Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gulf War 2026: विश्वासघातकी इराण! कुवेत विमानतळ पेटलं; इराणच्या ड्रोन हल्ल्याने इंधन साठवण केंद्र उद्ध्वस्त, आखातात खळबळ

Iran Attack on Gulf Countries: इराणच्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे आखाती देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. कुवेत, सौदी अरेबिया आणि बहरीन यांनी हल्ल्यांना दुजोरा दिला आहे, तर अनेक ड्रोन पाडण्यात आले आहेत.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 08, 2026 | 08:47 AM
iran missile attack kuwait airport saudi bahrain gulf war updates

iran missile attack kuwait airport saudi bahrain gulf war updates

Follow Us
Close
Follow Us:
  • कुवेत विमानतळावर हल्ला
  • आखाती देशांची कोंडी
  • दुटप्पी धोरण
Iran missile attack on Kuwait airport 2026 : मध्यपूर्वेतील (US-Israel Iran War) राजकारण आणि युद्धाने आता अत्यंत भयानक रूप धारण केले आहे. ज्या इराणने काल जगासमोर ‘माफी’चा आव आणला होता, त्याच इराणने आज रविवारी सकाळी आखाती देशांवर एकाच वेळी अनेक ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले करून सर्वांना हादरवून सोडले आहे. कुवेत (Kuwait airport) आंतरराष्ट्रीय विमानतळ, सौदीचे संरक्षण तळ आणि बहरीनचे बंदर इराणच्या निशाण्यावर आले असून, संपूर्ण आखाती प्रदेश आता युद्धाच्या ज्वालामुखीवर उभा आहे.

कुवेत विमानतळावर ‘फ्यूल टँक’ लक्ष्य

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे इराणच्या आत्मघाती ड्रोननी कुवेत आंतरराष्ट्रीय विमानतळाला लक्ष्य केले. विमानतळावरील इंधन साठवणूक सुविधेवर (Fuel Storage Facility) हे ड्रोन आदळले, ज्यामुळे मोठा स्फोट झाला. कुवेती लष्कराने तातडीने प्रत्युत्तर देत परिस्थिती नियंत्रणात आणली असली, तरी या हल्ल्यामुळे नागरी विमान वाहतुकीवर मोठे संकट निर्माण झाले आहे. सध्या विमानतळ परिसरात सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World War 3: युद्धाचा नवा टप्पा! ‘मोठे Surprise मिळणार …’ नेतन्याहू यांचा VIDEO संदेशाद्वारे इराणला धडकी भरवणारा इशारा

सौदी अरेबियाची ‘एअर डिफेन्स’ यंत्रणा सक्रिय

दुसरीकडे, सौदी अरेबियावरही इराणने ड्रोनचा वर्षाव केला. सौदी संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळपर्यंत सौदीच्या एअर डिफेन्स यंत्रणेने किमान २१ इराणी ड्रोन हवेतच नष्ट केले आहेत. जर हे ड्रोन जमिनीवर पडले असते, तर मोठी जीवितहानी आणि वित्तहानी झाली असती. सौदीने या हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून, हे जागतिक शांततेला दिलेले आव्हान असल्याचे म्हटले आहे.

 

🚨 IRAN JUST EXPANDED THE BATTLEFIELD Iran launched Shahed drones and ballistic missiles toward Ali al-Salem Air Base and Shuaiba Port in Kuwait, part of the March 2026 United States–Israel–Iran war escalation. The conflict had already killed 6 American personnel in earlier… pic.twitter.com/jr0QH9WDlS — Naeem Aslam (@NaeemAslam23) March 6, 2026

credit – social media and Twitter

बहरीनमध्ये भीषण आग: ‘मीना सलमान’ बंदर लक्ष्य

बहरीनमधील परिस्थिती अधिक चिंताजनक आहे. इराणने बहरीनच्या ‘मीना सलमान’ बंदरावर केलेल्या हल्ल्यात बंदराच्या एका भागाला भीषण आग लागली आहे. किंग फहद कॉजवेच्या जवळ असलेल्या या भागात आगीच्या ज्वाळा लांबून दिसत आहेत. बहरीनच्या गृह मंत्रालयाने या हल्ल्याचा थेट संबंध इराणशी जोडला असून, आपत्कालीन यंत्रणा आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

 

DEVELOPING: Social Security Building in Kuwait City nearly fully engulfed in flames after Iranian one-way attack drone strike. Live situation unfolding. #BreakingNews #Kuwait #Iran pic.twitter.com/t1ki58vk7B — Powder Keg Daily (@PowderKegDaily) March 8, 2026

credit – social media and Twitter

माफी की फसवणूक? इराणच्या दुटप्पी भूमिकेचा पर्दाफाश

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, हे हल्ले अशा वेळी झाले आहेत जेव्हा केवळ एक दिवस आधी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी आखाती देशांची माफी मागितली होती. “आम्ही शेजाऱ्यांना लक्ष्य करणार नाही,” असे आश्वासन त्यांनी दिले होते. मात्र, इराणमधील शक्तिशाली लष्करी गट ‘इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड्स कॉर्प्स’ (IRGC) ने राष्ट्रपतींचे हे विधान फेटाळून लावत हे हल्ले केले आहेत. यावरून इराणमधील अंतर्गत सत्तासंघर्ष आणि त्यांची विश्वासार्हता जगासमोर उघडी पडली आहे.

