशिवाय भारताकडे 18 पाणबुड्या आहेत, तर पाकिस्तानरकडे केवळ 8 आहेत. तसेच पाकिस्तानकडे एकही विमानवाहू जहाज नाही.
पाकिस्तानकडे सध्या 150 हून अण्वस्त्रे असल्याचा दावा केला जात आहे. भारताकडे देखील एक मजबूत अण्वस्त्र ढाल आहे. असे असले तरी पाकिस्तानच्या लष्करी सामर्थ्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. विशेष करुन दहशतवादी नेटवर आणि सीमा कारवायांमध्ये पाकिस्तानची भूमिका लक्षात घ्यावी लागेल. भारतापेक्षा पाकिस्तानचे लष्करी सामर्थ्य कमी असले तरी भारताने सावध राहण्याची गरज आहे.