Pahalgam Terror Attack Pakistan navy chief provocative speech on pahalgam terror attack
इस्लामाबाद: पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या कारवाईच्या भीतीने पाकिस्तानमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. रोज कोणी एक नेते किंवा ल्ष्करी अधिकारी भडकवणारी विधाने करत आहेत. भारताला वारंवार धमक्या दिल्या जात आहे. दरम्यान पुन्हा एकदा पाकिस्तानचे नौदल प्रमुख ॲडमिरल नवीद अश्रफ यांनी आणखी एक विधान केले आहे. अश्रफ यांनी पाकिस्तानच्या नौदल सैनिकांना उद्देशून हे विधान केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, आपल्याला स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली आहे. यामुळे युद्धासाठी तयार राहा. त्यांच्या या विधानावरुन स्पष्ट होते की, पाकिस्तान भारताच्या संभाव्य लष्करी कारवाईच्या भीतीने बिथरला आहे. यामुळे युद्धाची तयारी सुरु केली आहे.
नौदल प्रमुख अश्रफ यांनी म्हटले आहे की, आपल्याला स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली आहे. देशाला आपल्याकडून अनेक अपेक्षा आहेत. देशासाठी काहीतरी करण्याची वेळ आली आहे. यामुळे युद्धासाठी तयार राहा. अश्रफ यांचे हे विधान थेट युद्धाच्या तयारीचे संकेत देतात. त्यांनी आपल्या सैन्याला युद्धासाठी तयार राहण्याचे आदेश दिले आहेत.
पहलगामच्या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कडक कारवाई केली. यामुळे पाकिस्तान संतप्त झाला आहे. एकामागून एका आक्षेपहार्य आणि भडकवणारी विधाने समोर येत आहेत. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आसिफ ख्वाजा, तर उपपंतप्रधान इशाक दार, बिलावल भुट्टो आणि रेल्वेमंत्र्यांनी भारताविरोधात भडकवणारी विधाने केली आहेत.
संरक्षण मंत्री आसिफ ख्वाजा आणि बिलावल भुट्टो यांनी भारताच्या सिंधू जल करारा स्थगित केल्यानंतर भारताला धमकी दिली आहे. ख्वाजा यांनी भारताने सिंधू नदीवर धरण बांधले किंवा पाणी रोखले तर हल्ल्याची धमकी दिली आहे. तर बिलावल भुट्टो यांनी सिंधू नदीत रक्तपाताची धमकी दिली आहे. तसेच पाकिस्तानचे सैन्य युद्धासाठी तयार असल्याचे म्हटले आहे. याशिवाय पाकिस्तानने अणुबॉम्बच्या हल्ल्याची देखील धमकी दिली आहे. आतापर्यंतच्या या विधानांवरुन लक्षात येते की, पाकिस्तान भारताला युद्धाचे आव्हान देत आहे.
बारत आणि पाकिस्तानमधील वाढता तणाव पाहता जागतिक स्तरावर चिंता व्यक्त केली जात आहे. अमेरिकेपासून ते रशियापर्यंत अनेक देशांनी भारताला संयम राखण्याचा सल्ला दिला आहे. तसेच या तणावादरम्यान इराणचे परराष्ट्र मंत्री अराघची भारत-पाक दौऱ्यावर येणार आहेत. यामुळे इराण दोन्ही देशांमध्ये मध्यस्थीची भूमिका बजावणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. चीनने आपला पूर्णत: पाठिंबा पाकिस्तानला दर्शवला आहे, तर अमेरिका भारताच्या बाजून असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. तर यादरम्यान काही मुस्लिम देश पाकिस्तानला पाठिंबा देत असल्याचे उघड झाले आहे.