Pahalgam Terror Attack: पाकिस्तानच्या अधिकाऱ्याचा उच्चायुक्तालयात केक घेऊन जातानाचा VIDEO व्हायरल; प्रश्न विचारताच वळली बोबडी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
भारताच्या जम्मू-काश्मीर येथील प्रमुख पर्यटन स्थळ पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला. या भ्याड हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर भारतात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा (TRF) म्हणजेच ‘द रेझिस्टंट फ्रंट’ ने घेतली आहे. या हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरोधात मोठी कारवाई सुरु केली. भारताने राजनैतिक संबंध कमी करत देशातील पाकिस्तानी नागरिकांना 48 तासांत देश सोडून जाण्याचे आदेश देण्यात आले. यामध्ये लष्करी अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे.
तसेच भारताने अटारी वाघा बॉर्डर बंद केली आहे. पाकिस्तानी नागरिकांच्या व्हिसावर देखील बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये पहलगाम हल्ल्यानंतर दिल्लीतील उच्चायुक्तालयाच्या बाहेर एक अधिकारी केक घेऊन जाता दिसत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भारतीयांनी संताप व्यक्त केला आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयाच्या बाहेर एक अधिकारी कार्यलयात केक घेऊन जाताना दिसत आहे. पहलगाम हल्ल्यानंतर ही घटना घडली आहे. तुम्ही पाहू शकता की अधिकारी कार्यलयात जाताना काही पत्रकार त्यांना प्रश्न विचारत आहेत. केक का घेऊन चालले आहेत? काय कारण आहे? नक्की काय खिचडी पकत आहे. तसेच भारत सरकारने अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहे त्यावर तुमचे म्हणणे काय आहे असे अनेक प्रश्न विचारले जात आहे. परंतु अधिकाऱ्याने एकाही प्रश्नाचे उत्तर दिलेले नाही. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
Delhi: A Pakistani national was seen carrying a cake into the Pakistan High Commission pic.twitter.com/TeUnrpsJlI
— IANS (@ians_india) April 24, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @ians_india या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला लाखो लोकांनी पाहिले असून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. एका युजरने पाकिस्तानवर एकद बॉम्ब टाकून विषय संपवा असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका युजरने सरकारने यांचे लाड थांबवले पाहिजेत असे म्हटले आहे. तिसऱ्या एकाने पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारण्यापेक्षा तिथेच मारुन टाकावे असे म्हटले आहे. आणखी एकाने आता कशी बोबडी वळली असे म्हटले आहे. सध्या अशा तीव्र आणि संतप्त प्रतिक्रिया सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.