
pak-afghan-war- Pakistan's open threat to Afghanistan, khwaja asifs big statment
Pakistan Afghanistna War News Marathi : इस्लामाबाद/काबूल : पाकिस्तान (Pakistan) आणि अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) गेल्या महिन्यात तीव्र संघर्ष झाला होता. दोन्ही देशांनी त्यांच्या सीमांवर हल्ला केल्याचा आरोप एकमेकांवर आरोप केला होता. पाकिस्तानने दावा केला होता की, अफगाणिस्तानने त्यांच्या दक्षिण-पश्चिम आणि उत्तर-पश्चिम सीमांवर अफगाण सैन्याकडून हल्ला करण्यात आला होता यामुळे त्यांनी हल्ला केला. या हल्ल्यानंतर अफगाणिस्ताननेही हल्ला केला आणि संघर्ष सुरु झाला होती. बुधवारी (१५ ऑक्टोबर) दोन्ही देशांनी युद्धविरामाची घोषणा केली आहे.
सध्या दोन्ही देशांमध्ये शांतता चर्चेसाठी बैठकीचे आयोजन केले जात आहे. दोन्ही देशात तात्पुरती युद्धबंदी लागू आहे. येत्या आठवड्यात तुर्कीच्या इस्तंबूलमध्ये दोन्ही देशांच्या प्रतिनिधीमंडळाची तिसरी बैठक होणार आहे. पण या बैठकीपूर्वीच पाकिस्तानने तालिबानला खुली धमकी दिली आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आसिफ ख्वाजा यांनी खळबळजनक विधान केले आहे.
त्यांना बुधवारी (०५ नोव्हेंबर) एका मुलाखतीदरम्यान ही धमकी दिली. ख्वाजा यांना विचारण्यात आले होते की, तालिबानसोबतचू बैठक अयशस्वी ठरल्यास पाकिस्तान काय करेल. यावर त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले की, जर चर्चा निष्फळ ठरली, तर युद्ध होईल. त्यांच्या या विधानाने मोठी खळबळ उडाली आहे. वातावरण अजून तापले असून पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये पुन्हा संघर्ष सुरु होण्याची शक्यता आहे.
येत्या तिसऱ्या बैठकीचा उद्देश सीमेवरील हिंसाचार कमी करणे, ड्रोन हल्ले आणि व्यापारी मार्गावर बंदी हटवणे हटवणे, यांसारख्या समस्यांवर चर्चा होणार आहे, परंतु ख्वाजा यांच्या विधानाने या चर्चेपूर्वीचे संघर्ष सुरु होण्याची शक्यता आहे. एवढेच नव्हे तर, ख्वाजा यांना तालिबानवर दहशतवाद्यांना आश्रय दिल्याचा आणि पाकिस्तानच्या सीमापार हल्ल्यांबाबद कोणतीही कारवाई न केल्याचा आरोप केला आहे. पण तालिबानने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच पाकिस्तानच्या हल्ल्यांची निंदा केली आहे. तर ISIS च्या दहशतवाद्यांना आश्रय दिल्याचा आरोप त्यांच्यावर केला आहे.
पूर्वीची चर्चा
यापूर्वी इस्तंबूलमधील चर्चेत ती्र वाद झाला होता. पण नंतर दोन्ही देशात ३० ऑक्टोबर रोजी युद्धविराम वाढवण्यावर सहमती झाली. सध्या येत्या आगामी बैठकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. या बैठकीतचे नेतृत्त्व तालिबानचे गुप्तचर प्रमुख आणि पाकिस्तानचे राष्ट्राय सुरक्षा सल्लागार करत आहे. या चर्चेत कोणताही ठोस निर्णय झाला नाही, तर तीव्र संघर्ष होईल अशी भीती निर्माण झाली आहे. आसिफ यांच्या धमकीमुळे दोन्ही देशांतील शांतता चर्चेला धक्का बसला आहे.
FAQs(संबंधित प्रश्न)
प्रश्न १. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये का सुरु आहे संघर्ष?
पाकिस्तानच्या मते, अफगाणिस्तानने त्यांच्या दक्षिण-पश्चिम आणि उत्तर-पश्चिम सीमांवर अफगाण सैन्याकडून हल्ला करण्यात आला होता यामुळे त्यांनी हल्ला केला. या हल्ल्यानंतर अफगाणिस्ताननेही हल्ला केला आणि संघर्ष सुरु झाला.
प्रश्न २. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये तणावाचे कारण काय?
२०२१ मध्ये अमेरिकेने अफगाणिस्तानवर आक्रमण केले होते. यावेळी पाकिस्तानने अमेरिकेला साथ दिली. तेव्हापासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये संघर्ष सुरु आहे.