Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाकिस्तान-अफगाण तणाव शिगेला; अफगाण मंत्र्याची थेट धमकी, ‘पाक सैन्याला भारतीय बॉर्डरपर्यंत खदेडणार’

Pakistan-Afghanistan Conflict: ओमारी यांनी थेट पाकिस्तानी सैन्याला उद्देशून म्हटले की, जर अफगाण जमाती आणि राष्ट्रांनी एकदा तुम्हाला धार्मिक आदेशांवरून आक्रमणकारी घोषित केले तर मी शपथ घेतो की तुम्हाला भारतीय.....

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Oct 19, 2025 | 03:32 PM
पाकिस्तान-अफगाण तणाव शिगेला; अफगाण मंत्र्याची थेट धमकी (Photo Credit- X)

पाकिस्तान-अफगाण तणाव शिगेला; अफगाण मंत्र्याची थेट धमकी (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:
  • पाकिस्तान-अफगाण तणाव शिगेला
  • अफगाण मंत्र्याची थेट धमकी
  • ‘पाक सैन्याला भारतीय बॉर्डरपर्यंत खदेडणार’

काबूल/इस्लामाबाद: पाकिस्तानी सैन्याच्या वाढत्या कारवाईमुळे संतापलेल्या अफगाणिस्तानचे उप-गृहमंत्री आणि तालिबान नेते मौलवी मुहम्मद नबी ओमारी (Mawlawi Muhammad Nabi Omari) यांनी पाकिस्तानला (Pakistan) अत्यंत कठोर इशारा दिला आहे. अफगाण सेना पाकिस्तानी सैनिकांना भारतीय सीमेपर्यंत हाकलून लावू शकते, असे ओमारी यांनी म्हटले आहे. नबी ओमारी यांनी पाकिस्तानी सैन्याला थेट उद्देशून म्हटले “जर अफगाण जमातीने (कबीले) आणि राष्ट्राने तुम्हाला धार्मिक आदेशानुसार एकदा आक्रमणकारी घोषित केले, तर मी शपथ घेतो की तुम्हाला भारतीय सीमेपर्यंतही सुरक्षा मिळणार नाही.”

शहबाज शरीफ आणि सैन्य नेतृत्वावर टीका

मौलवी मुहम्मद नबी ओमारी यांनी पाकिस्तान सरकार आणि लष्करी नेतृत्वावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, पाकिस्तानी सैन्य शासन प्रत्येक काम दुसऱ्यांच्या इच्छेनुसार करते. त्यांनी अलीकडेच शहबाज शरीफ (पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान) यांना ट्रम्पची चापलूसी (खुशामत) करताना पाहिले असेल, असेही ते म्हणाले.

🚨🔻
Deputy Minister of Interior, Mawlawi Muhammad Nabi Omari’s message to the Pakistani military regime:
“If the Afghan tribes and nation once declare you an invader by religious decree, I swear by God, you will not find safety even up to the Indian border.” pic.twitter.com/NouBIaF8N8 — Afghanistan Defense (@AFGDefense) October 18, 2025

Pak-Afghan Ceasefire : पाकिस्तान आणि अफगाणिस्तान तात्काळ युद्धबंदीवर सहमत; कतारच्या मध्यस्थीने झाला करार

डूरंड रेषेवरील क्षेत्रावर दावा

ओमारी यांनी पुढे म्हटले की, सध्याची परिस्थिती हे संकेत देते की डूरंड रेषेच्या पलीकडीलजी क्षेत्रे एकेकाळी अफगाणिस्तानच्या हातून निसटली होती, ती आता पुन्हा अफगाणिस्तानच्या ताब्यात येऊ शकतात. तालिबान नेत्याचा हा इशारा अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवर वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आला आहे.

पाक-अफगाणिस्तानमध्ये तातडीने युद्धविरामावर सहमती

या वाढत्या संघर्षादरम्यान, कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी मोठी घोषणा केली आहे. एका आठवड्याहून अधिक काळ सुरू असलेल्या भीषण संघर्षानंतर अफगाणिस्तान आणि पाकिस्तान तातडीने युद्धविरामावर सहमत झाले आहेत. यापूर्वी पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या निवासी भागांमध्ये केलेल्या हल्ल्यांमध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला होता.

या करारासाठी कतार आणि तुर्किए यांची मध्यस्थी

कतारच्या निवेदनानुसार, दोन्ही शेजारील देश स्थायी शांतता आणि स्थिरता मजबूत करण्याच्या उद्देशाने यंत्रणा (Mechanism) स्थापित करण्यासही सहमत झाले आहेत. या शांतता चर्चेचे नेतृत्व दोन्ही देशांच्या संरक्षण मंत्र्यांनी केले.

युद्धाचे गणित बदलणार! तैवानने तयार केली मल्टिलेयर डिफेन्स सिस्टीम; चीनच्या J-20 फायटर जेटचे करणार क्षणात तुकडे तुकडे

Web Title: Pakistan afghan tensions peak afghan minister directly threatens

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2025 | 03:32 PM

Topics:  

  • Afghanistan
  • international news
  • pakistan

संबंधित बातम्या

US-India News: ‘भारतीय अमेरिकेत श्रीमंत व्हायला येतात..’; अमेरिकन नेत्याचे भारतीयांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य
1

US-India News: ‘भारतीय अमेरिकेत श्रीमंत व्हायला येतात..’; अमेरिकन नेत्याचे भारतीयांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य

Pak-Afghan War : पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर आणखी एक हल्ला; डझनभर तालिबानी दहशतवाद्यांना ठार केल्याचा दावा
2

Pak-Afghan War : पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर आणखी एक हल्ला; डझनभर तालिबानी दहशतवाद्यांना ठार केल्याचा दावा

Air Strike : पाकिस्तानने अफगाणिस्तानवर केला ‘एअर स्ट्राईक’; 3 क्रिकेटपट्टूंसह दहा जणांचा मृत्यू
3

Air Strike : पाकिस्तानने अफगाणिस्तानवर केला ‘एअर स्ट्राईक’; 3 क्रिकेटपट्टूंसह दहा जणांचा मृत्यू

Rahul Gandhi: ‘तुम्ही चुकीचे आहात’! पंतप्रधान मोदींवरील टिप्पणीबद्दल अमेरिकन गायकाने राहुल गांधींना सुनावले खडे बोल
4

Rahul Gandhi: ‘तुम्ही चुकीचे आहात’! पंतप्रधान मोदींवरील टिप्पणीबद्दल अमेरिकन गायकाने राहुल गांधींना सुनावले खडे बोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.