Pahalgam Terror Attack Pakistan High commissioner of India Abdul Basit slams pakistani ministers
इस्लामाबाद: जम्मू आणि काश्मीरयेथील पहलगमामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल करार स्थगित केला आहे. या पहलगाम हल्ल्यातच 26 जणांचा मृत्यू झाला आहे. भारताने यासाठी पाकिस्तानला जबाबदार धरले आहे. यामुळे पाकिस्तान संतप्त झाला असून बेताल विधाने करत आहे. कधी भारताला अणु बॉम्बची धमकी दिली जात आहे, तर कधी युद्धाचे आव्हान दिले जात आहे.
अलीकडेच पाकिस्तानचे रेल्वेमंत्री हनीफ अब्बासी यांनी एका पत्रकार परिषदेदरम्यान भारताला धमकी दिली होती की, आमची सर्व क्षेपणास्त्रे भारताच्या निशाण्यावरच आहेत. याशिवाय पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसीन नकवी यांनी देखील बेताल विधान करत म्हटले होते की, भारताने पाकिस्तानविरोधात कोणतेही पाऊल उचलले तर पाकिस्तान युद्धासाठी तयार आहे. शिवाय पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी देखील भारताचे आरोप फेटाळून लावले आहेत.
शाहबाज यांनी म्हटले आहे की, पहलगाममध्ये जे काही घडले, ते केवळ आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण आहे. आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पाकिस्तानचे बिलावल बुट्टो यांनी देखील भारताला मोठी धमकी दिली आहे. त्यांनी सिंधू जल करार स्थगित करण्यावर म्हटले आहे की, भारताची एकतर्फी कृती आम्ही नाकारत आहे. सिंधू नदी आमची आहे आणि आमचीच राहील असे बुट्टो य़ांनी म्हटले आहे .त्यांनी म्हटले की, सिंदू नदीत एकतर पाणी वाहील किंवा त्यांचे रक्त.
याच वेळी पाकिस्तानी माजी राजनियत अब्दुल बासित यांनी पाकिस्तानी मंत्र्यांच्या या विधानांवर फटकारले आहे. त्यांनी म्हटले आहे की, पाकिस्तानी मंत्र्यांनी त्यांचा शत्रू भारताकडून शिकले पाहिजे. युट्यूबवरील एका व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानमधील प्रत्येक मंत्री चौधरी झाला आहे. कोणीही, कधीही उठून पत्रकार परिषद घेत आहे, जास्त नाही तर किमान तुमच्या शत्रू देश भारताकडून तरी शिकले पाहिजे. भारतात पक्षकार परिषध घेऊन माध्यमांचे लक्ष वेधून घेतले जात नाही. भारतातील सर्वजण एकत्रितपणे कार्य करत आहेत आणि आपले धेय्य साध्यण्याचा प्रयत्न कर आहेत.
बासित यांनी म्हटले आहे की, ‘भारतासाठी पहलगाम हल्ला गंभीर बाब आहे. यामुळे निश्चितच भारताकडून कोणती ना कोणती कारवई केली जाणारच आहे. अशा परिस्थितीत आपण सावधगिरी वाळगून बोलले पाहिजे. बासित पुढे म्हणाले की, पाकिस्तान सरकारने प्रत्येकाला पत्रकार परिषद घेण्याची आणि ममाप्रमाणे बोलण्याची परवानी देऊ नये.
तसेच त्यांनी पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्याजा आसिफ यांच्या पत्रकार परिषदेबद्दल देखील आपले मत व्यक्त केले. बासित यांनी म्हटले की, संरक्षण मंत्र्यांनी स्काय न्यूज ला दिलेल्या पत्रकार परिदेत त्यांची बॉडी लॅंग्वेज योग्य नव्हती. कधी ते केस ठीक करत होते, तर कधी इकडे तिकडे खाजवत होते. त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे देखील नीट दिली नाहीत. याशिवाय रेल्वेमंत्री हनीफ यांच्या टीका करताना बासित यांनी म्हटले की, त्यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसून त्यांना पत्रकार परिषद घेण्याची परवानगी कोणी दिली.
अशा संकटकालीन परिस्थितीला कसे हाताळायचे याची पंतप्रधानांना देखील कल्पना नाही. याशिवाय त्यांनी गृहमंत्री मोहसीन यांच्यावर देखील निशाणा साधला. त्यांची पत्रकार परिषद अनावश्यक होती असे बासित यांनी म्हटले. त्यांचे पत्रकार परिषदेतील बोलणे अगदी हास्यास्पद होते असे म्हटले आहे. तसेच बासित यांनी म्हटले की, सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये परिस्थिती गंभीर आहे. हे लक्षात घेऊनच पाकिस्तानच्या परराष्ट्री मंत्रालयाने निर्देश जारी केले पाहिजेत. निरर्थक बोलणार्यांना पत्रकार परिषद घेण्याची परवानगी देण्यात येऊ नये असे बासित यांनी म्हटले.