 

Multiple fuel tanks are reported to be burning at Kuwait International Airport, with thick black smoke seen pouring into the sky, following an attack using drones and/or ballistic missiles by Iran. pic.twitter.com/dwe2EBQeng — OSINTdefender (@sentdefender) March 8, 2026

credit – social media and Twitter

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : The AI War: बापरे! खामेनींचा पत्ता एआयने शोधला? अमेरिकन सैन्याच्या ‘Claude AI’ने ‘असा’ मोडला इराणचा लष्करी कणा मोडला

का लक्ष्य केले जात आहेत आखाती देश?

इराणचा आरोप आहे की कुवेत, सौदी, यूएई आणि बहरीन यांसारखे देश अमेरिकेला लष्करी तळ पुरवून इराणच्या विरोधात मदत करत आहेत. या देशांमध्ये अमेरिकेचे मोठे लष्करी तळ आहेत, जे इराणच्या डोळ्यात खुपत आहेत. परिणामी, इराण आता केवळ इस्रायल आणि अमेरिकेशीच नाही, तर संपूर्ण इस्लामिक शेजारील देशांशीही युद्ध पुकारत असल्याचे दिसत आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: इराणने कुवेत विमानतळावर हल्ला का केला?

    Ans: इराणचा असा आरोप आहे की आखाती देश अमेरिकेला सहकार्य करत आहेत. कुवेत विमानतळावरील इंधन सुविधेला लक्ष्य करून त्यांची रसद तोडण्याचा हा प्रयत्न होता.

  • Que: इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी माफी मागूनही हल्ले का सुरू झाले?

    Ans: इराणचे राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान यांनी माफी मागितली असली तरी, इराणच्या लष्करावर (IRGC) त्यांचे पूर्ण नियंत्रण नसल्याचे यावरून स्पष्ट होते. लष्करी अधिकाऱ्यांनी हे हल्ले सुरूच ठेवले आहेत.

  • Que: सौदी अरेबियाची या हल्ल्यांवर काय प्रतिक्रिया आहे?

    Ans: सौदीने २१ ड्रोन पाडल्याची माहिती दिली असून, आपल्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याचा इशारा दिला आहे.

Web Title: Iran missile attack kuwait airport saudi bahrain gulf war updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 08:45 AM

Topics:  

  • international news
  • Iran Attack
  • US-Israel Iran War
  • World War 3

संबंधित बातम्या

Hormuz Strait: समुद्रात ‘घोस्ट फ्लीट’चा थरार! अमेरिकेच्या नाकाखालून इराणने विकलं अब्जावधींचं तेल; भारत-पाकिस्तान पण सामील
1

Hormuz Strait: समुद्रात ‘घोस्ट फ्लीट’चा थरार! अमेरिकेच्या नाकाखालून इराणने विकलं अब्जावधींचं तेल; भारत-पाकिस्तान पण सामील

US Iran Conflict : ट्रम्प यांचा दुहेरी खेळ! इराणजवळ अमेरिकेची तिसरी घातक युद्धनौका तैनात, शांतता चर्चेआड मोठा गेम प्लॅन?
2

US Iran Conflict : ट्रम्प यांचा दुहेरी खेळ! इराणजवळ अमेरिकेची तिसरी घातक युद्धनौका तैनात, शांतता चर्चेआड मोठा गेम प्लॅन?

Kuwait Attack : कुवेत सीमेवर महासंग्राम! इराकी ड्रोनचा उत्तरेकडील चौक्यांवर भीषण हल्ला; फायबर-ऑप्टिक तंत्रज्ञानाने जगाला हादरवले
3

Kuwait Attack : कुवेत सीमेवर महासंग्राम! इराकी ड्रोनचा उत्तरेकडील चौक्यांवर भीषण हल्ला; फायबर-ऑप्टिक तंत्रज्ञानाने जगाला हादरवले

Maharashtra Breaking News Updates Today: राजकारण, अर्थव्यवस्थेसह आणि  देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर
4

Maharashtra Breaking News Updates Today: राजकारण, अर्थव्यवस्थेसह आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.