Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pak-Afghan War : पाकिस्तान-अफगाण संघर्षाचा पुन्हा भडका; सीमेवर भीषण गोळीबार

Pak Afghan War : पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. दोन्ही देशात सीमेवर जोरदार गोळीबार झाला आहे. यामुळे सीमावर्तीत भागांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 06, 2025 | 10:27 AM
Pakistan Afghanistan War

Pakistan Afghanistan War

Follow Us
Follow Us:
  • पाकिस्तान-अफगाणिस्तानमध्ये पुन्हा संघर्ष
  • सैनिकांमध्ये सीमेवर जोरदार गोळीबार
  • युद्धजन्य परिस्थितीची शक्यता
Pakistan Afghanistan War News in Marathi : काबूल/ इस्लामाबाद : पाकिस्तान (Pakistan) आणि अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) पुन्हा संघर्षाचा भडका उडाला आहे. दोन्ही देशात चमन सीमेवर भीषण गोळीबार झाला आहे. यामुळे सीमावर्ती भागांमध्ये सध्या घबराट पसरली आहे. युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शुक्रवारी (०५ डिसेंबर) रात्री दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये जोरदार गोळीबारा झाला.

Pak-Afghan War : पाकिस्तानची अफगाणिस्तानवर पुन्हा एअरस्ट्राईक; बॉम्बहल्ल्यात लहान मुलांसह १० जणांचा मृत्यू

दोन्ही देशांच्या एकमेकांवर गोळीबाराचा आरोप

सध्या या गोळीबारामुळे कोणाच्याही मृत्यूची नोंद झालेली नाही. मात्र या चकामकीमुळे दोन्ही देशांत युद्ध सुरु होऊ शकते अशी चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. दोन्ही देशांनी एकमेकांवर सुरुवातील गोळीबार केल्याचा आरोप केला आहे. चमन सीमेदवळी पाकिस्तानी सैन्याने अफगाणिस्तानमधून झालेल्या गोळीबाराचे प्रत्युत्तर म्हणून हल्ला केला असल्याचे म्हटले आहे. सध्या या गोळीबारामुळे प्रमुख वाहतूक मार्ग बंद झाला आहे. दुसरीकडे तालिबानने या गोळीबारासाठी पाकिस्तानला जबाबदार धरले आहे.

अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारने म्हटले आहे की, पाकिस्तानी सैन्यांने कंधारच्या स्पिन बोल्दाक जिल्ह्यात पुन्हा एकदा अफगाणिस्तान सैन्यावर हल्ला केल्या. यामुळे त्यांना प्रत्युत्तर देण्यास अफगाणिस्तानला भाग पडले. पाकिस्तान सैन्यांने स्पिन बोल्दाक सीमा भागात हॅंडग्रेनेड फेकला होता, याला प्रत्युत्तर देण्यासाठी त्यांच्या सैन्याने गोळीबार केला असल्याचे म्हटले आहे. तसेच अफगाणिस्तान युद्धबंदीसाठी तयार असून पाकिस्तान कोणत्या ना कोणत्या कारणाने यामध्ये अडथळा निर्माण करत असल्याचे तालिबानने म्हटले आहे. तर पाकिस्तानने अफगाणिस्तानवर, कोणत्याही चिथावणीशिवाय चमन सीमेवर गोळीबार केला असल्याचे म्हटले आहे. सरकारने सैन्याला अलर्ट राहण्याचे आणि नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्याचे आदेश दिले आहेत.

दोन्ही देशांतील शांतता चर्चा निष्फळ

दरम्यान पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये गेल्या ऑक्टोबरपासून सुरु झालेला संघर्ष थांबवण्यासाठी सतत शांतता चर्चा होत आहेत. मात्र या सर्व चर्चा एकामागून एक निष्फळ होत आहे. नुकतेच सौदीच्या रियाधमध्ये देखील अनाधिकृत चर्चा झाली होती, मात्र ही चर्चा अयशस्वी ठरली आहे. यापूर्वी देखील तुर्कीच्या मध्यस्थीने दोन्ही देशांत युद्धबंदी लागू करण्यात आली होती. परंतु युद्धबंदीच्या काही तासांतच पाकिस्तानने उल्लंघन करत अफगाणिस्तानवर हल्ला केला होता. यामुळे दोन्ही देशांतील तणाव पुन्हा वाढला.

