Pak-Afghan War : पाकिस्तान अफगाणिस्तान शांतता चर्चा पुन्हा निष्फळ; आता पुढे काय होणार? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मिळालेल्या माहितीनुसार, सौदी अरेबियाची राजधानी रियाध येथे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये शांतता चर्चा झाली. या चर्चेचा उद्देश दोन्ही देशातील सीमावाद सोडवणे होते. मात्र दोन्ही देश आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. यामुळे चर्चा अयशस्वी ठरली. ही चर्चा अधिकृत नसल्याने हा निर्णय अद्याप मान्य करण्यात आलेला नाही. यामुळे पुन्हा यासाठी प्रयत्न केले जातील. सौदी अरेबियात आणखी एक चर्चा अयोजित होण्याी शक्यता आहे.
यापूर्वी ऑक्टोबर २०२५ मध्ये दोन्ही देशात युद्धबंदी लागू करण्यात आली होती, परंतु या नंतरच्या शांतता चर्चेत तणावाचे कोणतेही निराकरण झाले आहे. पाकिस्तानने या युद्धबंदीचे उल्लंघन करत अफगाणिस्तानवर हवाई हल्ला केला. यानंतर अनेक वेळा शांतता चर्चा झाल्या आहे. मात्र अद्यापही कोणता ठोस निकाल लागलेला नाही.
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान संघर्षात आता अनिश्चितता निर्माण झाली आहे. ऑक्टोबरमध्ये दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये चकामक झाली होती. यावेळी अनेक निरापराध लोक मारले गेले होते. शिवाय दोन्ही देशात २०११ नंतर तालिबान सत्ते आल्यापासून हा संघर्ष सुरु आहे. पाकिस्तान अफगाणिस्तानवर पाकिस्तानी तालिबानच्या नेतृत्वाखालील दहशतवादी गटांना त्यांच्या भूभागावर आश्रय देत असल्याचा आरोप करतो. पण तालिबान सरकारने हा दावा फेटाळला आहे. शिवाय २०११ मध्ये अमेरिकेने अफगाणिस्तानवर हल्ला केला होता. यावेळी पाकिस्तानने अमेरिकेची साथ दिली होती. तेव्हापासून दोन्ही देशातील तणावात प्रचंड वाढ झाली. अफगाणिस्तानच्या मते पाकिस्तान खोट्या इस्लामाचा प्रचार करतो.
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील चर्चा एकामागून एक अपयशी ठरत आहे. याचा परिणाम दोन्ही देशांच्या सीमा भागांवर होत आहे. सीमावर्ती भगांत तीव्र संघर्ष भडकण्याची शक्यता आहे. सध्या दोन्ही देशात पुन्ह संघर्ष थांबवण्यासाठी चर्चेचा प्रयत्न केला जात आहे.
Explainer : पाक-अफगाण तणाव शिगेला! दोन्ही देशांची एकमेकांना युद्धाची उघड धमकी, कोण जिंकेल?






