Pahalgam Terror Attack During India-Pakistan dispute Pakistan receives a large consignment of missiles from China
बिजिंग: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे मंगळवारी 22 एप्रिल रोजी पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा (TRF) म्हणजेच ‘द रेझिस्टंट फ्री’ ने घेतली. दरम्यान या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण वातावरण आहे. जगभरातून भारताला पाठिंबा मिळत आहे. परंतु याच दरम्यान जगातील दुसऱ्या क्रमांकाचा महसत्ता असणार देशी चीनचा पाठिंबा नक्की कोणाला आहे याबाबत अद्याप अस्पष्टता आहे. परंतु याच दरम्यान भारताची चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये तणाव वाढत असताना चीनने पाकिस्तानला मोठा शस्त्रास्त्रांचा पुरवठा केला आहे. यामध्ये चीनने 10 हून अधिक PL-15 लॉंग Range Air-to-Air Missile (VLRAAM) ची क्षेपणास्त्रे दिली आहेत. यामुळे भारत आणि पाकिस्तानमधील तणाचे रुपांतर युद्धात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चीनने दिलेल्या या लॉंग रेंजच्या क्षेपणास्त्रांची क्षमता 200 किलोमीटरपर्यंतचा परिसर उद्धवस्त करण्याची शक्यता आहे. या तणावाच्या काळात पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री आणि चिनी राजदूतांची बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी चीनचे आभारही मानले.
Ambassador of China, Jiang Zaidong called on Deputy Prime Minister/Foreign Minister, Senator Mohammad Ishaq Dar @MIshaqDar50 today.
Reaffirming the all-weather strategic partnership between Pakistan and China, the two sides exchanged views on the evolving regional situation and… pic.twitter.com/BVZZpWHRpp
— Ministry of Foreign Affairs – Pakistan (@ForeignOfficePk) April 26, 2025
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवर पोस्ट शेअर करत माहिती दिली की, चीनचे राजदूत जियांद झैदोंग यांनी उपपंतप्रधान, परराष्ट्र मंत्री सिनेटर मोहम्मद इशाक दार यांची भेट घेतली. ही भेट पाकिस्तान आणि चीनमधील दीर्घकालीन धोरणात्मक भागीदारीची पुष्टी करते. दोन्ही नेत्यांनी देशातील प्रादेशिक परिस्थितीवर विचारांची देवाण-घेवाण केली आणि दोन्ही देशांतील संबंधांमध्ये समन्वय राखण्याचे मान्य केले.
सध्याच्या भारत आणि पाकिस्तानमधील तणावपूर्ण परिस्थिती पाहता चीनचे हे पाऊल भारतासाठी धोकादायक मानले जात आहे. भारतविरुद्धच्या लढाईत पाकिस्तानसाठी चीन महत्वाचा खेळाडू ठरु शकतो. चीनकडे संयुक्त राष्ट्रांमध्ये व्होटो पॉवर असल्यामुळे चीन पाकिस्तानच्या बाजूने आंतरराष्ट्रीय स्तरावर मदत करु शकतो. तसेच मोठ्या प्रमाणात शस्त्रपुरवठा देखील करु शकतो. यामुळे चीन आणि पाकिस्तानमधील ही वाढती जवळीक भारतासाठी चिंतेचे कारण ठरत आहे.