ब्रिटनचे प्रिन्स अँड्र्यू यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करणारी महिला वर्जिनिया ग्रिफेचे निधन झाले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, वर्जिनियाने स्वत:चे आयुष्य संपवले असण्याची शक्यता आहे. मात्र अद्याप याची कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. वर्जिनायाने 2011 साली अमेरिकेतील हाय प्रोफाइल वेश्याव्यवसाय नेटवर्कचा पर्दाफाश केला होता. यामुळे संपूर्ण जगाला धक्का बसला होता. सध्या तिच्या मृत्यूच्या घटनेने देखील अनेकांना धक्का बसला आहे..
वर्जिनिया गेल्या काही वर्षांपासून ऑस्ट्रेलियामध्ये राहत होती. वर्जिनियाने लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या महिलांसाठी वकिल म्हणून काम केले. तिच्या कुटुंबाने एक निवेदन जारी केले असून निवेदनात म्हटले आहे ती, वर्जिनियाने संपूर्ण आयुष्य शारीरिक आणि लैंगिक शोषणशी लढा देत राहिली.
2011 मध्ये एका मुलाखतीदरम्यान वर्जिनियाने तिच्यासोबत झालेल्या लैंगिक अत्याचाराचा खुलासा केला होता. तिने सांगितले होते की, ती 15 वर्षाची असताना जेफ्री एपस्टीनच्या नेटवर्कमध्ये त्यांना फसवण्यात आले होते. तिला सोबत अनेक हाय प्रोफाइल आणि प्रभावशाली व्यक्तीमत्व असणाऱ्या लोंकाशी लैंगिक संबंध ठेवण्यासाठी भाग पाडण्यात आले होते. याच मुलाखतीदरम्यान वर्जिनियाने प्रिन्स अँड्र्यूसोबतच्या त्यांच्या भेटीचा उल्लेखही केला होता.
गेल्या महिन्यात वर्जिनियाने सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये तिने दावा केला होता की, तिच्याकडे जगण्यासाठी आता केवळ पाच दिवस उरले आहेत. एका स्कूल बसने तिला धडक दिली होती. या अपघातात तिला गंभीर दुखापत झाली होती. यामुळे तिला किडनी फेल्युअरची समस्या निर्माण झाली असल्याचे तिने पोस्टमध्ये म्हटले आहे. शेवटच्या क्षणी वर्जिनियाने आपल्या मुलांना पाहण्याची इच्छा व्यक्त केली होती.
वर्जिनियाने प्रिन्स अँड्र्यूविरोधात 2021 मध्ये लैंगित शोषणाच्या आरोप करत न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेत दाखल केलेल्या माहितीनुसार, वर्जिनियावर लैंगिक अत्याचार झाला त्यावेळी त्या 17 वर्षांच होत्या. वर्जिनियाने सांगतिले होते की, एपस्टीनने त्यांना अँड्र्यूकडे सोपवले आणि त्यांचे लैंगिक शोषण करण्यात आले. प्रिन्स अँड्र्यूसोबत तीन वेळा लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडण्यात आले होते.
वर्जिनियाच्या आरोपांनंतर प्रिन्स अँड्र्यूला शाही कुटुंबातून बेदखल करण्यात आले. वर्जिनियाच्या धैर्यामुळेच एपस्टीनच्या हाय प्रोफाइल वेश्याव्यसायाचा खुलासा झाला. जेफ्री एपस्टीनवर अनेक अल्पवयीन मुलींच्या तस्करी आणि लैंगिक शोषणाचे आरोप होते. 2019 मध्ये जेफ्री एपस्टीनने जेलमध्ये आपले जीवन संपवले. मात्र अनेकांनी दावा केला होता की, त्यांची हत्या करण्यात आली आहे. जानेवारी 2014 मध्ये जेफ्री एपस्टीनशी संबंधित वेश्याव्यवसायाच्या प्रकरणाचा खुलासा करण्यात आला होता. यामध्ये बिल क्लिंटन, माइरल, जॅक्सन आणि प्रिन्स अँड्र्यू यांच्यासारख्या हाय प्रोफाइल व्यक्तींची नावे समोर आली होती.