PAK VS AFG War : तालिबानपुढे पाकिस्तानने टेकले गुडघे? जोरदार हल्ल्यामुळे बावचळून केली युद्धबंदीची याचिका (फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Pak-Afghan War : इस्लामाबाद/काबूल : भारताचे शेजारी देश पाकिस्तान (Pakistan) आणि अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) गेले काही दिवस तीव्र संघर्ष सुरु होता. कंधारपासून ते कराचीपर्यंत हवाई हल्ल्यांमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरु होता. अखेर बुधवारी (१५ ऑक्टोबर) दोन्ही देशांनी युद्धविरामाची घोषणा केली आहे. दोन्ही देशांमध्ये बुधवारी संध्याकाळी ६ वाजल्यापासून ४८ तासांचा युद्धविराम लागू करण्यात आला आहे. याचा उद्देश सीमरेषेवरील हिंसा थांबवून शांतता चर्चेसाठी मार्ग मोकळा करणे आहे.
PAK vs AFG War :- ‘इस्लामी मैत्री’चा शेवट? तालिबान-पाकिस्तान नात्यात फूट पडली
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने यावर अधिकृत निवेदन जाहीर केले आहे. या निवेदनानुसार, दोन्ही देशांनी परस्पर संवादाद्वारे मतभेदांवर तोडगा काढण्यासाठी युद्धबंदीचा निर्णय घेतला आहे. मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, यामुळे भविष्यातील जीवितहानी टाळता येईल आणि दोन्ही देशांमध्ये मैत्रीचे संबंध पुन्हा प्रस्थापित होतील.
तर दुसरीकडे तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद यांनी दोन्ही देशात युद्धविराम लागू झाल्याचे सांगितले. तसेच त्यांनी ही युद्धबंदी पाकिस्तानच्या विनंतीवरुन झाली असल्याचे म्हटले. मुजाहिद यांनी म्हटले की, अफगाण सैन्य दुसऱ्या बाजूने युद्धबंदीचे उल्लंघन होत नाही, तोपर्यंत याचे काटेकोरपणे पालन करेले.
At the request and insistence of the Pakistani side, the ceasefire between the two countries will begin after 5:30 PM today.
The Islamic Emirate also directs all its forces to adhere to the ceasefire and not to violate it after 5:30 PM today unless there is a violation. — Zabihullah (..ذبـــــیح الله م ) (@Zabehulah_M33) October 15, 2025
या संघर्षामुळे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमावर्ती भगात मोठे नुकसान झाले आहे. सुरुवातीला पाकिस्तान हवाई हल्ला केला होती, ज्याला प्रत्युत्तर म्हणून अफगाण सैन्यानेही ड्रोन हल्ले केले. यामध्ये शेकडो नागरिक, महिला, लहान मुले जखमी झाले आहे. यामुळे अफगाणिस्तानमधील अनेक लोकांची घरे उद्ध्वस्त झाली आहे. ८० हून अधिक महिला आणि मुलांवर उपचार सुरु आहेत.
पाकिस्तानने दावा केला आहे की, त्यांच्या दक्षिण-पश्चिम आणि उत्तर-पश्चिम सीमांवर अफगाण सैन्याकडून हल्ला करण्यात आला होता. यामुळे त्यांनी देखील याला प्रतिकार केला. या चकामकीत पाकिस्तानचे सहा सैनिक ठार झाल्याचे सांगतिले जात आहे.
२००१ मध्ये अमेरिकेने अफगाणिस्तानवर आक्रमण केले होते. यावेळी पाकिस्तानने अमेरिकेला स्वत:च्या स्वार्थासाठी पाठिंबा दिला होती. यामुळे एकेकाळी इस्लामिक बंधु मानले जाणाऱ्या देशात वाद उभारला.
TTP ने दावा केला की, पाकिस्तान खऱ्या इस्लामाविरोधात आहे. यावेळी तहरीक-ए-तालिबान म्हणजेच टीटीपी अफगाणचा जवळीक मानला जायचा. २०२१ मध्ये अफगाणिस्तान मध्ये तालिबान सत्तेत आले आणि पाकिस्तानने टीटीपीला लक्ष्य करण्यास सुरु केली. यामुळे दोन्ही देशांत वाद सुरु झाला.
शिवाय दोन्ही देशांत दीर्घकाळापासून ड्युरंड सीमारेषेवरुनही वाद आहे. दोन्ही देश एकमेकांवर हल्ले आणि दहशतवाद्यांना आश्रय देण्याचा आरोप करतात.
प्रश्न १. पाकिस्तान-अफगाणिस्तानमध्ये किती तासासांठी युद्धविराम लागू झाला आहे?
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये ४८ तासांसाठी युद्धविराम लागू करण्यात आला आहे.
प्रश्न २. पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर तालिबानने काय दावा केला?
तालिबानने पाकिस्तानच्या विनंतीवरुन दोन्ही देशात युद्धविराम लागू झाल्याचे दावा केला आहे.