काय आहे संघर्षाचे मूळ कारण?

पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये सीमा संघर्षाची ही पहिलीच वेळी नाही. पूर्वी इस्लामिक भांवडे म्हटली जाणारे देश आज एकमेकांचे कट्टर शत्रू बनले आहेत. पाकिस्तान अफगाणिस्तानवर पाकिस्तानी तालिबानच्या नेतृत्वाखालील दहशतवादी गटांना त्यांच्या भूभागावर आश्रय देत असल्याचा आरोप करतो. तर दुसरीकडे अफगाणिस्तान पाकिस्तानवर खोटा इस्लामाच्या प्रचाराचा आरोप करतो. शिवाय २०११ मध्ये अमेरिकेसोबत झालेल्या संघर्षात पाकिस्तानने अफगाणिस्ताना पाठ दाखवली होती. तेव्हापासून दोन्ही देशांत कायमस्वरुपी तणाव आहे.

Pak-Afghan War : पाकिस्तान अफगाणिस्तानमध्ये आणखी एक शांतता चर्चा निष्फळ; आता पुढे काय होणार?

💡

Frequently Asked Questions

  • Que: पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये कोणत्या सीमेवर गोळीबार झाला?

    Ans: पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये चमन सीमेवर कंधारच्या स्पिन बोल्दाक जिल्ह्यात गोळीबार झाला आहे.

  • Que: पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये नुकत्याच झालेल्या संघर्षात किती जीवितहानी झाली?

    Ans: पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये नुकत्याच झालेल्या संघर्षात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

  • Que: अफगाणिस्तानने पाकिस्तानवर काय आरोप केला आहे?

    Ans: अफगाणिस्तानने पाकिस्तानवर कंधारच्या स्पिन बोल्दड जिल्ह्यात पहिल्यांदा हल्ला केल्याने, त्यांच्या सैन्याने गोळीबार केला असल्याचे म्हटले आहे.

  • Que: पाकिस्तानने अफगाणिस्तानवर काय आरोप केला आहे?

    Ans: पाकिस्तानच्या मते, अफगाण सैनिकांनी कोणत्या कारणाशिवाय त्यांच्या सैन्यावर गोळीबार केला असल्याचा आरोप केला आहे.

Web Title: Pakistan afghanistan war forces trade fire along chaman border news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 06, 2025 | 10:22 AM

Topics:  

  • Afghanistan
  • Pakistan News
  • World news

संबंधित बातम्या

फिलिपिन्सच्या ताल ज्वालामुखीचा भयंकर उद्रेक; राख अन् वाफेचा प्रचंड लोट, थरारक घटना कॅमेरात कैद, VIDEO
1

फिलिपिन्सच्या ताल ज्वालामुखीचा भयंकर उद्रेक; राख अन् वाफेचा प्रचंड लोट, थरारक घटना कॅमेरात कैद, VIDEO

Air India Express: पश्चिम आशियात एअर इंडिया एक्सप्रेसची जोरदार एन्ट्री! US-Iran तणावानंतर ओमान, कुवेतसाठी विमानसेवा पुन्हा सुरू
2

Air India Express: पश्चिम आशियात एअर इंडिया एक्सप्रेसची जोरदार एन्ट्री! US-Iran तणावानंतर ओमान, कुवेतसाठी विमानसेवा पुन्हा सुरू

PoK Protests: काश्मिरींच्या हातात बंदुका पाकिस्तानी सैन्यानेच दिल्या’; PoK मधील मोठ्या नेत्याचा खळबळजनक कबुलीजबाब, पाहा VIDEO
3

PoK Protests: काश्मिरींच्या हातात बंदुका पाकिस्तानी सैन्यानेच दिल्या’; PoK मधील मोठ्या नेत्याचा खळबळजनक कबुलीजबाब, पाहा VIDEO

Khamenei Funeral : ‘रक्ताचा बदला घेऊ’, खामेनेईंच्या अंत्यसंस्कारापूर्वी इराणचा कडक इशारा; अमेरिकेसोबतची चर्चा पुन्हा रखडली?
4

Khamenei Funeral : ‘रक्ताचा बदला घेऊ’, खामेनेईंच्या अंत्यसंस्कारापूर्वी इराणचा कडक इशारा; अमेरिकेसोबतची चर्चा पुन्हा रखडली?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.