Pahalgam Terror Attack: '…तर बांगलादेशने भारताच्या नॉर्थईस्ट राज्यांचा ताबा घ्यावा'; माजी आर्मी ऑफिसरचा युनूस यांना सल्ला (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
ढाका: जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलली आहे. भारताने पाकिस्तानविरोधात कारवाई करत सिंधू जल करार स्थगित केला आहे, तर पाकिस्तानशी असलेले राजनियक संबंध देखील कमी केले आहेत. याशिवाय भारत पाकिस्तानविरोधात लष्करी कारवाईच्या तयारीत असल्याचे देखील म्हटले जात आहे. भारताच्या या कारवाईमुळे पाकिस्तान बिथरला आहे. वारंवार पाकिस्तानकडून भारताला धमक्या येत आहेत. याच दरम्यान बांगलादेशने पुन्हा एकदा संतापजनक विधाने केले आहे. बांगलादेशचे माजी आर्मी ऑफिसर मेजर जनरल ए.एल.एम. फजरुल यांनी भारताच्या चिकन नेकवर खळबळजनक असे विधान केले आहे. यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे.
माजी आर्मी ऑफिसर फजरुल हे मोहम्मद युनूस यांच्या जवळचे सहकारी मानले जातात. त्यांनी युनूस यांना सल्ला दिला आहे की, भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानवर हल्ला केल्यास भारताच्या नॉर्थ ईस्ट राज्यांवर कब्जा करण्यास सांगितले आहे. मात्र बांगलादेश सरकारचे यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. यामुळे भारत आणि बांगलादेशमधील संबंध आणखी बिघडण्याची शक्यता आहे.
ALM Fazlur Rahman,
A Retired Bangladeshi Maj Gen, suggested that Bangladesh should invade and occupy all seven northeastern states of India if New Delhi attacks Pakistan, as a retaliation for false flag operation of pehlgam.Brotherhood 🇵🇰 🇧🇩 ✌🏾 pic.twitter.com/Ny1m3pvprm
— Alpha Soldier 🪖 (@WolfSoldier313) May 2, 2025
बांगलादेशचे माजी आर्मी ऑफिसर फजरुल रहमान यांनी मंगळवारी ( दि. 29 एप्रिल) रोजी एक फेसबुक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले होते की, ‘जर भारताने पाकिस्तानवर पहिल्यांदा हल्ला केला तर बांगलादेशने भारताच्या ईशान्येकडील सात राज्यांना ताब्यात घ्यावे.’ त्यांनी हेही म्हटले होते की, यासाठी चीनसोबत संयुक्त लष्करी बैठक घेण्यात यावी, हे अत्यंत गरजेचे आहे.
दरम्यान शुक्रवारी (02 मे) बांगलादेशच्या अंतरिम सरकारने माजी आर्मी ऑफिसरच्या या विधानवर स्पष्टीकरण दिले. बांगलादेशच्या अंतरिम सरकारने यापासून बांगलादेशला दूर केले. फजलुर यांचे विधान हे वैयक्तिक मत आहे, असे बांगलादेशच्या मोहम्मद युनूसच्या नेतृत्वाखालील सरकारने म्हटले. तसेच मोहम्मद युनूस सरकारने हेही स्पष्ट केले की, आम्हाला भआरतासोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवायचे आहेत. बांगलादेश सार्वभौमत्व, प्रादेशिक अखंडता, परस्पर आदर आणि शांततापूर्म संबंधांना महत्व देते असे बांगलागेशच्या मोहम्मद युनूस सरकारने म्हटले.