युद्धाचे गणित बदलणार! तैवानने तयार केली मल्टिलेयर डिफेन्स सिस्टीम; चीनच्या J-20 फायटर जेटचे करणार क्षणात तुकडे तुकडे (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
China-Taiwan News : बीजिंग/ तैपेई : सध्या चीन (China) आणि तैवानमध्ये तणाव वाढत चालला आहे. दक्षिण चीन समुद्रात तैवाच्या सीमारेषेवर चीनच्या लष्करी हालचाली आढळून आल्या आहे. यामुळे तैवानची चिंता वाढली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील पाश्चत्य देशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. चीन सतत तैवानला युद्धाचे आव्हान देत असल्याचे मानले जात आहे. पण यामध्ये तैवानही मागे नाही. तैवान चीनला योग्य प्रत्युत्तर देण्यासाठी पूर्णपण सुसज्ज आहे.
नुकतेच तैवानने आपल्या संरक्षण प्रणालीत अत्याधुनिक स्वत:चे संरक्षण T-Dome तयार केले आहे. या संरक्षण प्रणालीचे उद्घाटनही करण्यात आले आहे. तैवानच्या राष्ट्रीय सुरक्षा धोरणाचा प्रमुख भाग म्हणून या संरक्षण प्रणालीकडे पाहिले जात आहे. तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाई चिंग-ते यांनी, चीनकडून होणाऱ्या संभाव्य धोक्यांपासून, क्षेपणास्त्र अन् हवाई हल्ल्यांपासून बचावासाठी त्यांची तयार सुरु आहे. यासाठीच ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे.
या संरक्षण प्रणालीसाठी एक खास बजेट तयार करण्यात आले आहे. हे बजेट या वर्षाच्या अखेरीस जाहीर केले जाणार आहे. शिवाय तैवान चिंयाग-कांग नावाचे नवे क्षेपणास्त्र देखील विकसित करत आहे. यासाठी अमेरिककेडून THAAD मिसाइल डिफेन्स सिस्टम देखील तैवान खरेदी करण्याची शक्यता आहे. तैवानने ही पाऊले अशा वेळी उचलली आहेत, जेव्हा चीनच्या तैवानभोवती लष्करी हालचालीत वाढ होत आहे. तैवानच्या या मल्टिलेयर संरक्षण पणामुळे चीनच्या हवाई संरक्षणाला मोठा धोका निर्माण झाला असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. तसेच यामुळे भयंकर युद्धाची देखील भीती निर्माण झाली आहे.
प्रश्न १. तैवानने कोणते शस्त्र तयार केले आहे?
तैवानने T-Dome नावाची एक खास संरक्षण प्रणाली स्वत: विकसित केली आहे.
प्रश्न २. तैवानच्या या T-Dome प्रणालीचे वैशिष्ट्य काय आहे?
तैवानची T-Dome संरक्षण प्रणाली एकाच वेळी अनेक क्षेपणास्त्रांचा अचूकपणे मारा करण्यास आणि शत्रूला नष्ट करण्यास समर्थ आहे.
प्रश्न ३. तैवानने T-Dome संरक्षण प्रणाली का तयार केली आहे?
तैवानने चीनच्या त्यांच्या सीमेभोवती वाढत्या लष्करी हालचाली पाहता त्यांना उत्तर देण्यासाठी आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी नवीन संरक्षण प्रणाली विकसित केली आहे.
दक्षिण चीन समुद्रात पुन्हा तणाव! ड्रॅगनच्या लढाऊ विमान अन् जहाजांचा तैवानच्या सीमेत प्रवेश