Pahalgam Terror Attack, Pakistan Foreign Minister Ishaq Dar calls to China, Saudi, UK in desperate bid for support amid tensions with India
इस्लामाबाद: पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल करार स्थगित केला आहे. यामुळे पाकिस्तानचा जळफळाट झाला आहे. भारताकडून कोणत्याही प्रकारची लष्करी कारवाऊ होण्याची शक्यता असताना पाकिस्तान मदतीसाठी इतर देशांकडे भीक मागत आहे. कधी चीनकडे, कधी सौदी अरेबिया, तर कधी ब्रिटनकडे तर कधी रशियाकडे पाहत आहे. शिवाय पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी हल्ल्याच्या चौकशीची स्वतंत्र मागणी केली आहे. चीनसह इतर देशांना देखील चौकशीमध्ये सहभीग होण्याचे आवाहन पाकिस्तानने केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दर यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांशी फोनवरुन संवाद साधला. यावेळी त्यांनी चीनकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली. पाकिस्तानने केवळ चीनकडून नव्हे तर ब्रिटीश परराष्ट्र मंत्री डेव्हिड लॅमी आणि इतर प्रादेशिक समकक्षकांकडे परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी बैठकीचे आमंत्रण दिले आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांना भारत पाकिस्तानमधील वाढत्या तणावपूर्ण परिस्थितीबद्दल माहिती दिली. दार यांनी जारी केलेल्या निवेडनानुसार दोन्ही नेत्यांनी भारताच्या सिंधू जल करार स्थगित करण्याच्या निर्णयाला एकतर्फी कृती म्हटले आहे. तसेच त्यांनी वर्चस्ववादी धोरणांना विरोध केला आहे. निवेदनात म्हटले आहे की, भारताच्या एकतर्फी कारवाईला पाकिस्तान नाकारत आहे. भारताची ही कृती पाकिस्तानविरुद्धचा प्रचार आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानने आपला पवित्रा बदलत आंतरराष्ट्रीय चौकशीची मागणी केली आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आशिफ यांनी माध्यामांना दिलेल्या एका मुलाखतीतत, या संकटात चीन, रशिया आणि इत्तर पाश्चात्य देशांनी सकारात्मक भूमिका बजावली पाहिजे असे म्हटले आहे.’ आसिफ यांनी म्हटले आहे की, भारत आणि मोदी खोटे बोलत आहेत. याची चौकशी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय तपास पथक स्थापन करावे.
वेळी चीनच्या सरकारी वृत्तसंस्थेने देखील, पाकिस्तानच्या विनंतीवरुन पहलगाम हल्ल्याच्या निष्पक्ष चौकशीला पाठिंबा दिला होता. भारत आणि पाकिस्तान संयम बाळगतील असे चीनने म्हटले होते. संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत पाकिस्तानने पहलगाम हल्ल्याच्या चौकीशीची स्वतंत्र्य मागणी केली असून चीनने याला पाठिंबा दिला आहे.
एकीकडे पाकिस्तान भारताला धमक्यावरुन धमक्या देत आहे. दहशतवाद्याशी आमचा कोणाताही संबंध नाही असे म्हणत आहे, तर दुसरकीडे पाकिस्तानने दहशतवाद्यांना स्वातंत्र्य सैनिक संबोधले आहे. याशिवाय पाकिस्तानने अंतर्गत बाबींसाठी हा हल्ला भारतानेच घडवून आणला असल्याचा आरोप देखील केला आहे. यावरुन पाकिस्तानचे दुप्पटी धोरण स्पष्टपण उघड होते.
जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी पर्यटकांवर दहशतवादी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला तर 17 लोकं गंभीर जखमी झाले. या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा (TRF) ने म्हणजेच द रेझिस्टंट फ्रंट ने घेतली आहे.